विकसित भारत संकल्प यात्रेची व्याप्ती वाढवा पर्यटन संचालक रोशन थॉमस विकसित भारत संकल्प यात्रा आढावा सभा



विकसित भारत संकल्प यात्रेची व्याप्ती वाढवा

                            पर्यटन संचालक रोशन थॉमस

विकसित भारत संकल्प यात्रा आढावा सभा

वाशिम, दि. 13 (जिमाका) : जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा आणि जिल्ह्याची विकसीत जिल्हा म्हणून ओळख निर्माण व्हावी याकरीता विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या योजना व संलग्न असलेल्या राज्य शासनाच्या योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवा. जिल्हा प्रशासनाने नियोजन करून जास्तीत जास्त लोकांना माहिती व्हावी यासाठी प्रचार प्रसिद्धी करावी. असे प्रतिपादन केंद्रीय पर्यटन विभागाचे संचालक रोशन थॉमस यांनी केले.

आज 13 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील राजे वाकाटक सभागृहात आयोजित आढावा बैठकीत श्री.थॉमस बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.,जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत व निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

श्री.थॉमस म्हणाले, विकसित भारत संकल्प यात्रेतून केंद्र शासनाच्या योजनेचा लाभ जिल्हयातील प्रत्येक लाभार्थ्यांना मिळाला तरच त्यांचे समाधान होईल. विकसित भारत संकल्प यात्रेची व्याप्ती वाढविण्यसाठी जिल्हा प्रशासनाने प्रयत्न करावे. असे निर्देश श्री.थॉमस यांनी यावेळी दिले.

जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी म्हणाल्या,26 जानेवारीपर्यंत नगरपरिषद क्षेत्रात प्रत्येक वार्डात एका दिवशी 2 कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे नियोजन असून शाळा, महाविद्यालयस्तरावर सुध्दा कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

विकसित भारत संकल्प यात्रेच्या माहितीचे सादरीकरण करतांना निवासस्थानी उपजिल्हाधिकारी श्री.घुगे म्हणाले, जिल्हयात या यात्रेसाठी 23 नोव्हेंबर रोजी 4 डिजिटल व्हॅन प्राप्त झाल्या. या व्हॅनच्या माध्यमातून यात्रेला सुरुवात करण्यात आली. 9 डिसेंबर रोजी 2 व्हॅन प्राप्त झाल्या. अशा एकूण 6 डिजिटल व्हॅनच्या माध्यमातून जिल्ह्यातील जवळपास 468 ग्रामपंचायतीमध्ये ही विकसित भारत संकल्प यात्रा पोहोचली. उर्वरित ग्रामपंचायत स्तरावरचे नियोजन झाले असून कार्यक्रम सुरू आहे. आतापर्यंत 1 लक्ष 55 हजार 258 नागरिक या यात्रेत सहभागी झाले आहे. 15 जानेवारीपासून नगरपरिषद क्षेत्रात विकसित भारत संकल्प यात्रेची सुरुवात होणार आहे असे त्यांनी सांगितले.

यावेळी वाशिम उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुहास कोरे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक दिलीप मोहपात्रा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बालकल्याण) संजय जोल्हे, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त मारोती वाठ, जिल्हा भूमिअभिलेख अधीक्षक शिवाजी भोसले, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी राजेश वजीरे, तहसीलदार नीलेश पळसकर आकाशवाणीचे नोडल अधिकारी गजानन माळेकर व संबंधित यंत्रणांचे अधिकारी यांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे