Posts

Showing posts from September, 2018

भारतीय सैन्याच्या पराक्रमाचा देशवासियांना अभिमान - शैलेश हिंगे

Image
·        जिल्हाधिकारी कार्यालयात ‘शौर्यदिन’ साजरा ·        जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्यावतीने आयोजन वाशिम ,   दि .   २९   :   भारतीय सैनिकांनी २९ सप्टेंबर २०१६ रोजी पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक केला. भारतीय सैन्याच्या या व अशा पराक्रमांचा देशवासियांना अभिमान वाटत असल्याचे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ‘शौर्यदिन’ कार्यक्रमात केले. जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजेश हांडे, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार, जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. विनय राठोड, माजी सैनिक संजय देशपांडे आदी उपस्थित होते. शहिदांच्या स्मृतीचिन्हास पुष्पांजली अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात झाली. श्री. हिंगे म्हणाले की, भारतीय सैनिकांनी चीन, पाकिस्तान विरुध्द झालेल्या युद्धांमध्ये अतुलनीय कामगिरी करून देशाचे नेहमीच संरक्षण केले आहे. दोन वर्षांपूर्वी सीमेपार पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईकची केलेली कारवाई ही अभिमानास्पद होती. या सैनिकांच

नवीन मतदार नोंदणीसाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे - विभागीय आयुक्त पियुष सिंह

Image
·          विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत राजकीय पक्ष प्रतिनिधींची बैठक वाशिम , दि . २६ : राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार दि. १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित प्रारूप मतदार यादी दि. १ सप्टेंबर २०१८ रोजी प्रसिद्धी करण्यात आली आहे. दि. १ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोंबर २०१८ या कालावधीत नवीन मतदार नोंदणी करता येणार असून सर्वच राजकीय पक्षांनी या मोहिमेत सहभागी होऊन नवीन मतदार नोंदणीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आज झालेल्या विविध राजकीय पक्ष प्रतिनिधींसोबतच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजेश हांडे, उपविभागीय अधिकारी शरद जावळे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थिती होते. विभागीय आयुक्त श्री. सिंह म्हणाले, दि. १ जानेवारी २०१९ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या करणाऱ्या व्यक्तींना या मोहिमेदरम्यान मतदार म्हणून नोव नोंदणी करता येणार आहे. याचबरोबर मतदार यादीतील दुरुस्ती, सुधारणाही करता येणार आहे. मयत, दुबार व स्थल

जलयुक्त शिवार अभियान, वृक्ष लागवड मोहिमेचा विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी घेतला आढावा

Image
·          हरित सेना नोंदणीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विशेष प्रयत्न करा वाशिम , दि . २६ : जिल्ह्यात सन २०१८-१९ मध्ये प्रस्तावित जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांच्या अंदाजपत्रकांची सद्यस्थिती व १ ते ३१ जुलै २०१९ दरम्यान राबविण्यात येणाऱ्या ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाच्या नियोजनाचा आढावा आज विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत घेतला. यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, अमरावतीचे कृषि सहसंचालक सुभाष नागरे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, निवासी उपजिल्हाधिकारी तथा रोहयोचे उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कापडे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय अधिकारी के. आर. राठोड , वन विभागाचे सहाय्यक वन संरक्षक अशोक   वायाळ, उपविभागीय अधिकारी शरद जावळे यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. विभागीय आयुक्त श्री. सिंह म्हणाले की, जलयुक्त शिवार अभियानात सन २०१८-१९ मध्ये प्रस्तावि

विभागीय आयुक्त पियुष सिंह यांच्याकडून मतदान केंद्रांची पाहणी

Image
·         संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाचा घेतला आढावा ·         महिला मतदार नोंदणीवर विशेष भर देण्याच्या सूचना वाशिम , दि . २६ : राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार दि. १ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोंबर २०१८ या कालावधीत जिल्ह्यात मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत प्रत्येक बूथवर नवीन मतदारांचे नाव नोंदणी, दुबार व मयत मतदारांचे नाव वगळण्यासाठी अर्ज स्वीकारले जात आहेत. या कामांचा आढावा घेण्यासाठी आज विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी वाशिम तालुक्यातील सुपखेला, कळंबा महाली, ब्रह्मा व शेलू बु. या गावांमधील मतदान केंद्रांना भेट देवून पाहणी केली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजेश हांडे, उपविभागीय अधिकारी शरद जावळे, तहसीलदार बळवंत अरखराव, नायब तहसीलदार दीपक दंडे, मंडळ अधिकारी श्याम जोशी यांची उपस्थिती होते. श्री. सिंह यांनी प्रत्येक मतदान केंद्रावर आतापर्यंत झालेली नवीन मतदार नोंदणी, मतदार यादीतून वगळण्यात आलेली नावे याबाबतची माहिती संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडून घेतली. विभागीय आयुक्त श्र

यंत्रणांनी वृक्ष लागवडीचे सूक्ष्म नियोजन करावे - जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा

Image
३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम ·          जिल्ह्यात ४२ लक्ष ३३ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट वाशिम , दि . २५ : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ५० कोटी वृक्ष लागवड मोहिमेतील अंतिम टप्पा असलेल्या ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत वाशिम जिल्ह्याला ४२ लक्ष ३३ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी आतापासूनच सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत दिल्या. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, निवासी उपजिल्हाधिकारी तथा रोहयोचे उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय अधिकारी के. आर. राठोड , वन विभागाचे सहाय्यक वन संरक्षक अशोक   वायाळ , प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता शिवाजी जाधव, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता निलेश राठोड, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अंबादास मानकर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) तानाजी नरळे यांच्यासह इतर शासकीय

बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानाची व्यापक जनजागृती करा - लक्ष्मीनारायण मिश्रा

वाशिम , दि . २५ : स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी प्रसृतीपूर्व गर्भलिंगनिदान प्रतिबंधक कायदा अस्तित्वात आला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बेटी बचाओबाबत चळवळ उभी झाली आहे. आज समाजाच्या सर्वांगीण हितासाठी बेटी बचाओ आणि बेटी पढाओ या अभियानाची व्यापक जनजागृती करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक  सभागृहात २४ सप्टेंबर रोजी बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानाच्यानिमित्ताने आयोजित सभेत श्री. मिश्रा बोलत होते. यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मोहुर्ले, बाल विकास प्रकल्प अधिकारी श्री. इंगळे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, परीविक्षा अधिकारी गजानन जुमळे यांच्यासह अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. श्री. मिश्रा म्हणाले, जिल्ह्यातील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात व परिसरात बेटी बचाओचे पोस्टर्स लावावेत. प्रत्येक तालुक्यात महिला सरपंच मेळावे घ्यावेत. आशा सेविका व अंगणवाडी सेविका यांचे देखील मेळावे घेऊन व्यापक प्रमाणात अभियानाची जनजागृती करावी, असे त्यांनी सांगितले. श्री. मोहुर्ले म्हणाले, बेटी बचाओ, बेटी पढाओ या

आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या हस्ते शुभारंभ

Image
·        जिल्ह्यातील सुमारे १ लक्ष ३५ हजार कुटुंबांना मिळणार लाभ ·        प्रति कुटुंब ५ लक्ष रुपयांपर्यंत मोफत औषधोपचार वाशिम , दि . २३ :   देशातील गरीब कुटुंबांना मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या हस्ते व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात योजनेच्या लाभार्थ्यांना गोल्डन कार्डचे वाटप करण्यात आले. झारखंडची राजधानी रांची येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा शुभारंभ कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण यावेळी सभागृहात उपस्थितांनी बघितले. यावेळी जिल्हा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, आरोग्य सेवा (कुष्ठरोग)चे सहाय्यक संचालक डॉ. दीपक सेलोकार, डॉ. हेडाऊ उस्पस्थित होते. आयुष्यमान भारत- प्रधानमंत्र

आरोग्यवर्धिनीच्या सेवेतून आरोग्याच्या चिंता दूर होणार - ना. प्रकाश जावडेकर

Image
·         आसेगाव येथे आरोग्यवर्धिनी केंद्राचे उद्घाटन ·         आरोग्यवर्धिनी अंतर्गत १२ आरोग्य सेवांचा समावेश वाशिम , दि . २२ : आजही स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतर विविध सेवेत कमतरता राहिल्या आहेत. गरीब व मध्यम वर्गातील लोकांना आजही अनेक समस्या भेडसावत आहेत. घराचा जर कोणी आजारी पडला तर कुटुंबात अनेक अडचणी निर्माण होतात. प्रधामंत्र्यांच्या महत्वाकांक्षी असलेल्या ‘आयुष्मान भारत’ योजनेंतर्गत देशात दीड लाख आरोग्यवर्धिनी केंद्र सुरु होणार असल्यामुळे आरोग्यवर्धिनीच्या या सेवेतून ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याच्या चिंता दूर होण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले. मंगरूळपीर तालुक्यातील आसेगाव येथे ‘आयुष्मान भारत’ योजनेंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या आरोग्यवर्धिनी केंद्राचे उद्घाटन आज केंद्रीय मंत्री श्री. जावडेकर यांनी केले. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष खासदार संजय धोत्रे, आमदार राजेंद्र पाटणी, भारत सरकारच्या शिपिंग कार्पोरेशनचे संचालक माजी आमदार व

आरोग्यवर्धिनी केंद्रांमुळे ग्रामीण भागात दर्जेदार उपचार मिळणार - ना. प्रकाश जावडेकर

Image
·         शेंदुरजना अढाव आरोग्यवर्धिनी केंद्राचे उद्घाटन वाशिम , दि . २२ : प्राथमिक आरोग्य केंद्रांचा दर्जान्नोती करून ‘आयुष्मान भारत’ योजनेअंतर्गत जिल्ह्यात पाच ठिकाणी सुरु करण्यात आलेल्या ‘आरोग्यवर्धिनी केंद्र’मुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना वेगवेगळ्या १२ प्रकारच्या आरोग्य सुविधा सहज उपलब्ध होईल. यामाध्यमातून स्थानिक पातळीवरच दर्जेदार औषधोपचार मिळण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले. मानोरा तालुक्यातील शेंदूरजना अढाव येथील आरोग्यवर्धिनी केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष खासदार संजय धोत्रे, आमदार राजेंद्र पाटणी, भारत सरकारच्या शिपिंग कार्पोरेशनचे संचालक तथा माजी आमदार विजय जाधव, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री. जावडेकर म्हणाले, वाशिम हा विकासाची आकांक्षा असलेला जिल्हा आहे. या जिल्ह्याला विकसित करण्यासाठी

वाशिम मागास नसून विकासाची आकांक्षा करणारा जिल्हा - ना. प्रकाश जावडेकर

Image
·         किन्हीराजा येथे आरोग्यवर्धिनी केंद्राचे उद्घाटन ·         जिल्ह्यात पाच आरोग्यवर्धिनी केंद्र कार्यान्वित ·         १२ आरोग्य सेवांचा समावेश ·         शेलूबाजार येथे मॉडेल डिग्री कॉलेज वाशिम , दि . २२ : पूर्वी प्राथमिक केंद्रांमध्ये आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळत नव्हत्या. आता मात्र परिस्थिती बदलली असून आरोग्य सुविधेत वाढ झाली आहे. आता हे आरोग्य केंद्रच नसून आरोग्यवर्धिनी केंद्र झाले आहे. वाशिम हा विकासात मागे राहिला आहे. हा मागास जिल्हा नसून विकासाची आकांक्षा करणारा जिल्हा आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले. २२ सप्टेंबर रोजी मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा येथील आरोग्यवर्धिनी केंद्राचे उद्घाटन श्री. जावडेकर यांनी केले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष खासदार संजय धोत्रे, आमदार अमित झनक, आमदार राजेंद्र पाटणी, भारत सरकारच्या शिपिंग कार्पोरेशनचे संचालक तथा माजी आमदार विजय जाधव, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते केनवड आरोग्यवर्धिनी केंद्राचे उद्घाटन

Image
वाशिम , दि . २२ : ‘आयुष्मान भारत’ या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत रिसोड तालुक्यातील केनवड येथे सुरु करण्यात आलेल्या आरोग्यवर्धिनी केंद्राचे उद्घाटन आज केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष खासदार संजय धोत्रे, खासदार भावना गवळी, आमदार अमित झनक, आमदार राजेंद्र पाटणी, भारत सरकारच्या शिपिंग कार्पोरेशनचे संचालक तथा माजी आमदार विजय जाधव, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीचे सभापती सुधीर गोळे, पंचायत समिती सभापती छाया गवई उपस्थित होते. यावेळी बोलताना श्री. जावडेकर म्हणाले, ‘आयुष्मान भारत’ योजनेद्वारे देशातील गरीब कुटुंबातील नागरिकांना पाच लाख रुपयांपर्यतचे औषधोपचार मोफत देण्याचा क्रांतिकारी निर्णय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. या योजनेचा लाभ देशातील सुमारे ५० कोटी लोकांना होणार आहे. तसेच याच योजनेंतर्गत सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध क

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर शनिवारी वाशिम जिल्ह्यात

Image
·         जिल्ह्यातील 5 आरोग्यवर्धिनी केंद्रांच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती वाशिम , दि. 20 : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर हे शनिवार , दि. 22 सप्टेंबर 2018 रोजी वाशिम जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. श्री. जावडेकर हे दि. 22 रोजी सकाळी 8 वाजता अकोला मोटारीने येथून शेलुबाजारकडे प्रयाण करतील. सकाळी 8.45 वाजता त्यांचे शेलुबाजार येथे आगमन होईल. याठिकाणी आयोजित आरोग्यवर्धिनी केंद्राच्या (हेल्थ अँड वेलनेस सेंटर) उद्घाटन कार्यक्रमास ते उपस्थित राहतील. सकाळी 9.30 वाजता ते शेलुबाजार येथून किन्हीराजाकडे प्रयाण करतील. सकाळी 10 वाजता त्यांचे किन्हीराजा येथे आगमन होईल व याठिकाणी होणाऱ्या आरोग्यवर्धिनी केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमास ते उपस्थित राहतील.               श्री. जावडेकर हे सकाळी 11 वाजता ते किन्हीराजा येथून आसेगावकडे प्रयाण करतील. सकाळी 11.30 वाजता त्यांचे आसेगाव येथे आगमन होईल व येथील आरोग्यवर्धिनी केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमाला ते उपस्थित राहतील. दुपारी 12.30 वाजता ते आसेगाव येथून शेंदूरजनाकडे प्रयाण करतील. दुपारी 1 वाज

सिंचन विहिरी पूर्ण करण्याच्या कामास गती द्या - खासदार भावना गवळी

Image
·          ‘दिशा’ समितीच्या बैठकीय विविध योजनांविषयी चर्चा ·          ११ कलमी कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना ·          आरोग्य, पाणी पुरवठा, रस्ते विकास योजनांच्या सद्यस्थितीचा आढावा वाशिम ,   दि .   १४ :   शेतीला सिंचनाची सुविधा निर्माण होण्यासाठी जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सुरु असलेल्या विहिरींची कामे जलद गतीने होणे आवश्यक आहे. ही कामे विहित कालावधीत होण्यासाठी पंचायत समिती स्तरावरून सातत्याने पाठपुरावा करून विहिरी पूर्ण करण्यासाच्या कामास गती देण्याच्या सूचना खासदार भावना गवळी यांनी दिल्या. १४ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आयोजित जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती (दिशा)च्या सभेत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष हर्षदा देशमुख, मानोरा पंचायत समितीच्या सभापती धनश्री राठोड, वाशिमचे नगराध्यक्ष अशोक हेडा, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, निवासी उपजिल्हाधिकारी तथा रोहयोचे उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा ग्रामीण