जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचा पुढाकार *सोनखास येथे केली कायदेविषयक जनजागृती*


जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचा पुढाकार 

*सोनखास येथे केली कायदेविषयक जनजागृती*

वाशिम,दि.11(जिमाका) जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधिज्ञ संघ,वाशीम यांच्या संयुक्त वतीने 10 जानेवारी रोजी वाशिम तालुक्यातील ग्रामपंचायत सोनखास येथे कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले.जिल्हा विधि सेवा प्राधिकरण सचिव व्ही.ए. टेकवाणी हे अध्यक्षस्थानी होते.
       श्री.टेकवाणी यांनी मार्गदर्शनातून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण हे जिल्हास्तरावर कायदेविषयक जनजागृती करण्याचे काम करते. महिलांना मोफत विधी सेवा देण्याबाबत खालच्या न्यायालयापासुन ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत विधी सेवा देण्याचे काम जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जबाबदारीने करत असते. कायदेविषयक माहिती हवी असल्यास आमच्याकडे विश्वासाने यावे. आमच्याकडील सर्व माहिती गोपनीय असते.मोफत विधी सेवा देण्याकरीता लोकअभिरक्षक यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे सांगुन मोफत विधी सेवेचा लाभ महिलांनी घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
               सहायक लोक अभिरक्षक ऍड.शूभांगी खडसे यांनी कामांच्या ठिकाणी होणारे महिलांचे लैंगीक शोषण तसेच स्त्री भ्रृणहत्या या विषयावर कायदेविषयक मार्गदर्शन केले.सहायक लोकअभिरक्षक ऍड. हेमंत इंगोले यांनी पिडीत नुकसान भरपाई योजना तसेच केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना या विषयावर मार्गदर्शन करताना मनोधैर्य योजनेबाबत महत्वपुर्ण कायदेविषयक मार्गदर्शन केले.
                 महिला आर्थिक विकास महामंडळ,अमरावती विभागचे विभागीय सनियंत्रण व मुल्यमापन अधिकारी केशव पवार यांनी महिला आर्थीक विकास महामंडळ महिलांच्या सक्षमीकरणाकरीता काम करत असुन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे काम कौतुकास्पद असून अशा प्रकारचे कायदेविषयक जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित करुन लोकांपर्यंत कायदेविषयक माहिती पोहचवित असल्याचे सांगीतले.
            यावेळी सोनखासच्या सरपंच जयश्री गोरे,लोकअभिरक्षक,जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयाचे कर्मचारी,विधी स्वयंसेवक व महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. संचालन लोकसंचालीत साधन केंद्राचे व्यवस्थापक संतोष मुखमाले यांनी केले.उपस्थितांचे आभार महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपुरे यांनी मानले.
                    *******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे