Posts

Showing posts from October, 2016

नगरपरिषद निवडणुकांमध्ये आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करणार - जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी

Image
·         पूर्व तयारीच्या अनुषंगाने पत्रकारांशी संवाद ·         निवडणूक सनियंत्रण समिती स्थापन होणार ·         नोडल अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या वाशिम , दि . १९ : जिल्ह्यातील तीन नगरपरिषदांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून त्यासाठी दिनांक १७ ऑक्टोंबर २०१६ पासून आचारसंहिता लागू झाली आहे. जिल्ह्यातील तीनही नगरपरिषद क्षेत्रात या आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार असून यासाठी निवडणूक सनियंत्रण समिती स्थापन करण्यासह इतर उपाययोजना करणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले. याप्रसंगी वाशिमचे उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. संदीपान सानप व मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गणेश शेटे, नगरपालिका प्रशासन विभागाचे श्याम जोशी उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले की, जिल्ह्यातील वाशिम, कारंजा व मंगरूळपीर या तीन नगरपरिषदांसाठी २७ नोव्हेंबर २०१६ रोजी मतदान होणार आहे. याकरिता दिनांक २४ ते २९ ऑक्टोंबर २०१६ या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणा

मतदार यादीत नाव नोंदविणे ही प्रत्येकाची जबाबदारी - जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी

Image
·         शासकीय विभाग प्रमुखांची बैठक ·         पदवीधर मतदार यादीत नाव नोंदणीचा आढावा वाशिम , दि . १७ :   मतदार यादीमध्ये नाव नोंदविणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. सध्या सुरु असलेल्या पदवीधर मतदार नाव नोंदणी अंतर्गत सर्व शासकीय विभाग प्रमुखांनी आपल्या अधिनस्त अधिकारी व कर्मचारी यांचे पदवीधर मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्यास प्राधान्य द्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य सभागृहात झालेल्या सर्व शासकीय विभाग प्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी पी. एस. पाटील यांच्यासह सर्व शासकीय विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले, भारत निवडणूक आयोग यांच्या निर्णयानुसार यापूर्वीची पदवीधर मतदार यादी रद्द करण्यात आली आहे. नवीन मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्यासाठी दिनांक ५ नोव्हेंबर २०१६ पर्यंत नाव नोंदणी मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये जिल्ह्यातील सर्व पदवीधर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचे नाव नोंदणी करण्याबाबत यापूर्वीच सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानु

लोकसहभागातून जलसंवर्धन चळवळ वाढविण्याची गरज -जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी

Image
·         जलयुक्त शिवार अभियान विषयक बैठक ·         जलसंवर्धन विषयक काम करणाऱ्या मान्यवरांचा सहभाग वाशिम , दि . १६ :   दुष्काळाचे संकट दूर करण्यासाठी राज्य शासन जलयुक्त शिवार अभियान राबवीत आहे. यामाध्यमातून जलसंवर्धनासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र लोकसहभागातून व श्रमदानातून ही चळवळ वाढविण्याचा प्रयत्न असून याकरिता जिल्ह्यातील जास्तीत जास्त गावांमधील नागरिकांनी पुढे यावे, असे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी म्हणाले. जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान प्रभावीपणे राबविण्याबाबत जलसंवर्धन विषयक काम करणाऱ्या मान्यवरांसोबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी म्हणाले की, कोणत्याही कामामध्ये लोकसहभाग मिळाल्याशिवाय ते काम यशस्वी होत नाही. त्यामुळे जलसंवर्धन चळवळीला शाश्वत स्वरूप द्यायचे असेल, तर त्यामध्ये लोकसहभाग वाढणे आवश्यक आहे. लोकांनी आपले गाव जलयुक्त करण्यासाठी सकारात्मक विचारांसह पुढे यावे. श्रमदानाच्या माध्यमातून गावांमध्ये जलसंधारणाची कामे सुरु करावीत. अशा कामांना प्रशासनाकडून आवश्यकतेनुसार सहकार्य केले जाईल. आपल्या गावासाठी पाणी उपलब्ध करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला पाह

पदवीधर मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करण्याचे आवाहन

वाशिम , दि . १५ : भारत निवडणूक आयोगाने दिनांक १ नोव्हेंबर २०१६ या अर्हता दिनांकावर आधारित अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतदार यादीमध्ये नोंदणी कार्यक्रम घोषित केला आहे. यापूर्वी नोंदणी करण्यात आलेली जुनी सर्व नोंदणी व मतदार याद्या रद्द झाल्यामुळे सर्व पदवीधरांची नव्याने नोंदणी करण्यात येत आहे. तरी अद्याप नाव नोंदणी न केलेल्या पदवीधारकांनी आपले नाव मतदार यादीमध्ये नोंदविण्याचे आवाहन विभागीय आयुक्त तथा अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाचे नाव नोंदणी अधिकारी जे. पी. गुप्ता यांनी केले असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. पदवीधर मतदार यादीमध्ये नाव नोंदणी नमुना १८ द्वारे दिनांक ५ नोव्हेंबर २०१६ पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.  दिनांक १९ नोव्हेंबर २०१६ पर्यंत हस्तलिखीत तयार करणे व प्रारूप मतदार याद्यांची छपाई, दिनांक २३ नोव्हेंबर २०१६ रोजी प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी, दिनांक २३ नोव्हेंबर २०१६ ते दिनांक ८ डिसेंबर २०१६ या कालावधीत दावे व हरकती स्वीकारणे , दावे व हरकती निकाली काढण्याचा दिनांक व पुरवणी यादी तयार करणे व छपाई करणे दिनांक २६ डिसेंबर २०१६ असून दि

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वाशिम येथे २३५ कोटी रुपयांच्या विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन

Image
·         वाशिम जिल्हा समृद्ध करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्याची ग्वाही ·         बॅरेजमधून उपसा सिंचन, कृषिपंपांसाठी ११४ कोटी रुपये ·         दोन वर्षात ११ हजार गावे दुष्काळमुक्त होणार ·         सोयाबीन आधारित प्रक्रिया उद्योग उभारण्यात येणार वाशिम , दि . ०७ : वाशिम जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या २३५ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा लोकार्पण व भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज वाशिम येथे संपन्न झाले. पाटणी कमर्शियल कॉम्प्लेक्स येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट, जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील, ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार, जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदाताई देशमुख, खासदार संजय धोत्रे, आमदार सर्वश्री गोपीकिशन बाजोरिया, लखन मलिक, राजेंद्र पाटणी, अमित झनक, गोवर्धन शर्मा, रणजीत सावरकर, सुनील देशमुख, संजय रायमुलकर, वाशिमच्या नगराध्यक्ष लताताई उलेमाले, कारंजाच्या नगराध्यक्ष निश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वाशिम हेलिपॅडवर स्वागत

वाशिम , दि . ०७ : वाशिम जिल्ह्यातील २३५ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांच्या लोकार्पण व भूमिपूजन समारंभासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज वाशिम येथे आले होते. यावेळी त्यांच्या समवेत अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील होते. येथील पोलीस कवायत मैदानवरील हेलिपॅडवर मुख्यमंत्र्यांचे कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर, ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार, जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदाताई देशमुख, आमदार लखन मलिक, आमदार राजेंद्र पाटणी, नगराध्यक्ष लताताई उलेमाले, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी स्वागत केले. *****