Posts

Showing posts from May, 2020

कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी दक्षता घ्या - गृहमंत्री अनिल देशमुख

Image
·          कोरोना संसर्गामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा ·          जिल्ह्यात परतलेल्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्या ·          पुरेशा प्रमाणात आरोग्य सुविधा सज्ज ठेवा वाशिम ,   दि. २८ (जिमाका) : कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रभावीपणे प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्याने जिल्ह्यात समाधानकारक परिस्थिती आहे. मात्र, भविष्यात सुद्धा जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग वाढू नये, यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आज, २८ मे रोजी आयोजित कोरोना विषाणू संसर्गामुळे उद्भवलेली परिस्थिती आणि कायदा व सुव्यवस्था विषयक आढावा बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, खासदार भावना गवळी, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक, जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, सहाय्यक जिल्हाधिकारी वैभव वाघमारे, सहाय्यक पोलीस अधीक्षक पवनकुमार बन्सोड, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, अपर पोलीस अधीक्ष

‘होम क्वारंटाईन’ सूचनांचे उल्लंघन केल्यास २ हजार रुपये दंड

Image
·         जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांचे आदेश वाशिम ,   दि. २० (जिमाका) : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत परतलेल्या नागरिकांना ‘ होम क्वारंटाईन ’ च्या सूचना देवूनही ते या सूचनांचे पालन करीत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे आता ‘ होम क्वारंटाईन ’ च्या सूचनांचे नियम न पाळणाऱ्या व्यक्तींकडून २ हजर रुपये दंड वसूल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष हृषीकेश मोडक यांनी दिले आहेत. तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणे व मास्क न वापरल्यास ५०० रुपये दंड वसूल करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात ३१ मे पर्यंत संचारबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. तसेच जिल्ह्यात परतलेल्या नागरिकांना ‘ होम क्वारंटाईन ’ च्या नियमांचे पालन करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. मात्र, या नागरिकांकडून ‘ होम क्वारंटाईन ’ च्या नियमांचे पालन होत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे ‘ होम क्वारंटाईन ’ च्या नियमांचे काटेकोरपणे पालन न करणाऱ्या व्यक्तींकडून यापुढे २ हजार रुपये दंड वसूल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्री. मोडक यां

बाहेर जिल्ह्यातून आलेल्या मजुरांची काळजी घ्या - पालकमंत्री शंभूराज देसाई

Image
·         परराज्यात, परजिल्ह्यातील मजुरांना परत आणण्यासाठी प्रयत्न ·         प्रत्येकाची आरोग्य तपासणी होणे आवश्यक ·         पात्र लाभार्थ्याला अन्नधान्य वाटप करा वाशिम ,   दि. १५ (जिमाका) : लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर  परजिल्ह्यात, परराज्यात असलेले मजूर जिल्ह्यात परतले आहेत. या मजुरांची काळजी घ्या, त्यांची आरोग्य तपासणी करून योग्य मार्गदर्शन करा. तसेच विलगीकरण कक्षात त्यांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्या, अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या. कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी आज, १५ मे रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वार झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, खासदार भावना गवळी, आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक, जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये सहभागी झाल

वाशिम जिल्ह्यातून बाहेर जाण्यासाठी, जिल्ह्यात येण्यासाठी ई-पास आवश्यक

·          घरबसल्या मिळणार ई-पास ·          संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक वाशिम , दि. ०२ : वाशिम जिल्ह्यात येण्यासाठी तसेच वाशिम जिल्ह्यातून महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात जाण्यासाठी मजूर, कामगार, पर्यटक, भाविक, विद्यार्थी व इतर व्यक्तींनी ई-पास प्राप्त करून घेणे अनिवार्य आहे.   https://covid 19. mhpolice.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करून ई-पास घरबसल्या प्राप्त करून घेण्याची सुविधा निर्माण करून देण्यात आली आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. या संकेतस्थळावर ई-पास मिळविण्यासाठी अर्ज करतांना सुरुवातीला ‘जिल्हा/पोलीस आयुक्तालय’ या पर्यायाच्या ठिकाणी तुम्ही सध्या ज्या जिल्ह्यात अथवा पोलीस आयुक्तालय क्षेत्रात अडकलेले आहात त्या जिल्हा अथवा शहराची निवड करावी. त्यानंतर अर्जामध्ये नमुद माहिती अचूकपणे भरावी. संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरताना फोटो , आधारकार्ड अथवा फोटो असलेले ओळखपत्र तसेच कोविड-१९ विषयक लक्षणे नसल्याचा वैद्यकीय तपासणी अहवाल स्कॅन करून अपलोड करणे अनिवार्य आहे. ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर मिळणारा टोकन क्रमांक जतन करून ठेवा. तुम्ही सध्या जेथे अडकलेले आहात तेथ