जिल्हाधिकारी कार्यालय येथे ध्वजारोहण



जिल्हाधिकारी कार्यालय येथे ध्वजारोहण

      वाशिम, दि. 26 (जिमाका) : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त आज २६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण करण्यात आले. पोलीस पथकाने राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, सहाय्यक जिल्हाधिकारी मिन्नू पी.एम, अप्पर जिल्हाधिकारी शहाजी पवार, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हाधिकारी सुहासिनी गोणेवार, उपजिल्हाधिकारी कैलास देवरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिता आंबरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.विजय काळबांडे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धर्मपाल खेळकर, जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख शिवाजी भोसले, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक दिनेश बारापात्रे, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी राजेश वजीरे, अधीक्षक राहुल वानखडे तसेच विविध कार्यालयाचे कार्यालय प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन मोहन शिरसाठ यांनी केले.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश