पालकमंत्र्यांच्या हस्ते भित्तीपत्रकांचे प्रकाशन


वाशिम, दि. २९ (जिमाका) : जिल्ह्यातील नागरिकांना व लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांची माहिती व्हावी, यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाने जिल्हा वार्षीक सर्वसाधारण योजना सन २०१९-२० या वर्षात तयार केलेल्या विविध भित्तीपत्रकांचे प्रकाशन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज, २९ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात केले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक, जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
शासनाच्या अनेक लोककल्याणकारी योजना आहेत.या योजनांची माहिती नागरिकांना तसेच लाभार्थ्यांना झाली तर त्या योजनांचा लाभ घेऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे.अशा काही योजनांची भिंतीपत्रकांच्या माध्यमातून गावोगावी प्रसिद्धी व्हावी यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाने जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना सन २०१९-२० या वर्षात योजनांवर आधारित सचित्र माहिती असलेले भित्तीपत्रके तयार केली आहे. या भिंतीपत्रकांमध्ये मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रममनोधैर्य योजनामाझी कन्या भाग्यश्रीग्रामीण व शहरी भागातील युवक मंडळांना आर्थिक सहाय्य, दुधाळ जनावरांचे गट वाटपगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनामच्छिमार सहकारी संस्थांना अर्थसहाय्य आणि मागेल त्याला शेततळे आदी योजनांचा समावेश आहे.

Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर