२७ ते ३१ जानेवारीपर्यंत महासंस्कृती महोत्सवमहाराष्ट्रीयन संस्कृतीदर्शक प्रदर्शन


२७ ते ३१ जानेवारीपर्यंत महासंस्कृती महोत्सव

महाराष्ट्रीयन संस्कृतीदर्शक प्रदर्शन

वाशिम,दि.२४ (जिमाका) सांस्कृतिक कार्य विभाग,सांस्कृतिक कार्य संचालनालय व जिल्हा प्रशासन, वाशिम यांच्या संयुक्त वतीने २७ ते ३१ जानेवारी २०२४ या कालावधीत वाशिम येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे महासंस्कृती होणार आहे.     
                  महासंस्कृती महोत्सव कार्यक्रमामध्ये शस्त्रकला,लेझीम, लाठीकाठी,फरशी कुऱ्हाड,तलवारबाजी दांडपट्टा,भालाफेक,बंजारा लोकपरंपरा, भारुड,पोवाडा,कविता,हलगीवादन, वासुदेव,पोतराज,गोंधळ,करपल्लवी, गणगवळण,बजावणी,लावणी,किर्तन, नंदीबैल,लोकगीत,खडीगंमत व गझल या महाराष्ट्रीयन संस्कृतीदर्शक प्रदर्शन होणार आहे.
           विविध प्रकारच्या महाराष्ट्रीयन संस्कृतीदर्शक प्रदर्शनसुध्दा पहायला मिळणार आहे.प्रदर्शन सकाळी ११ ते सायंकाळी ९ वाजेपर्यंत व सांस्कृतिक कार्यक्रम सायंकाळी ६ ते रात्री १० वाजतापर्यंत राहणार आहे.
         २७ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते या महोत्सवाचे उदघाटन होणार आहे.सायंकाळी ६.३० वाजता लोककवी विलास भालेराव व संचाकडून गर्जा महाराष्ट्र माझा कार्यक्रम,सायंकाळी ६.३० ते ६.३५ वाजतापर्यंत वरद काळे यांचे आऊसाहेब मी शिवबा बोलतोय (नाटय),सायंकाळी ६.३५ ते ६.४० वाजता हरी ओम केशव मगर यांचा शिवछत्रपतीचा पोवाडा,सायंकाळी ६.४० ते रात्री ८ वाजतापर्यंत बाळासाहेब व्यायाम प्रसारक मंडळाकडून शिवकालीन शस्त्रकला सादरीकरण,रात्री ८ ते ८.१५ वाजता बाकलीवाल विद्यालयाचे विद्यार्थी सादर करतील महाराष्ट्राची थोरवी कार्यक्रम,रात्री ८.१५ ते ९.१५ वाजता बाबाराव मुसळे व अशोक मानकर यांचे वाशिम जिल्हयातील बालभारतीमध्ये समावेश असलेल्या लेखकांचे कथाकथन,रात्री ९.१५ ते रात्री ९.५० वाजता नांदेड येथील रमेश गिरी यांचा विनोदी कार्यक्रम व रात्री ९.५० ते रात्री १० वाजतापर्यंत पसायदान.
                     २८ जानेवारी रोजी सायंकाळी ६ ते ७ वाजता गोवर्धन येथील जय बजरंग व्यायाम शाळेकडून शिवकालीन साहसी खेळ, सायंकाळी ७ ते रात्री ८ वाजता दिलीज जाधव व सीमा राठोड यांच्याकडून बंजारा लोक परंपरा,रात्री ८ ते रात्री ९ वाजता सुभेदार दिपक ढोले यांचे सैनिकी कविता,रात्री ९ ते रात्री ९.३० वाजतापर्यंत प्रा.डॉ.विजय जाधव यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिवचरित्र आणि रात्री ९.३० ते रात्री १० वाजतापर्यंत राजस्थान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या सांस्कृतीक कार्यक्रमांचे सादरीकरण. 
         २९ जानेवारी रोजी सायंकाळी ६ ते ६.४५ वाजता भटउमरा येथील जगदगुरु तुकोबाराय भजनी मंडळीकडून महाराष्ट्राची लोककला - भारुड,सायंकाळी ६.३५ ते ६.४५ वाजता संघपाल खडसे व धम्मानंद चिंचखेडा यांचे लोकगीत,६.४५ ते ७ वाजता मोहजा रोड येथील जिल्हा परिषद शाळेकडून स्वराज्याची उभारणी कार्यक्रम,सायंकाळी ७ ते रात्री ८ वाजता पांडुरंग उचितकर यांचे चेतन सेवांकुर प्रतिष्ठाण ऑर्केस्ट्रा, रात्री ८ ते ८.१५ वाजता सत्यप्रिया श्रृंगारे यांचे महात्मा ज्योतिबा फुले यांचा छत्रपती शिवाजी महाराजांवरील पहिला पोवाडा कार्यक्रम.रात्री ८.१५ ते ८.३० वाजता बोराळा-धुमका येथील स्व.नामदेवराव राजगुरु माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाकडून शिवराज्याभिषेक - म्युझिकल ड्रामा कार्यक्रम.रात्री ८.३० ते रात्री १० वाजतापर्यंत डॉ.विजय काळे,गोपाल खाडे,चाफेश्वर गांगवे, वैभव भिवरकर,मोहन शिरसाट,भारत लादे,अनिल कांबळे,शेषराव धांडे, दीपक ढोले,मधुराणी बनसोड,सुनिता अवचार,सुरेश येरमुळे,फारुख जमन, महेंद्र ताजणे व मुकुंद परळीकर यांचा वऱ्हाडी हास्य कवि संमेलन.
           ३० जानेवारी रोजी सायंकाळी ६ ते ६.१५ वाजता केशव डाखोरे यांचा महाराष्ट्राची लोककला- हलगीवादन कार्यक्रम,सायंकाळी ६.१५ ते ६.३० वाजता धम्मानंद इंगोले यांचा पारंपारिक लोककला वासुदेव,सायंकाळी ६.३० ते ६.५० वाजता विद्या भगत व संचाकडून पारंपारिक लोककला भारुड व पोतराज कार्यक्रम,सायंकाळी ६.५० ते ७.२० वाजता विष्णू धांडे व संचाकडून कालींक माता कला संच गोंधळ,सायंकाळी ७.२० ते ८.३० वाजता शाहिर संतोष खडसे व समता संदेश सांस्कृतिक कलासंच यांचे गणगवळण,बतावणी,खडीगंमत व लावणी कार्यक्रम आणि रात्री ८.३० ते १० वाजतापर्यंत पुजाजी खंदारे व संच यांचा गाडगे बाबांचे किर्तन.
        ३१ जानेवारी रोजी सायंकाळी ६ ते ६.१५ वाजता मधुकर गायकवाड व सुशीला घुगे यांचे पारंपारिक कला भारुड,६.१५ ते ६.३० वाजता शाहिर प्रज्ञानंद भगत व संचाकडून पोवाडा व लोकगीत,सायंकाळी ६.३० ते ६.४५ वाजता शाहिर दत्ता कोंडजी व संचाकडून शिवरायांचे ८ वे रुप कार्यक्रम,सायंकाळी ६.४५ ते ७ वाजता लोडजी भगत,सुरेश श्रृंगारे व संचाकडून देशभक्तीपर गीत, ७ ते ७.१५ वाजता शाहिर रतन हाडे व संचाकडून पारंपारिक लोककला नंदीबैल,सायंकाळी ७.१५ ते रात्री ९.४५ वाजता गझलकार भीमराव पांचाळे व संचाकडून गझल गायन कार्यक्रम व रात्री ९.४५  वाजता कार्यक्रमाचे समारोप होणार आहे.     
                *******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे