‘पाण्याचा कार्यक्षम वापर अभियान’चा जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या हस्ते शुभारंभ
·
‘नाबार्ड’
मार्फत आयोजित उपक्रम
·
वाशिम
जिल्ह्यात ८४ गावांमध्ये होणार जनजागृती
वाशिम,
दि. ०३ : राष्ट्रीय कृषि व ग्रामीण विकास बँक अर्थात
नाबार्डच्यावतीने पाण्याच्या कार्यक्षम वापरासाठी अभियान हाती घेण्यात आले असून या
अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या हस्ते
४ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे झाला. पाण्याच्या कार्यक्षम वापराविषयी
जनजागृती करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या चित्ररथाला जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी हिरवी
झेंडी दाखविली.
यावेळी नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक विजय खंडरे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक दत्तात्रय
निनावकर यांच्यासह विविध बँकांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. ‘नाबार्ड’मार्फत
राज्यातील १० जिल्ह्यांमधील ५०० गावांमध्ये पाण्याच्या कार्यक्षम वापराविषयी
जनजागृती करण्यासाठी अभियान हाती घेण्यात आले आहे. वाशिम जिल्ह्यातील ८४ गावांमध्ये
या अभियाना अंतर्गत जनजागृती केली जाणार आहे.
या अभियानादरम्यान तुषार सिंचन, ठिबक सिंचन व मडक्याच्या सहाय्याने
सिंचन करून कृषि क्षेत्रात पाण्याच्या कार्यक्षम वापर करण्याबाबत जनजागृती करण्यात
येत आहे. राज्यात उपलब्ध असलेल्या पाण्यापैकी ८० टक्के पेक्षा अधिक पाण्याचा वापर
हा कृषि क्षेत्रासाठी होतो, त्यामुळे या विषयावरील अभियानाची निवड करण्यात आली
आहे. नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक श्री. खंडरे यांनी यावेळी अभियानाविषयी
माहितीचे सादरीकरण केले.
Comments
Post a Comment