आपत्ती व्यवस्थापन विषयक आयआरएस ऑनलाईन प्रशिक्षण संपन्न


आपत्ती व्यवस्थापन विषयक

आयआरएस ऑनलाईन प्रशिक्षण संपन्न

       वाशिम, दि. 12 (जिमाका) : आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, मंत्रालय, मुंबई व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, वाशिम यांच्या संयुक्त वतीने IRS online प्रशिक्षण सावरगाव (बर्डे) येथील सन्मती इजिनियरींग कॉलेज येथे 10 जानेवारी रोजी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आले.

          प्रशिक्षणाला मास्टर ट्रेनर म्हणून अतनु घोष, ब्रिजेश शर्मा, आकाश लाड, वाशिम तहसिलचे नायब तहसिलदार श्रीमती पुरोहित, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या प्रशिक्षणाला नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन, महसूल, पोलिस, पंचायत, नगरपरिषद, आरोग्य, वन विभाग, अग्निशमन, शिक्षण, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, लघु पाटबंधारे, लघु सिंचन, मृद व जलसंधारण, बांधकाम जिल्हा परिषद, उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुरवठा, महावितरण, तहसील कार्यालय, कृषी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील ८९ अधिकारी व कर्मचारी, प्रशिक्षणास उपस्थित होते. प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी नायब तहसीलदार कैलास देवळे, विनोद मारवाडी, रवि अंभोरे, नागोराव खोंड व सागर बदामकर यांनी परिश्रम घेतले. 

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश