Posts

Showing posts from January, 2024

शेगांव येथे २ फेब्रुवारीला विभागीय रोजगार मेळावा

Image
*शेगांव येथे २ फेब्रुवारीला विभागीय रोजगार मेळावा* वाशिम,दि.३१ (जिमाका) जिल्हयातील नोकरी/ रोजगार इच्छूक उमेदवारांना नोकरीच्या संधी प्राप्त व्हाव्यात,या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता, विभागीय आयुक्तालय,अमरावती, संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती व श्री.संत गजानन महाराज अभियांत्रीकी महाविद्यालय,शेगांव यांच्या संयुक्त वतीने २ फेब्रुवारी रोजी श्री.संत गजानन महाराज अभियांत्रीकी महाविद्यालय,शेगांव येथे विभागीय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या विभागीय रोजगार मेळाव्यात पिपल ट्री व्हेन्चर्स प्रा.लि.अमरावती, जिनीअस इंन्फ्रा प्रा.लि.,धुत ट्रॉन्समिशन प्रा.लि.छत्रपती संभाजीनगर,ए.जी.एस.इंशुरन्स, अमरावती,पियाजिओ व्हेवीकल्स प्रा. लि.,परम स्कील्स ट्रेनींग (इं) प्रा. लि. छत्रपती संभाजीनगर,लक्ष्मी अग्णी कंपनी प्रा.लि.,जाधव ग्रुप ऑफ कंपनी,सहयोग मल्टीस्टेट क्रेडीट सो. लि.,नवभारत फर्टीलायझर,टॅलेनसेतू प्रा.लि.,सी.ए.जी.एल.,कल्पतरु स्कील डेव्हलपमेंट अॅकेडमी, इलेगन्ट कोटींग प्रा.लि.,संत तेजस्वी फार्मर प्रोड्युसर कंपनी प्रा. लि.,पी.एन.बी.मेटलाईफ इंडीया इंशुरन्स प्रा.लि.,पिय

शिवस्मृती चित्र रांगोळी कलादालनाला* *हजारो विद्यार्थ्यांच्या भेटी*

Image
*शिवस्मृती चित्र रांगोळी कलादालनाला*  *हजारो विद्यार्थ्यांच्या भेटी* वाशिम दि.३१ (जिमाका) वाशीम येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे सांस्कृतिक कार्य विभाग,सांस्कृतिक कार्य संचालनालय व जिल्हा प्रशासन वाशिमच्या वतीने २७ ते ३१ जानेवारी २०२४ दरम्यान आयोजित महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.           छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० राज्याभिषेक वर्षानिमित्ताने आयोजित या महोत्सवात पटांगणावर शिवस्मृती चित्र - रांगोळी कला दालनाला जिल्ह्यातील विविध शाळांच्या हजारो विद्यार्थ्यांनी भेटी दिल्या.                  शिक्षण विभागाच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी आपापल्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराजांचे वेगवेगळे चित्र रेखाटले आहे.या रेखाटलेल्या सर्व चित्रांचे एकत्रित प्रदर्शन महासंस्कृती महोत्सवात तयार करण्यात आलेल्या स्वतंत्र कलादालनात लावण्यात आले आहेत.तसेच या कलादालनात रिसोड येथील रांगोळी कलाकार प्रतीक्षा साबळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची अश्वारूढ प्रतिमा रांगोळीतून साकारली आहे. जिल्ह्यातील विविध शाळांचे शिक्

वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणारे छत्रपती शिवाजी महाराज*महासंस्कृती महोत्सवात शिवचरित्रावर पी. एस. खंदारे यांचे संगीतमय किर्तन

Image
*वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणारे छत्रपती शिवाजी महाराज* महासंस्कृती महोत्सवात शिवचरित्रावर  पी. एस. खंदारे यांचे संगीतमय किर्तन वाशिम दि.३१(जिमाका) सांस्कृतिक कार्य विभाग,सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि वाशिम जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त वतीने महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन २७ जानेवारी ते ३१ जानेवारीपर्यंत जिल्हा क्रीडा संकुल येथे करण्यात आले आहे.          या कार्यक्रमात संपूर्ण महाराष्ट्रात सुपरिचित असलेले निष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या वेशभूषेत अस्सल व-हाडी भाषेत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या " मानुस द्या मज मानुस द्या " या भजनाने किर्तनाची सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराजानी अस्पृश्यता निवारण करुन,स्त्रीयांना मानसन्मान दिला.शेतकरी,कष्टकरी, बारा बलुतेदार व अठरा आलुतेदारांचा उध्दार केला.लढाईला जाताना मुहुर्त पाहिला नाही की,लढाई गडकिल्ले जिंकल्यावर सत्यनारायण पूजा केली नाही.छत्रपती शिवाजी महाराज हे बहुआयामी व वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणारे,व्यसनविरोधी व रयतेच्या हितासाठी स्वराज्याची स्थापना करणारे आदर्श जाणते राजे होते असे परखड मत पी एस खं

मराठा समाजाचे मागासलेपण* *तपासणीला आता २ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ**प्रगणकाला नागरिकांनी सहकार्य करावे - जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस.यांचे आवाहन

Image
*मराठा समाजाचे मागासलेपण*  *तपासणीला आता २ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ* प्रगणकाला नागरिकांनी सहकार्य करावे - जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस.यांचे आवाहन वाशिम दि.३१ (जिमाका) राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याचे काम करण्यात येत आहे.राज्यातील सर्व ग्रामीण व शहरी भागातील मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.सर्वेक्षणाचे हे काम २३ ते ३१ जानेवारी २०२४ या कालावधीत पूर्ण करण्याच्या सूचना राज्य मागासवर्ग आयोगाने दिल्या होत्या.               मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २० जानेवारी रोजी सर्वेक्षणाबाबत नागरिकांना माहिती व्हावी तसेच सर्वेक्षणासाठी घरी येणाऱ्या प्रगणकाला प्रत्येक घरातून अचूक माहिती दयावी असे आवाहन केले आहे.              मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण करण्यासाठी तहसीलदार यांचे नियंत्रणाखाली प्रगणक आणि पर्यवेक्षक यांची नियुक्ती केली आहे.हे सर्वेक्षण २३ ते ३१ जानेवारी २०२४ या कालावधीत करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणाला २ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.तरी नागरिकांनी सर्वेक्षण कालावधीत

आसू आणि हासू यांचा सुरेख मिलाफ बाबाराव मुसळे आणि अशोक मानकर यांचे कथाकथन

Image
आसू आणि हासू यांचा सुरेख मिलाफ बाबाराव मुसळे आणि अशोक मानकर यांचे कथाकथन वाशीम,दि.३१(जिमाका) आसू आणि हसू ही मानवी जीवनाची अभिन्न अशी दोन अंगे आहेत.या दोहोंत अंतर असते.पण हे अंतर भेदून या दोहोंचा एकाच वेळी प्रत्यय आणून दिला तो जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिक बाबाराव मुसळे आणि विनोदी कथालेखक अशोक मानकर यांनी.           छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हा प्रशासन,वाशिमच्या वतीने वाशीम जिल्हा क्रीडा संकुलात महासंस्कृती महोत्सव " वाशिम जिल्ह्यातील बालभारतीमध्ये समावेश असलेल्या लेखकांचे कथाकथन कार्यक्रमात हे दोन्ही लेखक बोलत होते.                 या महोत्सवात लेखक बाबाराव मुसळे आणि कारंजाचे अशोक मानकर यांचा सहभाग होता.  बाबाराव मुसळे यांनी त्यांची बालभारती इयत्ता सहावीला 'बाकी वीस रुपयांचं काय ?' ही कथा सांगून उपस्थित्यांच्या डोळ्यात पाणी आणले. तर लाक्षणिक अर्थाने यावरचा उतारा म्हणून अशोक मानकर यांनी त्यांची इयत्ता सातवीला असलेली ' गचक अंधारी ' ही कथा सादर करून प्रेक्षकांना मनम

७ हजार ५५२ कुणबी जातीची प्रमाणपत्रे निर्गमित

Image
७ हजार ५५२ कुणबी जातीची प्रमाणपत्रे निर्गमित वाशिम, दि. ३० (जिमाका) : मराठवाडा विभागात मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती विहीत करण्यासाठी न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. ३ नोव्हेंबर २०२३ च्या शासन निर्णयानुसार या समितीची कार्यकक्षा राज्यभर करण्यात आली आहे. समितीच्या वतीने संपूर्ण राज्यात सन १९६७ पूर्वीच्या कुणबी, कुणबी- मराठा, मराठा-कुणबी जातीच्या नोंदी शोधणे तसेच नोंदी आढळलेले अभिलेख संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहे. शासन निर्देशाप्रमाणे जिल्हास्तरावर तसेच तालुकास्तरावर नोंदी शोधण्यासाठी विविध कक्ष, विविध विभाग व मोठ्या प्रमाणात अधिकारी / कर्मचारी यांचा वापर करुन नोंदी शोधण्याचे काम करण्यात आले आहे. जिल्ह्यामध्ये कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी जातीच्या ३ लक्ष ३० हजार ९१७ नोंदी विविध अभिलेखांमध्ये आढळल्या आहे. यामध्ये महसूल विभाग - ३ लक्ष ६ हजार २९६, शिक्षण विभाग- १४ हजार ९६८, नगरपालिका प्रशासन - २ हजार ९९८, भुमि अभिलेख ६ हजार १

यंत्रणांनी सुक्ष्म नियोजनातूनय ोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी सहसचिव इंद्रा मालो आकांक्षित जिल्हा कार्यक्रम आढावा

Image
यंत्रणांनी सुक्ष्म नियोजनातून योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी                                                                                 सहसचिव इंद्रा मालो आकांक्षित जिल्हा कार्यक्रम आढावा वाशिम, दि. 29 (जिमाका)  :  जिल्हयाचे मागासलेपण ओळखून केंद्राने आकांक्षित जिल्हा म्हणून जिल्हयाची निवड केली आहे. मागासलेपण दूर करण्यासाठी यंत्रणांनी सुक्ष्म नियोजनातून केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन शेवटच्या माणसाचे उत्पन्न वाढले पाहिजे यासाठी प्रयत्न करावे. असे निर्देश केंद्र सरकारच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या सहसचिव तथा केंद्र सरकारच्या जिल्हयाच्या प्रभारी अधिकारी श्रीमती इंद्रा मालो यांनी दिले. आज 29 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात विविध यंत्रणांकडून आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाचा आढावा घेतांना श्रीमती मालो बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत व निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांची प्रमुख उपस्थिती होती. श्रीमती मालो म्हणाल्या,

आजच्या लोकशाहीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्य कारभाराची ‍बिजे - प्रा.डॉ.विजय जाधव‘छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवचरीत्र’ या विषयावर महासंस्कृती महोत्सवात व्याख्यान

Image
आजच्या लोकशाहीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्य कारभाराची ‍बिजे                                                                            -   प्रा.डॉ.विजय जाधव ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवचरीत्र’ या विषयावर महासंस्कृती महोत्सवात व्याख्यान वाशिम, दि. 29 (जिमाका)   :  शिवाजी महाराजांच्या काळात राजेशाही पध्दतीची शासन प्रणाली होती. राजेशाही शासन प्रणालीचा विचार करत असतांना राजेशाही शासन प्रणाली ही यशस्वी आहे का जर यशस्वी असती तर लोकशाही का आणली या सगळ्या गोष्टींचा विचार करतांना हे सांगता येईल की, आजच्या लोकशाही व्यवस्थेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्य कारभाराची बीजे आहेत. असे मत राज्यस्थान आर्य महाविद्यालयाचे प्रा. डॉ. विजय जाधव यांनी व्यक्त केले. 28 जानेवारी रोजी जिल्हा क्रीडा संकुल येथे सुरु असलेल्या महासंस्कृती महोत्सवात “छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवचरीत्र” या विषयावर व्याख्यान देतांना प्रा.डॉ.जाधव बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.,अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपजिल्हाधिकारी कैलास देवरे, जिल्हा अधीक्षक भूमी अभ

वासुदेवाच्या भूमिकेतून प्रदीप पट्टेबहादूर व संचाने सादर केले वासुदेवाची वारी लोकनृत्य

Image
वासुदेवाच्या भूमिकेतून प्रदीप पट्टेबहादूर व संचाने सादर केले वासुदेवाची वारी लोकनृत्य   वाशिम दि.२८ (जिमाका) गावात सकाळच्या वेळी घरोघरी फिरून पांडुरंगावरील अभंग गवळण गात दान मागणारा वासुदेव हा लोककलाकार.  वासुदेवाच्या भूमिकेत प्रदीप  पट्टेबहादूर यांनी वासुदेवाची वारी हे लोकनृत्य महासंस्कृती महोत्सवात आज २८ जानेवारी रोजी सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.           डोक्यावर मोरपिसांची टोपी, पायात विजार किंवा धोतर पायघोळ अंगरखा,कमरेभोवती उपरणे गुंडाळलेले,एका हातात चिपळ्या दुसऱ्या हातात पितळी टाळ,कमरेला पांवा,मंजिरी अशी वस्त्रे आणि काखेत झोळी,गळ्यात कवड्यांच्या माळा, रंगेबिरंगी मण्यांच्या माळा,हातात तांब्याचे कडे,कपाळावर व कंठावर गंधाचे टिळे असा वेश परिधान केलेला हा वासुदेव.          समाज प्रबोधन करणारी संस्था म्हणून वासुदेवाचा गौरव केला जातो. वासुदेव आपल्या गाण्यातून जे तत्वज्ञान सांगतो त्यामध्ये दैववाद आहे.आपण चांगले काम करीत राहावे आणि आयुष्यात मिळणाऱ्या चांगल्या वाईट अनुभवाची ईश्वरावर सोपवावी अशी वासुदेवाची जीवनदृष्टी आहे.             छत्रपती शिवाजी महाराजांनी वासुदेवाच्या

कारंजा येथे राज्यस्तरीय शालेय आट्यापाट्या क्रीडा स्पर्धा : जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.यांच्या हस्ते उद्घाटन

Image
कारंजा येथे राज्यस्तरीय शालेय आट्यापाट्या क्रीडा स्पर्धा जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.यांच्या हस्ते उद्घाटन  वाशिम,दि.२७ (जिमाका) क्रीडा व युवक सेवा संचालनालय,महाराश्ट्र राज्य,जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,जिल्हा आट्यापाट्या असोसिएशन व स्वा.से. श्री.क.रा.इन्नाणी महाविद्यालय, कारंजा यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय शालेय आट्यापाट्या २०२४ क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन कारंजा येथील स्वा.से.श्री. क.रा.इन्नाणी महाविद्यालयाच्या प्रांगणात आज २७ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस यांचे हस्ते करण्यात आले. उद्घाटनाप्रसंगी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य,डाॅ.ए.एन. देवरे उपस्थित होते.व्यासपीठावर जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता, आट्यापाट्या संघाचे महाराष्ट्र कार्यकारीणी अध्यक्ष सागर गुल्हाणे,  श्री.पी.डी.जैन,महाविद्यालय, अनसींगचे प्राचार्य डाॅ.विवेक गुल्हाणे,  आट्यापाट्या संघाचे सचिव कारंजा तहसीलदार कुणाल झाल्टे आणि आट्यापाट्या संघाचे सर्व विभागीय विभाग प्रमुख व सदस्य उपस्थित होते.  प्राचार्य, डाॅ.देवरे

महाराष्ट्राचा समृद्ध संस्कृती वारसा टिकला पाहिजे :जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे महासंस्कृती महोत्सवाचे उद्घाटन

Image
महाराष्ट्राचा समृद्ध संस्कृती वारसा टिकला पाहिजे               जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे  महासंस्कृती महोत्सवाचे उद्घाटन वाशिम दि.२७ (जिमाका) महाराष्ट्राच्या  लोककला जिवंत ठेवून ह्या लोककला सादर करणाऱ्या लोककलावंतांना प्रोत्साहन देणे आज गरजेचे आहे. महाराष्ट्राचा हा समृद्ध सांस्कृतिक वारसा टिकला पाहिजे.असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी केले.                 सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हा प्रशासन,वाशिम यांच्या संयुक्त वतीने आयोजित महासंस्कृती महोत्सवाचे उद्घाटन आज २७ जानेवारी रोजी जिल्हा क्रीडा संकुल येथे करण्यात आले.यावेळी महोत्सवाच्या अध्यक्षस्थानावरून श्री.ठाकरे बोलत होते.महोत्सवाचे उदघाटन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांच्या हस्ते करण्यात आले.प्रमुख अतिथी म्हणून आमदार ऍड.किरणराव सरनाईक,पोलीस अधीक्षक अनुज तारे,अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार,निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपजिल्हाधिकारी कैलास देवरे,वाशिम उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर व जिल्हा परिषद सदस्य आर. के.

जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

Image
जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण वाशिम, दि. 26 (जिमाका)   :  75 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७४ व्या वर्धापन दिनानिमित्त आज २६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पोलीस पथकाने राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी शहाजी पवार, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपजिल्हाधिकारी कैलास देवरे, श्री. व्यवहारे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिता आंबरे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, मानव विकास मिशनचे जिल्हा नियोजन अधिकारी राजेश सोनखासकर, जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख शिवाजी भोसले, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी आरीफ शाहा, आत्माच्या प्रकल्प संचालक अनिसा महाबळे, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी राजेश वजीरे, अधीक्षक राहुल वानखडे, नायब तहसीलदार सुनील घोडे, सविता डांगे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत, विधी अधिकारी महेश महामुने, माजी सैनिक, विविध कार्यालया

सर्वांच्या सहकार्यातून जिल्हयाचा विकास करुया जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. पोलीस कवायत मैदान येथे प्रजासत्ताक दिनाचा ७४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

Image
सर्वांच्या सहकार्यातून जिल्हयाचा विकास करुया                               जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. पोलीस कवायत मैदान येथे प्रजासत्ताक दिनाचा ७४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा वाशिम, दि. २६ (जिमाका) : जिल्ह्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी यंत्रणा सुक्ष्म नियोजनातून काम करीत आहे.  शासनाच्या विविध योजनांची, उपक्रमांची आणि अभियानांची जिल्हयात प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. लोक प्रतिनिधींचे यासाठी सहकार्य व मार्गदर्शन मिळत आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्यातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करुया असे प्रतिपादन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी केले. आज भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७४ व्या वर्धापन दिनानिमित्त वाशिम येथील पोलीस कवायत मैदान येथे जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थितांना शुभेच्छा देतांना त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, जिल्हा पोलीस अधिक्षक अनुज तारे, अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार, निवासी उपजिल्हाधिका

नवयुवकांनो ! मतदार नोंदणी करुन मतदानाचा हक्क पार पाडा जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. १४ वा राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात साजरा· मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचा सत्कार

Image
नवयुवकांनो ! मतदार नोंदणी करुन मतदानाचा हक्क पार पाडा जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. ·        १४ वा राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात साजरा ·        मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचा सत्कार वाशिम, दि. २५ (जिमाका) : जिल्हयातील वर्ष पुर्ण केलेल्या नवयुवकांनी मतदार नोंदणी पूर्ण करुन राष्ट्रहिताच्या दृष्टीने मतदानाचा हक्क पार पाडावा. जिल्हयातील काही नवमतदारांनी अद्यापही मतदार नोंदणी केलेली नाही. अशा नवयुवकांनी नोंदणी करुन मतदान प्रक्रियेत सहभागी होणे गरजेचे आहे. जिल्हयात व्हीव्हीपॅटच्या माध्यमातून मतदानात सहभागी होण्यासाठी जनजागृती व प्रचार प्रसार करण्यात येत आहे. सुदृढ लोकशाही प्रक्रियेसाठी तरुणांनी मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदविणे आवश्यक असल्याचे मत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी व्यक्त केले. आज २५ जानेवारी रोजी १४ व्या राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन सभागृहात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात श्रीमती बुवनेश्वरी एस.अध्यक्षस्थानावरुन बोलत हो

२७ ते ३१ जानेवारीपर्यंत महासंस्कृती महोत्सवमहाराष्ट्रीयन संस्कृतीदर्शक प्रदर्शन

Image
२७ ते ३१ जानेवारीपर्यंत महासंस्कृती महोत्सव महाराष्ट्रीयन संस्कृतीदर्शक प्रदर्शन वाशिम,दि.२४ (जिमाका) सांस्कृतिक कार्य विभाग,सांस्कृतिक कार्य संचालनालय व जिल्हा प्रशासन, वाशिम यांच्या संयुक्त वतीने २७ ते ३१ जानेवारी २०२४ या कालावधीत वाशिम येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे महासंस्कृती होणार आहे.                        महासंस्कृती महोत्सव कार्यक्रमामध्ये शस्त्रकला,लेझीम, लाठीकाठी,फरशी कुऱ्हाड,तलवारबाजी दांडपट्टा,भालाफेक,बंजारा लोकपरंपरा, भारुड,पोवाडा,कविता,हलगीवादन, वासुदेव,पोतराज,गोंधळ,करपल्लवी, गणगवळण,बजावणी,लावणी,किर्तन, नंदीबैल,लोकगीत,खडीगंमत व गझल या महाराष्ट्रीयन संस्कृतीदर्शक प्रदर्शन होणार आहे.            विविध प्रकारच्या महाराष्ट्रीयन संस्कृतीदर्शक प्रदर्शनसुध्दा पहायला मिळणार आहे.प्रदर्शन सकाळी ११ ते सायंकाळी ९ वाजेपर्यंत व सांस्कृतिक कार्यक्रम सायंकाळी ६ ते रात्री १० वाजतापर्यंत राहणार आहे.          २७ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते या महोत्सवाचे उदघाटन होणार आहे.सायंकाळी ६.३० वाजता लोककवी विलास भालेराव व संचाकडून गर्जा महाराष्ट्

जिल्हा क्रीडा संकुल येथे महासंस्कृती महोत्सव

Image
२७ ते ३१ जानेवारी दरम्यान जिल्हा क्रीडा संकुल येथे महासंस्कृती महोत्सव पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते उदघाटन वाशिम,दि.२४ (जिमाका) सांस्कृतिक कार्य विभाग,सांस्कृतिक कार्य संचालनालय व जिल्हा प्रशासन, वाशिम यांच्या संयुक्त वतीने २७ ते ३१ जानेवारी २०२४ या कालावधीत वाशिम येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे होणाऱ्या महासंस्कृती महोत्सवात शस्त्रकला,लेझीम,लाठीकाठी, फरशी कुऱ्हाड,तलवारबाजी, दांडपट्टा, भालाफेक,बंजारा लोकपरंपरा,भारुड, पोवाडा,कविता,हलगीवादन, वासुदेव, पोतराज,गोंधळ,करपल्लवी,गणगवळण, बजावणी,लावणी,किर्तन,नंदीबैल, लोकगीत,खडीगंमत व गझल हे महाराष्ट्रीयन संस्कृती दर्शक प्रदर्शन होणार आहे.प्रदर्शन सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत व सांस्कृतिक कार्यक्रम सायंकाळी ६ ते रात्री १० वाजतापर्यंत राहणार आहे.                    महासंस्कृती महोत्सवाचे उदघाटन मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते होणार आहे.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे,खासदार भावना गवळी,खासदार संजय धोत्रे,विधानपरिषद सदस्य सर्वश्री ॲड.किरणराव सरनाईक, वसंत खंडेलवाल,धिरज लिंगाडे,आमदार सर्व

महाकृषी अभियान : लाभार्थी हिस्सा 7 दिवसाच्या आत भरावा*महाऊर्जाचे आवाहन

Image
*महाकृषी अभियान : लाभार्थी हिस्सा 7 दिवसाच्या आत भरावा* महाऊर्जाचे आवाहन वाशिम,दि.२३ (जिमाका) महाकृषी अभियान योजनेअंतर्गत कुसुम ऑनलाईन पोर्टलवर प्राप्त असलेल्या अर्जाची पडताळणी करुन पात्र असलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना महाऊर्जा,मुख्यालय,पुणे यांच्याकडून लाभार्थी हिस्सा भरण्याचे संदेश पाठविले जातात.त्यानुसार वाशिम जिल्हयातील 195 लाभार्थी शेतकऱ्यांना लाभार्थी हिस्सा भरण्याचा संदेश दिलेला आहे. संबंधित शेतकऱ्यांनी अद्यापपर्यंत लाभार्थी हिस्सा भरणा केलेला नाही. तरी सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना महाऊर्जा,जिल्हा कार्यालय,यवतमाळ यांचेकडून वेळोवेळी पत्राव्दारे व भ्रमणध्वनीव्दारे लाभार्थी हिस्सा भरण्याबाबत कळविले आहे.लाभार्थी शेतकऱ्यांना महाऊर्जा,मुख्यालय,पुणे यांच्याकडून लाभार्थी हिस्सा भरणा करण्याकरीता ७ दिवसाची अंतिम मुदत देण्यात आली आहे.          तरी सर्व लाभार्थी शेतकऱ्यांनी महाऊर्जा,मुख्यालय,पुणे यांच्यामार्फत प्राप्त झालेल्या संदेशानुसार ७ दिवसात MEDA Benificiary Application या ऑनलाईन ॲपव्दारे लाभार्थी हिस्सा भरणा करावा.लाभार्थी हिस्सा भरणा करतांना काही अडचणी आल्यास ०७२३२-२४११५० या

उत्कृष्ट ग्रंथालय,कार्यकर्ता व ग्रंथमित्र पुरस्कार९ फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागविले

Image
उत्कृष्ट ग्रंथालय,कार्यकर्ता व ग्रंथमित्र पुरस्कार ९ फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागविले वाशिम दि.२३(जिमाका) ग्रंथालय संचालनालयातर्फे उत्कृष्ट ग्रंथालयांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार,तसेच ग्रंथालय कार्यकर्ता व सेवकांना डॉ.एस.आर. रंगनाथन ग्रंथमित्र पुरस्कार देण्यात येतो.त्यासाठी ९ फेब्रुवारीपूर्वी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.              राज्यातील शहरी व ग्रामीण विभागातील अ,ब,क,ड वर्गातील उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना अनुक्रमे १ लक्ष रूपये, ७५ हजार, ५० हजार व २५ हजार रूपये रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येते.             राज्यातील एक राज्यस्तरीय उत्कृष्ट कार्यकर्ता व एक राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथालयसेवक यांना प्रत्येकी ५० हजार रोख रक्कम आणि प्रमाणपत्र,तसेच प्रत्येक महसुली विभागातील प्रत्येकी एक उत्कृष्ट कार्यकर्ता व उत्कृष्ट सेवक यांना प्रत्येकी २५ हजार रूपये रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येते.                राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा,ग्रंथालयांकडून जनतेला अधिक चांगल्या ग्रंथालय स

मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा जिल्हा न्यायालयात कायदेविषयक शिबीर उत्साहात

Image
मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा   जिल्हा न्यायालयात कायदेविषयक शिबीर उत्साहात वाशिम,दि.२३ (जिमाका) जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधीज्ञ संघ,वाशिम यांच्या संयुक्त वतीने १९ जानेवारी रोजी जिल्हा न्यायालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवाडयाच्या निमित्ताने कायदेविषयक जनजागृती शिबीराचे आयोजन करण्यात आले.  अध्यक्षस्थानी जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.पी.पांडे होते.प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा विधीज्ञ संघाचे अध्यक्ष अनुप बाकलीवाल यांची उपस्थिती होती.           न्या.श्री.पांडे यांनी मराठी भाषा संवर्धन पंधरवाडानिमित्त उपस्थितांना मार्गदर्शन केले.यावेळी ॲड.सुधीर मोरे यांनी मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.सहायक मोटार वाहन निरीक्षक सतिश इंगळे यांनी रस्ता सुरक्षा आणि वाहतूक चिन्हे,रस्त्यावरील देवदुत आणि रस्ता संमोहन या विषयावर मार्गदर्शन केले.                 कार्यक्रमाला सर्व न्यायीक अधिकारी,न्यायालयीन कर्मचारी, विधीज्ञ संघाचे पदाधिकारी सदस्य, विधी स्वयंसेवक,लोकअभिरक्षक कार्यालयाचे लोकअभिरक्षक व कर्मचारी,जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयाचे कर्मच