20 जानेवारीला नवोदय विद्यालय इ. 6 वी निवड चाचणी परीक्षापरीक्षा केंद्रावर कलम 144 लागू




20 जानेवारीला नवोदय विद्यालय इ. 6 वी निवड चाचणी परीक्षा

परीक्षा केंद्रावर कलम 144 लागू

वाशिम, दि. 19 (जिमाका) जवाहर नवोदय विद्यालय इयत्ता 6 वीची निवड चाचणी परीक्षा - 2024 जिल्हयातील 28 केंद्रावर 20 जानेवारी रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत घेण्यात येणार आहे. परीक्षेच्या दिवशी परीक्षा केंद्रावर 100 मिटर परीक्षेत्रात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि परीक्षेसंबंधिचे गैरप्रकार घडू नये,यासाठी जिल्हादंडाधिकारी बुवनेश्वरी एस.यांनी परीक्षा केंद्रावर फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 लागू केले आहे.ही परीक्षा मालेगाव शहरातील एन.एन.मुंदडा हायस्कुल,बाल शिवाजी मराठी विद्यानिकेतन,हॅपी फेसेस स्कुल, विदर्भ पब्लीक स्कुल.मंगरुळपीर शहरातील जिल्हा परिषद शाळा, सिध्दार्थ हायस्कुल,वाय.सी.विद्यालय, यशवंतराव चव्हाण प्रायमरी इंग्लीश स्कुल.कारंजा शहरातील एम.आर. नागवाणी हायस्कुल,जे.सी.चवरे हायस्कुल,मुलजी जेठा हायस्कुल, विद्याभारती इंग्लीश स्कुल,विद्यारंभ इंग्लीश स्कुल.मानोरा शहरातील एल.एस.पी.एम.हायस्कुल, आर.आय.जी.के.विद्यालय,रेमानिया ऊर्दू हायस्कुल.वाशिम शहरातील श्री. बाकलीवाल हायस्कुल,श्री.शिवाजी हायस्कुल,राणी लक्ष्मीबाई शाळा,हॅपी फेसेस स्कुल,एस.एम.सी. इंग्लीश स्कुल, शांतीनिकेतन इंग्लीश स्कुल, पोदार इंग्लीश स्कुल व रिसोड शहरातील बी.एम.विद्यालय,श्री. शिवाजी हायस्कुल,भारत कन्या शाळा,भारत प्रायमरी स्कुल व सनराईज इंग्लीश स्कुल या परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्यात येणार आहे.

या परीक्षा केंद्रावर ओळखपत्राशिवाय प्रवेश मिळणार नाही. परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिक्षेत्रात नवोदय विद्यालय समितीने नियुक्त केलेले अधिकारी,कर्मचारी, परीक्षार्थी परीक्षेसाठी नियुक्त समन्वयक अधिकारी व्यतिरीक्त इतर व्यक्तीस मनाई राहणार आहे.परीक्षा केंद्रावर 100 मिटरच्या आत रस्त्यावरुन वाहने नेण्यास मनाई राहील.परीक्षा केंद्राच्या 100 मिटरच्या परीसरातील सर्व सार्वजनिक टेलीफोन, एसटीडी, आयएसडी,झेरॉक्स,फॅक्स,ईमेल, ध्वनीक्षेपके आदी सुविधांवर बंदी घालण्यात आली आहे.परीक्षा केंद्रावर मोबाईल फोन,वायरलेस सेट,रेडीओ, दूरदर्शन,कॅलक्युलेटर,संगणक वापरण्यावरसुध्दा बंदी घालण्यात आली आहे.

हा आदेश 20 जानेवारी रोजी सकाळी 8 ते दुपारी 3 वाजतापर्यंत लागू राहणार आहे.परीक्षा केंद्राच्या परीसरात प्रवेश करतांना 4 पेक्षा जास्त व्यक्तींना प्रवेश करता येणार नाही.या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशात नमुद करण्यात आले आहे.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे