नवोदय विदयालय प्रवेश परीक्षा इ.6 वीचे प्रवेश अर्ज 31 जानेवारीपर्यंत ऑनलाईन मागविले
- Get link
- X
- Other Apps
नवोदय विदयालय प्रवेश परीक्षा
इ.6 वीचे प्रवेश अर्ज 31 जानेवारीपर्यंत ऑनलाईन मागविले
वाशिम, दि. 03 (जिमाका) : केन्द्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड दिल्लीच्या वतीने घेण्यात येणारी जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा इयत्ता 6वी (2023-24) चे प्रवेश अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरण्यास सुरुवात करण्यात आली आहे. जे विद्याथी वाशिम जिल्हयातील रहिवासी आहे आणि मान्यताप्राप्त सरकारी, निमसरकारी अथवा खाजगी शाळेत शैक्षणिक सत्र 2022-23 च्या इयत्ता 5 वीत शिक्षण घेत आहे, असे विद्यार्थी या प्रवेश परिक्षेकरीता अर्ज करु शकतात. विद्यार्थी हा इयत्ता 3 री व 4 थी मध्ये सलग उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. इच्छूक विद्यार्थ्यांचा जन्म 1 मे 2011 ते 30 एप्रिल 2013 दरम्यान झाला आहे, असे विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र आहेत. ही पात्रता व अट अनुसचित जाती अनुसुचित जमाती संवर्ग धरुन सर्व संवर्गातील विद्यार्थ्याना लागू राहील.
अधिक माहितीसाठी, परिक्षेचे स्वरुप व इतर सविस्तर माहिती नवोदय विद्यालय समितीच्या www.navodaya.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्ज दिलेल्या संकेतस्थळावरुन विनामुल्य भरण्यास सुरु झाली आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक 31 जानेवारी 2023 असा आहे. निवड चाचणी परिक्षा 29 एप्रिल 2023 रोजी घेण्यात येणार असल्याचे जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य एस.डी. खरात यांनी कळविले आहे.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment