राष्ट्रीय तंबाखू व मौखीक नियंत्रण कार्यक्रमशाळा व महाविद्यालयस्तरावर जनजागृती करा जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.जिल्हास्तरीय समन्वय समिती सभा


राष्ट्रीय तंबाखू व मौखीक नियंत्रण कार्यक्रम

शाळा व महाविद्यालयस्तरावर जनजागृती करा

                      जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.

जिल्हास्तरीय समन्वय समिती सभा

वाशिम, दि. 10 (जिमाका) :  राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम,राष्ट्रीय मौखीक आरोग्य कार्यक्रम आणि राष्ट्रीय फलुरोसिस नियंत्रण कार्यक्रमाची त्रैमासिक आढावा सभा आज 10 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.यावेळी जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.अनिल कावरखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुहास कोरे,बाहय रुग्ण संपर्क अधिकारी डॉ. पराग राठोड, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा सल्लागार डॉ. आदित्य पांढारकर,दंत चिकीत्सक डॉ. मंजूषा वऱ्हाडे, अन्न व औषध प्रशासन आयुक्त भाऊराव चव्हाण, राजस्थान आर्य महाविद्यालयाचे प्राचार्य ओमप्रकाश झंवर, जिल्हास्तरीय समन्वय समितीचे सदस्य व तालुका आरोग्य अधिकारी यांची उपस्थिती होती.  

यावेळी श्रीमती बुवनेश्वरी एस. यांनी सर्व शासकीय,निमशासकीय आणि खाजगी कार्यालय तंबाखूमुक्त करण्याचे निर्देश दिले. शिक्षण विभागाने जिल्हयातील सर्व शाळांनी मार्गदर्शक सुचनेच्या 9 निकषानुसार शैक्षणिक संस्थेच्या आवारात दर्शनीय भागात तंबाखूमुक्त क्षेत्र चिन्हाचे प्रदर्शन, शैक्षणिक संस्थेच्या मुख्य प्रवेशद्वारावर व बाहेरील भिंतीवर तंबाखूमुक्त शाळा असे फलक लावण्यात यावे. या फलकावर पदनाम, संपक क्रमांक नमुद करण्यात यावा. तंबाखूच्या दुष्परीणामाविषयी पोस्टर किंवा इतर जनजागृती साहीत्य परीसरात लावण्यात यावे. सहा महिन्यातून किमान एक तंबाखूजन्य दुष्परीणामाबाबत कार्यक्रम आयोजित करण्यात यावा. तंबाखू मॉनिटरचे पद व त्यांची नावे देण्यात यावी. तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्थेच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये तंबाखूचा वापर करु नये या नियमाचा समावेश करण्यात यावा. शैक्षणिक संस्थेच्या परिसरात 100 मिटर परिक्षेत्रात सिमारेषा आखण्यात यावी.या निकषांची अंमलबजावणी करुन सर्व शाळा तंबाखूमुक्त करण्यात यावी. तंबाखूमुक्तीसाठी वापरण्यात येणाऱ्या टोल फ्री क्रमांक 1800112356 याची व्यापक जनजागृती करण्याचे संबंधित विभागांना निर्देश दिले.

श्री.राठोड म्हणाले,राष्ट्रीय मौखीक आरोग्य कार्यक्रमाअंतर्गत मुख आरोग्याच्या असलेल्या समस्या, तोंड कमी उघडणे, 15 दिवसापेक्षा जास्त असलेला पांढरा किंवा लाल चटटा, विविध प्रकारच्या हिरडयांचे आजार तसेच मुख दुर्गंधीसारख्या समस्या असल्यास संबंधीत विभागाकडून रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालय येथे पाठविण्याचे सांगीतले.

डॉ.सुहास कोरे म्हणाले, राष्ट्रीय फलुरोसिस प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालयात फलुराईड तपासणी प्रयोगशाळा कार्यान्वीत करण्यात आली आहे. या विषयी सर्व संबंधीतांना माहिती देण्यात आली असून वेळोवेळी संबंधित रुग्णांची तपासणी करुन नमुने तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठविण्यात यावेत असे त्यांनी यावेळी सांगीतले. माहितीचे सादरीकरण डॉ.वऱ्हाडे, राम धाडवे व मानसशासत्रज्ञ राम सरकटे यांनी केले.

*******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे