मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९
वाशिम, दि. १५ : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमानुसार २१ ऑक्टोंबर २०१९ रोजी जिल्ह्यातील
तिन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे. या निवडणुकीत मतदानाचा हक्कर बजावितांना
मतदारांकडे मतदान ओळखपत्र नसल्यास सोबत आणावयाच्या ११ पर्यायी दस्तऐवजांची यादी भारत
निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे.
मतदार ओळखपत्र
नसलेल्या मतदारांना मतदान करण्यासाठी पासपोर्ट,
वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), छायाचित्र
असलेले कमर्चारी ओळखपत्र (केंद्र किंवा राज्य शासन,
सार्वजनिक उपक्रम अथवा सार्वजनिक मर्यादित
कंपनीने कर्मचाऱ्यांना दिलेले ओळखपत्र),
छायाचित्र असलेले बँकेचे पासबुक, पॅन
कार्ड, एनपीआर अंतर्गत आरजीआयद्वारे दिले गेलेले स्मार्ट कार्ड, मनरेगा
अंतर्गत जॉब कार्ड, भारत सरकारच्या कामगार मंत्रालयाद्वारे दिले गेलेले आरोग्य
विमा स्मार्ट कार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन कागदपत्रे, खासदार
किंवा आमदार किंवा विधानपरिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र व आधारकार्ड यापैकी कोणताही
एक दस्ताऐवज सोबत आणावा लागणार आहे.
निवडणूक आयोगामार्फत देण्यात आलेली छायाचित्रासह
असलेली केवळ मतदार चिठ्ठी ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरता येणार नाही. मतदार
चिठ्ठीसोबत वरील ११ पैकी एक पर्यायी ओळखपत्र असणे आवश्यक आहे.
Comments
Post a Comment