पोलीस शिपाई भरतीत खेळाडूंना ५ टक्के आरक्षण; आवश्यक प्रमाणपत्रे प्राप्त करून घेण्याचे आवाहन

वाशिम : सन २०१८ ची पोलीस शिपाई भरती प्रक्रियेची जाहीरात दि. ५ फेब्रुवारी २०१८ रोजी प्रसिध्द होण्याची शक्यता आहे. तरी पोलीस भरतीसाठी इच्छुक खेळाडू उमेदवारांनी त्यांच्या खेळाच्या प्रमाणपत्रांची संबंधीत विभागीय उपसंचालक यांच्या कडून पडताळणी करुन त्याबाबतचा अहवाल दि. ५ फेब्रुवारी २०१८ पर्यंत पूर्वी प्राप्त करुन घ्यावा, असे जिल्हा पोलीस प्रशासनाच्यावतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. खेळाडू उमेदवारांनी त्यांच्या खेळाच्या प्रमाणपत्रांची संबंधित विभागीय उपसंचालक यांच्याकडून पडताळणी केल्याबाबतचे विहीत कालावधीतील प्रमाणपत्र अर्जासोबत नसल्यास अर्जदाराचा खेळाडू संवर्गातून विचार करण्यात येणार नसल्याचे या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय, निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी ५ टक्के आरक्षण देण्यासंदर्भात शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दि. १ जुलै २०१६ रोजीच्या शासन निर्णयानुसार सर्वसमावेशक सुचना निर्गमित केलेल्या आहेत. त्यानुसार खेळाडू उमेदवारांने नोकरीसाठी अर्ज करण्यापूर्वीच सुधारीत तरतुदीनुसार विभागीय उपसंचालक यांचेकडून खेळाच्या प्रमाणपत्राची पडताळणी करून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे खेळाडू उमेदवाराने अर्जासोबत विभागीय उपसंचालक यांनी क्रीडा प्रमाणपत्र योग्य असल्याबाबत व खेळाडू कोणत्या संवर्गासाठी पात्र ठरतो, याबाबत प्रमाणित केलेले प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहील. वरील प्रमाणे पडताळणी केलेल्या क्रिडा प्रमाणपत्राची प्रत अर्जासोबत जोडली नसल्यास उपरोक्त शासन निर्णयातील तरतुदीनुसार उमेदवाराचा खेळाडू संवर्गातून विचार करता येत नाही, असे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पत्रकात म्हटले आहे.  

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे