जिल्हा क्रीडा संकुल येथे महासंस्कृती महोत्सव


२७ ते ३१ जानेवारी दरम्यान

जिल्हा क्रीडा संकुल येथे
महासंस्कृती महोत्सव

पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते उदघाटन

वाशिम,दि.२४ (जिमाका) सांस्कृतिक कार्य विभाग,सांस्कृतिक कार्य संचालनालय व जिल्हा प्रशासन, वाशिम यांच्या संयुक्त वतीने २७ ते ३१ जानेवारी २०२४ या कालावधीत वाशिम येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे होणाऱ्या महासंस्कृती महोत्सवात शस्त्रकला,लेझीम,लाठीकाठी, फरशी कुऱ्हाड,तलवारबाजी, दांडपट्टा, भालाफेक,बंजारा लोकपरंपरा,भारुड, पोवाडा,कविता,हलगीवादन, वासुदेव, पोतराज,गोंधळ,करपल्लवी,गणगवळण, बजावणी,लावणी,किर्तन,नंदीबैल, लोकगीत,खडीगंमत व गझल हे महाराष्ट्रीयन संस्कृती दर्शक प्रदर्शन होणार आहे.प्रदर्शन सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत व सांस्कृतिक कार्यक्रम सायंकाळी ६ ते रात्री १० वाजतापर्यंत राहणार आहे.
                   महासंस्कृती महोत्सवाचे उदघाटन मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते होणार आहे.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे,खासदार भावना गवळी,खासदार संजय धोत्रे,विधानपरिषद सदस्य सर्वश्री ॲड.किरणराव सरनाईक, वसंत खंडेलवाल,धिरज लिंगाडे,आमदार सर्वश्री लखन मलिक,राजेंद्र पाटणी,अमित झनक,जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.,मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत,जिल्हा पोलीस अधिक्षक अनुज तारे,अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार,निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे व उपजिल्हाधिकारी (रोहयो) कैलास देवरे यांची उपस्थिती राहणार आहे.
                   ***

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे