आरोग्य शिक्षण आणि स्वच्छतेत सर्वांचा पुढाकार महत्वाचा - सभापती गजानन भोने
·
वाशिम येथे
तालुकास्तरीय पोषण अभियान कार्यशाळा
·
पाककृती स्पर्धेचे
आयोजन
·
मिझल्स
रुबेला, कुष्ठरोगबाबत जनजागृती
·
स्वच्छता व
‘लोकराज्य’चे महत्व विषद
वाशिम, दि. १४ : जिल्ह्यातील सर्व बालके सदृढ असली पाहिजेत. एकही बालक
कुपोषणाच्या श्रेणीत नसावा. घर, परिसर स्वच्छ ठेवला तर गाव स्वच्छ होईल. स्वच्छता
असेल तर आरोग्य चांगले राहील. आरोग्य शिक्षण आणि स्वच्छतेत सर्वांचा पुढाकार
महत्वाचा आहे, असे प्रतिपादन वाशिम पंचायत समितीचे सभापती गजानन भोने यांनी केले.
आज
जिजाऊ सभागृहात महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने तालुकास्तरीय पाककृती स्पर्धा
आणि मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आहार शिजविणाऱ्या महिलांसाठी
आयोजित तालुका पोषण अभियान कार्यशाळेचे अध्यक्ष म्हणून श्री. भोने बोलत होते.
प्रमुख
अतिथी म्हणून जिल्हा मानव विकास समितीचे सदस्य सुभाष चौधरी, उप मुख्य कार्यकारी
अधिकारी नितीन मोहुर्ले व सुदाम इस्कापे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, कुष्ठरोगचे
सहाय्यक संचालक डॉ. दीपक सेलोकार, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, वाशिमचे
सहाय्यक गट विकास अधिकारी निलेश वानखेडे, बालविकास प्रकल्प अधिकारी अनिल चौधरी,
युनिसेफचे प्रतिनिधी डॉ. महात्मे, गट शिक्षणाधिकारी गजानन बाजड यांची उपस्थिती
होती.
श्री.
भोने म्हणाले, पोषण अभियान ही लोकचळवळ झाली पाहिजे. या अभियानात सर्वांनी मनापासून
योगदान द्यावे. अंगणवाडीत शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक बालकाचे, स्तनदा माता व गर्भवती
महिला यांची घेतली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
श्री.
चौधरी म्हणाले, मागास असलेल्या वाशिम जिल्ह्यात अनेक योजना राबविण्यात येत आहेत. जिल्हा
कुपोषणमुक्त झाला पाहिजे. अंगणवाडी व शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या बालकांना दर्जेदार
पोषण आहार मिळाला पाहिजे. प्रत्येक बालकांच्या शिक्षण व आरोग्याकडे लक्ष दिले
पाहिजे, असे ते म्हणाले.
यावेळी
बोलताना श्री. मोहुर्ले म्हणाले, पोषण अभियानातून बालकांच्या आरोग्याची काळजी
घेण्यासोबतच त्यांचे कुपोषण दूर करण्याचे काम या अभियानातून करण्यात येणार आहे. ०
ते ६ वर्षे वयोगटातील मुले, किशोरवयीन मुली, स्तनदा माता, गर्भवती महिला यांची
काळजी घेण्याच्या बाबतीत प्रत्येकाने जागृत असले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
श्री.
इस्कापे म्हणाले, स्वच्छतेच्या बाबतीत प्रत्येकाने जागृत राहिले तर आजारी पडण्याची
वेळ येणार नाही. त्यामुळे आरोग्यावर होणारा अनाठायी खर्च वाचण्यास मदत होईल.
पाण्याचा योग्य व काटकसरीने वापर केला पाहिजे. सांडपाण्याचा योग्य निचरा केला पाहिजे.
शौचालयाचा नियमितपणे वापर केला तर रोगराई पसरणार नाही, असे ते म्हणाले.
डॉ.
आहेर म्हणाले, येत्या नोव्हेंबर महिन्यात ९ महिने ते १५ वर्षांखालील सर्व बालकांना
मिझल्स रुबेला लस देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ३ लाख ५८ हजार बालकांना या
लसीकरणाचा लाभ होणार आहे. जिल्ह्यातील वरील वयोगटातील बालक लसीकरणापासून वंचित
राहणार नाही, यासाठी या मोहिमेत सर्वांचा सहभाग महत्वाचा असल्याचे त्यांनी
सांगितले.
डॉ.
सेलोकार म्हणाले, जिल्ह्यातून कुष्ठरोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी प्रत्येकाचा
सहभाग महत्वाचा आहे. प्रत्येकाने स्वतःहून डॉक्टरांकडे जावून कुष्ठरोगाबाबत तपासणी
केली पाहिजे, असे ते म्हणाले.
श्री.
खडसे यावेळी म्हणाले, पोषण अभियानाला जिल्ह्यात लोक चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले
आहे. या अभियानामुळे भविष्यात जिल्ह्यात कुपोषित बालके आढळणार नाहीत. देशाचे
उज्ज्वल भविष्य असलेल्या बालकांना नोव्हेंबर महिन्यात मिझल्स व रुबेलाचे लसीकरण करून
या आजाराचे देशातून उच्चाटन करण्यास मदत करावी. नागरिकांना शासनाच्या विविध
योजनांची माहिती व्हावी व त्यामाध्यमातून योजनांचा लाभ घेता यावा, यासाठी लोकराज्य
मासिकाचे मोठ्या संख्येने वर्गणीदार व्हावे, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
यावेळी
युनिसेफचे प्रतिनिधी डॉ. महात्मे यांनी उपस्थितांना मिझल्स रुबेला लसीकरणाबाबतची
विस्तृत माहिती दिली.
प्रारंभी
मान्यवरांनी राष्ट्रमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार
अर्पण केले. यावेळी पोषण अभियानानिमित्त आयोजित पाककृती स्पर्धेचे उद्घाटन पंचायत
समिती सभापती गजानन भोने यांनी फीत कापून केले. सदृढ बालक स्पर्धेतील विजेत्या
बालक व मातांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ व भेटवस्तू देवून सन्मानित करण्यात
आले. शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत जाव्यात, यासाठी शासनाचे मुखपत्र असलेल्या
लोकराज्य या मासिकाचा स्टॉल देखील सभागृहाच्या प्रवेशद्वारा शेजारी लावण्यात आला
होता. कार्यशाळेला विस्तार अधिकारी मदन नायक, केशवराव वाबडे, डॉ. डावरे, वाशिम
पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या केंद्र शाळांचे केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, अंगणवाडी
सेविका, मदतनीस व आहार शिजवणाऱ्या बचत गटांच्या महिला सदस्य मोठ्या संख्येने
उपस्थित होत्या.
*****
Comments
Post a Comment