Posts

Showing posts from June, 2020

बेरोजगार युवक-युवतींच्या मदतीसाठी मार्गदर्शन तथा समुपदेशन कक्ष - पालकमंत्री शंभूराज देसाई

Image
वाशिम ,   दि. २९ (जिमाका) : लॉकडाऊन काळात जिल्ह्यात परतलेल्या बांधवांना त्यांच्याकडे असलेल्या कौशल्यानुसार खासगी क्षेत्रात उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधींची माहिती मिळणे गरजेचे आहे. यासाठी जिल्हा कौशल्य विकास उद्योजकता व रोजगार मार्गदर्शन केंद्राच्यावतीने तयार केलेल्या ‘ गुगल फॉर्म ’ आणि व्यवसाय मार्गदर्शन तथा समुपदेश कक्षाची मदत होईल , असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. जिल्हा कौशल्य विकास उद्योजकता व रोजगार मार्गदर्शन केंद्राच्यावतीने तयार करण्यात आलेल्या ‘ गुगल फॉर्म ’ आणि व्यवसाय मार्गदर्शन तथा समुपदेश कक्षाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे , आमदार राजेंद्र पाटणी , आमदार अमित झनक , जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना , पोलीस अधीक्षक वसंत परदेशी , जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज यांची प्रमुख उपस्थिती होती. पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले , लॉकडाऊन काळात जिल्ह्यात परतलेल्या युवक-युवतींचा रोजगार व स्वयंरोजग

पालकमंत्र्यांच्या हस्ते भित्तीपत्रकांचे प्रकाशन

Image
वाशिम ,   दि. २९ (जिमाका) :  जिल्ह्यातील नागरिकांना व लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांची माहिती व्हावी, यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाने जिल्हा वार्षीक सर्वसाधारण योजना सन २०१९-२० या वर्षात तयार केलेल्या विविध भित्तीपत्रकांचे प्रकाशन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज, २९ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात केले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक, जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती. शासनाच्या अनेक लोककल्याणकारी योजना आहेत.या योजनांची माहिती नागरिकांना तसेच लाभार्थ्यांना झाली तर त्या योजनांचा लाभ घेऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे.अशा काही योजनांची भिंतीपत्रकांच्या माध्यमातून गावोगावी प्रसिद्धी व्हावी यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाने जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना सन २०१९-२० या वर्षात योजनांवर आधारित सचित्र माहिती असलेले भित्

पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘योजना’ घडीपुस्तिकेचे प्रकाशन

Image
वाशिम ,   दि. २९ (जिमाका) : शासनाच्या विविध योजनांची माहिती जिल्ह्यातील नागरिकांना व्हावी व त्यामाध्यमातून त्यांनी योजनांचा लाभ घ्यावा, यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाने जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेतून तयार केलेल्या ‘योजना’ या घडीपुस्तिकेचे प्रकाशन पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते आज, २९ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक, जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती. ‘योजना’ नावाच्या घडीपुस्तिकेमध्ये माझी कन्या भाग्यश्री, शुभमंगल सामुहिक विवाह योजना, प्रधानमंत्री आवास योजना, मनोधैर्य योजना, प्रधानमंत्री मातृवंदन योजना, जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजना, ग्रामीण व शहरी भागातील युवक मंडळांना आर्थिक सहाय्य योजना, जननी शिशु सुरक्षा योजना, मच्छिमार सहकारी संस्थांना अर्थसहाय्य, गोपीनाथ मुंडे शेतकरी

पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते राज्य उत्पादन शुल्क कार्यालय परिसरात वृक्षारोपण

Image
वाशिम ,   दि. २९ (जिमाका) : गृह (ग्रामीण) , वित्त , नियोजन , राज्य उत्पादन शुल्क , कौशल्य विकास व उद्योजकता , पणन राज्यमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते आज, २९ जून रोजी चिखली रोड येथील राज्य उत्पादन शुल्क कार्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, आमदार राजेंद्र पाटणी, जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, सहाय्यक पोलीस अधीक्षक पवन बन्सोड, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक अतुल कानडे, जिल्हा कोषागार अधिकारी चंद्रकांत खारोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. *****

‘कोरोना’ संसर्ग रोखण्याबाबत दक्षता बाळगा - विभागीय आयुक्त पीयूष सिंह

Image
·          कोरोना संसर्ग, खरीप हंगाम विषयक बाबींचा आढावा ·          गरोदर महिला, वयोवृद्ध यांची विशेष काळजी घ्या ·          स्थलांतरित नागरिकांची आरोग्य तपासणी आवश्यक वाशिम ,   दि. १८ (जिमाका) : कोरोना विषाणू संसर्ग झालेल्या रुग्णाच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी घसरल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे अशा रुग्णांचा शोध घेण्यासाठी रेड झोनमधून जिल्ह्यात परतलेले सर्व नागरिक, जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्रासह इतर भागातील नागरिकांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी तपासण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी दिल्या. कोरोना विषाणू संसर्ग रोखाण्यासोबतच जिल्ह्यातील प्रत्येक पात्र शेतकऱ्याला पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आज, १८ जून रोजी झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, सहाय्यक जिल्हाधिकारी वैभव वाघमारे, अपर जिल्हाधिकारी शरद पाटील, निवासी उपजिल्हा

निंबोळीचा वापर शेतकऱ्यांसाठी वरदान !

Image
  कडूनिंब एक उत्कृष्ठ कीड व रोग प्रतिरोधक कृषि क्षेत्रात निंबोळी अर्क हे एक ‘जगातील अत्यंत सुरक्षित कीडनाशक’ आहे. स्वस्त आणि विषमुक्त अन्नधान्य तयार करण्यासाठी कीडनाशक म्हणून त्याचा वापर केल्यास उत्पादन खर्चात बचत होत असल्यामुळे निंबोळी अर्क वापरण्याचे अनन्य साधारण महत्व आहे. शेतकऱ्यांना कृषि क्षेत्रात निंबोळीचे महत्व व त्याबाबत महत्वाची सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने कृषि क्षेत्रात निंबोळीपासून तयार करण्यात येणाऱ्या अर्क, तेल, भुकटी व पेंड याविषयी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार यांनी दिलेली माहिती... पिकावर पडलेल्या रोगांमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी अथवा पिकांवर किड व रोग पडू नये, यासाठी शेतकरी त्यावर विविध प्रकारच्या खर्चीक व घातक किटकनाशकाची फवारणी करतात. ही           किटकनाशके महाग असतात. त्यामुळे विषबाधा होण्याचा धोका संभवतो. मात्र, निंबोळी अर्क सारख्या कीडनाशकचा वापर करून पिकसंरक्षणासाठी होणाऱ्या खर्चात बचत कराता येते. तसेच आरोग्याचा धोकासुद्धा टाळता येतो. तसेच सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला व

कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी अधिक दक्ष राहण्याची गरज - पालकमंत्री शंभूराज देसाई

Image
·         प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करा ·         प्रतिबंधित क्षेत्रात अत्यावश्यक सुविधा पुरावा ·         खरीप हंगामविषयक बाबींचाही आढावा ·         पीक कर्ज वाटपाची गती वाढविण्याच्या सूचना वाशिम ,   दि. १५ (जिमाका) : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत कोरोना विषाणू संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी अधिक दक्ष राहण्याची गरज असून प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज, १५ जून रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित आढावा बैठकीत दिल्या. यावेळी त्यांनी कोरोना विषाणू संसर्ग, खरीप हंगामातील विविध बाबींचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, सहाय्यक जिल्हाधिकारी वैभव वाघमारे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक अतुल कानडे, उपजिल्हा निबंधक सहकारी संस्था श्री.

प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिक, शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी विशेष उपाययोजना

Image
·         जिल्हा प्रशासनाने तयार केली ‘एसओपी’ ·         शेतकऱ्यांना बियाणे, खते बांधावरच मिळणार ·         स्वस्त धान्य दुकानांचे धान्यही घरपोच देण्याच्या सूचना वाशिम ,   दि. ०५ (जिमाका) : कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेल्या भोयनी (ता. मानोरा) व दादगाव (ता. कारंजा) या दोन गावांना प्रतिबंधित क्षेत्र (कंटेन्मेंट झोन) घोषित करण्यात आले आहे. येथील नागरिक , शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी या क्षेत्रात विशेष उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. याकरिता प्रमाणित कार्यप्रणाली  (एसओपी) निश्चित करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी ४ जून रोजी निर्गमित केले आहेत. आगामी खरीप हंगाम लक्षात घेऊन प्रतिबंधित क्षेत्रातील शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. दोन्ही गावांमधील शेतकऱ्यांना खरीपमध्ये पेरणीसाठी लागणारे बियाणे , खते त्यांच्या बांधावरच उपलब्ध करून द्यावे. तसेच शेती अवजारे व तत्सम कृषि विषयक खरेदीसाठी संबंधित तालुका कृषि अधिकारी नियोजन करून सदर साहित्य विकणाऱ्या आस्थापनाकडून साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावा. प्रतिबंधित क्षेत्रात

पीक कर्ज वितरणाची गती वाढवा - पालकमंत्री शंभूराज देसाई

Image
·         प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना पीक मिळणे आवश्यक ·         नॉन-कोविड रुग्णांना वेळेवर आरोग्य सुविधा द्या ·         पावसाळ्यात उद्भवणाऱ्या परिस्थितीसाठी सज्ज रहा वाशिम ,   दि. ०३ (जिमाका) : लवकरच पावसाळा सुरु होईल व पेरणीची कामे सुरु होतील. शेतकऱ्यांना बियाणे, खते खरेदी करण्याकरिता वेळेत पीक कर्ज उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पीक कर्ज वितरणाची गती वाढविण्याच्या सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या. आज, ३ जून रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, सहाय्यक जिल्हाधिकारी वैभव वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र जाधव, राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक अतुल कानडे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था श्री. गडेकर, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक दत्तात्रय निनाव

जिल्ह्यातील सर्व नागरिकांना मिळणार महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ - जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक

Image
·          जिल्ह्यातील १३ रुग्णालयात घेता येतील उपचार ·          ९९६ उपचार पद्धतींचा लाभ मिळणार वाशिम ,   दि. ०२ (जिमाका) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व नागरिकांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून २३ मे २०२० रोजी त्यासंदर्भात शासन निर्णय देखील जाहीर करण्यात आला आहे. यामुळे आता या योजनेच्या अंगीकृत असलेल्या सर्व रुग्णालयांमध्ये जिल्ह्यातील नागरिकांना मोफत उपचार घेता येणार आहेत. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा , असे आवाहन जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी केले आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत ९९६ उपचार व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत १२०९ उपचार पुरविले जातात. या अंतर्गत राज्यातील सुमारे ८५ टक्के लोकसंख्येचा समावेश होतो. तथापि , राज्यातील कोरोनाची सद्यस्थिती पाहता महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत समाविष्ट नसलेल्या राज्यातील नागरिकांनासुद्धा महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत अनुज्ञेय ९९६ उपचार पद्धतींचा लाभ मान्यता प्राप्त द