Posts

Showing posts from January, 2018

युवकांना संधी : विवेकशील समाज घडविण्यासाठी उचलले पाऊल

Image
   शासनाचा ‘ सोशल मीडिया महामित्र ’ उपक्रम ·          मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीने डिजिटल प्रशस्तीपत्र , सोशल मिडिया महामित्र पुरस्कार ·          समाज माध्यमांच्या सदुपयोगाबाबत ५ ते १७ मार्च दरम्यान गटचर्चा ·          सहभागी होण्यासाठी १ ते १८ फेब्रुवारीपर्यंत नोंदणी वाशिम,   दि. २९ :   राज्य शासनाने आधुनिक युगातील वेगवान संपर्क साधनांचा विधायक   कार्यासाठी   उपयोग करुन घेण्यासाठी   आणि   तरुणांना जास्तीत जास्त संधी देवून विवेकशील समाज घडविण्यासाठी ‘ सोशल मीडिया महामित्र’ राबविण्याचा निर्धार केला आहे . आधुनिक काळात सोशल मीडिया अत्यंत प्रभावी झाला आहे .   बहुतांश युवक मीडियावर सक्रिय असतात .   सोशल मीडिया आता मनोरंजनाचे साधन न राहता ज्ञान उपलब्ध करुन घेण्याचे प्रभावी साधन ठरले आहे .   लोकांची मने आणि मते घडविण्याची ताकद सोशल मीडियामध्ये असल्याचे अनेकदा सिध्द झाले आहे .   देशातील बहुतांश युवक फेसबुक ,   व्हॉट्सॲप ,   इन्स्टाग्राम ,   ट्विटर आदींचा मोठ्या प्रमाणात वापर करतात .   त्यामुळे शासनाने सोशल मीडियाची ताकद जाणून ‘ सोशल मीडिया महामित्र ’ उपक्रम राबविण्याचा   ठरव

कृषि विकास योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न - पालकमंत्री संजय राठोड

Image
·          प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस कवायत मैदान येथे ध्वजारोहण ·         नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पात १४९ गावांचा समावेश ·         ग्रामीण, शहरी भागातील पाणी टंचाई निवारणार्थ कृती आराखडा तयार वाशिम , दि. २६ : शेतीला संरक्षित सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासह कृषि व कृषिपूरक उद्योगांच्या विकासाला गती देण्यासाठी शासन विविध योजना राबवीत आहे. या योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे प्रतिपादन महसूल राज्यमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त येथील पोलीस कवायत मैदानावर आयोजित मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमात ते बोलत होते. सर्वप्रथम पालकमंत्री श्री. राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, आमदार राजेंद्र पाटणी, वाशिमचे नगराध्यक्ष अशोक हेडा, प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, अपर जिल्हाधिकारी दिनेश वानखडे, निवासी उपजिल्हाधिकार

स्मार्टफोन, इंटरनेटचा वापर करताना सावधगिरी बाळगा - अपर पोलीस अधीक्षक स्वप्ना गोरे

Image
·         सायबरविषयक जाणीवजागृती कार्यक्रम ·         जिल्हा पोलीस दल, जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने आयोजन ·         विविध सायबर गुन्हे, इंटरनेटचा सुरक्षित वापराविषयी मार्गदर्शन वाशिम , दि . २३ : स्मार्टफोन, इंटरनेटचा वापर हा आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे. मात्र इंटरनेटचा वापर तसेच स्मार्टफोनमधील विविध अॅपचा वापर करताना आवश्यक खबरदारी न घेतल्यास सायबर गुन्हेगार आपली माहिती किंवा बँक खात्यातील रक्कम लंपास करू शकतात. तसेच आपला मोबाईल, संगणक हॅक करून शकतात. त्यामुळे स्मार्टफोन तसेच संगणकाच्यामाध्यमातून इंटरनेटचा वापर करताना प्रत्येकाने सावधगिरी बाळगली पाहिजे व सुरक्षिततेच्या उपाययोजनांचा वापर केला पाहिजे, असे अपर पोलीस अधीक्षक स्वप्ना गोरे यांनी सांगितले. ‘ट्रान्सफोर्मिंग महाराष्ट्र’ उपक्रमांतर्गत जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस दल आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्यावतीने प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसाठी आयोजित सायबर जाणीवजागृती कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी पोलीस उपअधीक्षक (गृह) किरण धात्रक, सायबर सेलचे पोलीस निरीक्षक

पोलीस शिपाई भरतीत खेळाडूंना ५ टक्के आरक्षण; आवश्यक प्रमाणपत्रे प्राप्त करून घेण्याचे आवाहन

वाशिम  : सन २०१८ ची पोलीस शिपाई भरती प्रक्रियेची जाहीरात दि. ५ फेब्रुवारी २०१८ रोजी प्रसिध्द होण्याची शक्यता आहे . तरी पोलीस भरतीसाठी इच्छुक खेळाडू उमेदवारांनी त्यांच्या खेळाच्या प्रमाणपत्रांची संबंधीत विभागीय उपसंचालक यांच्या कडून पडताळणी करुन त्याबाबतचा अहवाल दि. ५ फेब्रुवारी २०१८ पर्यंत पूर्वी प्राप्त करुन घ्यावा, असे जिल्हा पोलीस प्रशासनाच्यावतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. खेळाडू उमेदवारांनी त्यांच्या खेळाच्या प्रमाणपत्रांची संबंधित विभागीय उपसंचालक यांच्याकडून पडताळणी केल्याबाबतचे विहीत कालावधीतील प्रमाणपत्र अर्जासोबत नसल्यास अर्जदाराचा खेळाडू संवर्गातून विचार करण्यात येणार नसल्याचे या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय , निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी ५ टक्के आरक्षण देण्यासंदर्भात शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दि. १ जुलै २०१६ रोजीच्या शासन निर्णयानुसार सर्वसमावेशक सुचना निर्गमित केलेल्या आहेत . त्यानुसार खेळाडू उमेदवारांने नोकरीसाठी अर्ज करण्यापूर्वीच सुधारीत तरतुदीनुसार विभागीय उपसंचालक यांचेकडून खेळाच्

कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांनी बँकेशी संपर्क साधण्याचे आवाहन

राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ अंतर्गत ज्या शेतकऱ्यांना अर्थिक लाभ मिळालेले नाहीत, अशा शेतकऱ्यांनी ज्या बँकेतून पीक कर्ज त्या संबंधित बँकेच्या शाखांकडे योग्य त्या पुराव्यासह दि. ३१ जानेवारी २०१८ पर्यंत संपर्क साधावा व आपले पात्रता अथवा अपात्रतेबाबतची खातरजमा करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांनी केले आहे .      शेतकरी सन्मान योजनेद्वारे ज्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरले असतील . परंतु ज्यांना या योजनेद्वारे अद्याप कोणतेही अर्थिक लाभ मिळालेले नाहीत . अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयकृत बँक, खाजगी बँका व विदर्भ कोकण ग्रामीण बँक आदी बँकाच्या संबंधित शाखांमध्ये शाखानिहाय याद्या ( न ताळमेळ झालेली ) प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत . तरी ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केलेला आहे आणि अद्याप या योजनेंतर्गत कोणतही अर्थिक लाभ मिळालेले नाहीत, अशा शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतलेल्या संबंधित बँकेच्या शाखांकडे योग्य त्या पुराव्यासह (ऑनलाईन अर्ज, कर्जखाते उतारा, आधारकार्ड इत्यादी) दि. ३१ जानेवारी २०१८ पर्यंत संपर्क साधा

जिल्ह्याच्या विकासासाठी पायाभूत सुविधा निर्मितीवर विशेष भर - पालकमंत्री संजय राठोड

Image
·         नियोजनभवन, विश्रामभवन इमारतींचे उद्घाटन वाशिम ,   दि .   १७ :   शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानासारख्या विविध योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करून जिल्ह्याचा विकास साधण्याचा प्रयत्न सुरु आहे. तसेच जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी पायाभूत सुविधा निर्मितीवर विशेष भर दिला जात असल्याचे प्रतिपादन महसूल राज्यमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. नियोजन भवन व नवीन विश्राम भवन इमारतीच्या उद्घाटनानिमित्त जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र विधीमंडळाच्या पंचायती राज समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर पारवे, जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, पंचायती राज समितीचे सदस्य आमदार चरण वाघमारे, आमदार भरत गोगावले, आमदार वीरेंद्र जगताप, जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता काशिनाथ गाडेकर आदी उपस्थित हो

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांचे कृषी, जलसंधारणविषयी सादरीकरण

Image
वाशिम , दि . ०८ : नीती आयोगामार्फत दि. ४ व ५ जानेवारी २०१७ रोजी देशातील निवडक ११५ जिल्ह्यांचे प्रभारी अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्यासाठी नवी दिल्ली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रामध्ये ‘ट्रान्सफॉर्मिंग इंडिया-२०२२’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला दि. ५ जानेवारी रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उपस्थित राहून सहभागी अधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी निवडक सहा अधिकाऱ्यांच्या गटांना सादरीकरणाची संधी मिळाली. यामध्ये वाशिमचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी कृषी व जलसंधारण या विषयावर सादारीकरण केले. यावेळी संबंधित विभागांचे केंद्रीय मंत्री, नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांच्यासह उच्चस्तरीय अधिकारी उपस्थित होते. देशातील ११५ मागास जिल्ह्याचा कालबद्ध विकास करण्यासाठी राज्य शासनाच्या सहयोगाने नीती आयोग ‘ कन्वर्जन्स, इन्टग्रेशन अँड फोकस्ड अटेंशन टू बॅकवर्ड डिस्ट्रिक्टस्’ हा उपक्रम राबविणार आहे. या अनुषंगाने नीती आयोगामार्फत संबंधित जिल्ह्यासाठी नियुक्त प्रभारी अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्यासाठी ‘ट

कृषी विकासाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर प्रशासनाचा विशेष भर - जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी

Image
·          ‘सिद्धी २०१७, संकल्प २०१८’ उपक्रमांतर्गत पत्रकारांशी संवाद वाशिम , दि . ०२ : शेती हा जिल्ह्याच्या अर्थकारणाचा पाया असून आगामी वर्षात कृषी विकासासाठी शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर प्रशासनाचा विशेष भर राहणार आहे. विशेषतः मृद व जलसंधारणाची जास्तीत जास्त कामे पूर्ण करून जिल्ह्याच्या संरक्षित सिंचन क्षमतेत वाढ करणे, शेतकऱ्यांच्या विकासाला प्राधान्य देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आज पत्रकार बांधवांशी बोलताना सांगितले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ‘सिद्धी २०१७, संकल्प २०१८’ उपक्रमांतर्गत या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी म्हणाले की, जलयुक्त शिवार अभियानातून जिल्ह्यात गेल्या तीन वर्षात ७ हजार ६९४ कामे पूर्ण झाली असून त्यामुळे १ लक्ष २ हजार १०६ हेक्टर क्षेत्राला संरक्षित सिंचनाची सोय झाली आहे. सन २०१६-१७ मध्ये पूर्ण झालेल्या १९९९ कामांपैकी १९५६ कामांचे जिओ टॅगिं