वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणारे छत्रपती शिवाजी महाराज*महासंस्कृती महोत्सवात शिवचरित्रावर पी. एस. खंदारे यांचे संगीतमय किर्तन

*वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणारे छत्रपती शिवाजी महाराज*

महासंस्कृती महोत्सवात शिवचरित्रावर  पी. एस. खंदारे यांचे संगीतमय किर्तन

वाशिम दि.३१(जिमाका) सांस्कृतिक कार्य विभाग,सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि वाशिम जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त वतीने महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन २७ जानेवारी ते ३१ जानेवारीपर्यंत जिल्हा क्रीडा संकुल येथे करण्यात आले आहे. 
        या कार्यक्रमात संपूर्ण महाराष्ट्रात सुपरिचित असलेले निष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या वेशभूषेत अस्सल व-हाडी भाषेत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या " मानुस द्या मज मानुस द्या " या भजनाने किर्तनाची सुरुवात झाली.
छत्रपती शिवाजी महाराजानी अस्पृश्यता निवारण करुन,स्त्रीयांना मानसन्मान दिला.शेतकरी,कष्टकरी, बारा बलुतेदार व अठरा आलुतेदारांचा उध्दार केला.लढाईला जाताना मुहुर्त पाहिला नाही की,लढाई गडकिल्ले जिंकल्यावर सत्यनारायण पूजा केली नाही.छत्रपती शिवाजी महाराज हे बहुआयामी व वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणारे,व्यसनविरोधी व रयतेच्या हितासाठी स्वराज्याची स्थापना करणारे आदर्श जाणते राजे होते असे परखड मत पी एस खंदारे यांनी किर्तनाच्या माध्यमातून व्यक्त केले.    
                 किर्तनात साथ संगत नामदेव दिपके,सुनील मनवर,विनोद तायडे, अजय करडे,रवी इंगोले,सुनील सावळे,कुसुम सोनुने,वंदना गायकवाड,शिवाजी गायकवाड, भास्कर गायकवाड,शंकर गायकवाड यांनी साथ दिली.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे