तिमाही ई-आर-131 जानेवारीपर्यंत ऑनलाईन मागविले


तिमाही ई-आर-1
31 जानेवारीपर्यंत ऑनलाईन मागविले

वाशिम,दि.9(जिमाका) सर्व शासकीय,निमशासकीय व खाजगी आस्थापनांना दर 3 महिन्यांनी ऑनलाईन ई-आर-1सेवायोजन कार्यालये (रिक्तपदे अधिसूचित करण्याची सक्ती करणारा) कायदा 1959 व नियमावली 1960 मधील कलम 5 (1) व 5 (2) नुसार सादर करणे कायद्याने बंधनकारक आहे. यासाठी यापुर्वी प्राप्त झालेला युझर आयडी व पासवर्ड टाकुन 1 ऑक्टोबर 2023 ते 31 डिसेंबर 2023 या तिमाही कालावधीचे ई-आर-1 माहे, जानेवारी 2024 अखेरपर्यंत ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे.
          
ई-आर-1 भरण्यासाठी www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाचा वापर करुन या टॅबमध्ये एम्पलॉयर लॉगीनमधून आपल्या आस्थापनेची माहिती प्रोफाईल तात्काळ अद्यावत करावी. 31 जानेवारी 2024 पूर्वी तिमाही विवरण ई-आर-1 ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे. असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.काही अडचण असल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या 07252-231494 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
                   *******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे