सामान्य निवडणूक निरीक्षक प्रकाश बिंदू यांच्या मंगरूळपीर तालुक्यातील मतदान केंद्रांना भेटी
वाशिम, दि. १२ : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी
निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले सामान्य निवडणूक निरीक्षक प्रकाश बिंदू यांनी आज
मंगरूळपीर तालुक्यातील मतदान केंद्रांची पाहणी केली. तसेच या मतदान केंद्रांवर
उपलब्ध असलेल्या किमान आवश्यक सुविधांचा आढावा घेतला.
यावेळी श्री. बिंदू यांचे संपर्क अधिकारी तथा
पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत बोरसे, मंडळ अधिकारी डी. जे. चौधरी,
तलाठी भागवत भताने आदी उपस्थित होते.
सामान्य निवडणूक निरीक्षक श्री. बिंदू यांनी मंगरूळपीर
तालुक्यातील लाठी, शेलूबाजार, चिखली, हिसई येथील मतदान केंद्रांची तसेच मंगरूळपीर
शहरातील कलंदरिया उर्दू हायस्कूल येथील ४ मतदान केंद्र, अकोला चौक येथील जिल्हा
परिषद प्राथमिक मराठी शाळेतील चार मतदान केंद्रांची पाहणी केली. याठिकाणी दिव्यांग
मतदारांना व्हीलचेअर, पिण्याचे पाणी, रँप, स्वच्छता गृह आदी सुविधांची पाहणी केली.
Comments
Post a Comment