Posts

Showing posts from June, 2018

मानवाधिकाराची प्रभावी अंमलबजावणी करा - श्रीमती एस. जलजा

Image
वाशिम , दि . २८ :   प्रत्येक व्यक्तीला त्याचे अधिकार राज्यघटनेने दिले आहे. त्याच्या अधिकाराचे हनन होणार नाही, याची दक्षता सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी घ्यावी. प्रत्येक घटकासाठी यंत्रणेने काम करतांना मानवाधिकाराची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे मत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या विशेष प्रतिनिधी श्रीमती एस. जलजा यांनी व्यक्त केल्या.       २८ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात आयोजित आढावा बैठकीत श्रीमती जलजा बोलत होत्या. यावेळी अपर जिल्हाधिकारी दिनेशचंद्र वानखेडे , निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे , अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस , अपर पोलीस अधिक्षक स्वप्ना गोरे , रोहयोचे उपजिल्हाधिकारी सुनिल कोरडे , उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला बालकल्याण) नितीन मोहुर्ले , उपमुख्य कार्यकारी अधिकारी (स्वच्छता व पाणी पुरवठा) सुदाम इस्कापे , उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) नितीन माने , शिक्षण अधिकारी (माध्य.) तानाजी नरळे यांची प्रमुख उपस्थिती होती.       श्रीमती जलजा पुढे म्हणाल्या , जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक कमी आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात मुल

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या श्रीमती जलजा यांची अंगणवाड्यांना भेट, ग्रामस्थांशी संवाद

Image
वाशिम , दि . २८ : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या विशेष प्रतिनिधी श्रीमती एस. जलजा यांनी २८ जून रोजी वाशिम जिल्ह्यातील कारंजा व मंगरुळपीर तालूक्यातील अंगणवाडी , प्राथमिक आरोग्य केंद्र , उपकेंद्रांना भेट देऊन लाभार्थी व ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्या समवेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मोहूर्ले , गटविकास अधिकारी श्री. पराते , वैद्यकीय अधिकारी डॉ. नांदे , श्री डॉ. नवाते , तालुका कृषि अधिकारी श्री . शेळके , बालविकास प्रकल्प अधिकारी श्री. सोनटक्के , श्री. राऊत , गटशिक्षणाधिकारी श्री. डाबेराव , श्रीमती कौशल तसेच रुपेश निमके , श्री. माने , श्री. वाढणकर यांची उपस्थिती होती.       श्रीमती जलजा यांनी कारंजा तालुक्यातील सोमठाणा येथील ग्रामपंचायत , शाळा व अंगणवाडी केंद्राला भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. इंदिरा आवास योजनेच्या लाभाबाबत लाभार्थ्यांशी चर्चा केली.   अंगणवाडीच्या भेटीत अंगणवाडीवर टिन पत्र्याचे शेड असल्यामुळे नाराजी व्यक्त केली. मदतनिसाचे रिक्त पद तातडीने भरण्याचे निर्देश त्यांनी दिले. उंबर्डा बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन रुग्णांशी , त्यां

पीक कर्जाची नोंदणी ‘ऑनलाईन’ करण्याची सुविधा

Image
·         आवश्यक कागदपत्रांची माहिती मिळणार मोबाईलवर ·         कर्ज नाकारल्यास बँकेला द्यावे लागणार स्पष्टीकरण ·         शेतकऱ्यांना कोणत्याही ठिकाणाहून ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा वाशिम ,   दि .   १९   :   पीक कर्ज वाटपामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी तसेच पीक कर्ज वाटपाला गती देण्यासाठी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या संकल्पनेतून शेतकऱ्यांना आपल्याला आवश्यक पीक कर्जासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याची सुविधा जिल्हाधिकारी कार्यालयाने उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वारंवार बँकेत हेलपाटे मारण्याची आवश्यकता राहणार नाही. ऑनलाइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्याला बँकेने कर्ज नाकारल्यास त्याबाबतचे स्पष्टीकरण बँकेला द्यावे लागणार आहे. या सुविधेमुळे पीक कर्जासाठी कोण-कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, याची माहिती शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलवरच मिळणार आहे. तसेच बँकेकडून या व्यतिरिक्त अनावश्यक कागदपत्रांची मागणी केली जाणार नाही. पीक कर्जाच्या ऑनलाईन नोंदणीसाठी सुरु करण्यात आलेल्या www.collectorwashim.in या संकेतस्थळावर शेतकऱ्यांना आपले नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, बचत खाते विषयक माहिती

जिल्हाधिकारी कार्यालयात महाराणा प्रतापसिंह यांना अभिवादन

Image
वाशिम ,   दि .   १६   :    महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी तहसीलदार तथा जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधीक्षक वैभव देऊळगावकर यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

शेतीपूरक व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करा - जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा

Image
·         ‘आत्मा’च्या नियामक मंडळाची आढावा बैठक ·         शेतीमधील प्रात्यक्षिक, शेतकरी प्रशिक्षणाच्या नियोजनाबाबत चर्चा ·         दुग्ध व्यवसाय, शेळीपालनविषयक प्रशिक्षण आयोजित करण्याच्या सूचना वाशिम , दि . ११ : शेतीला पूरक जोडधंदा निर्माण झाल्यास त्याचा शेतकऱ्यांना लाभ होईल. त्यामुळे ‘आत्मा’च्या माध्यमातून दुग्ध व्यवसाय, शेळीपालन यासारख्या व्यवसायाच्या वाढीसाठी प्रयत्न करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आज झालेल्या ‘आत्मा’ नियामक मंडळाच्या बैठकीत दिल्या. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने, नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक विजय खंडरे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय नगराळे, सामाजिक वनीकरण विभागाचे उपविभागीय अधिकारी के. आर. राठोड, करडा कृषि विज्ञान केंद्राचे डॉ. आर. एल. काळे, ‘आत्मा’च्या प्रकल्प संचालक अनिसा महाबळे, उपविभागीय कृषि अधिकारी डॉ. मुरली इंगळे यांच्यासह तालुकास्तरीय शेतकरी सल्लागार समितीचे प्रतिनिधी व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी

आता ऑनलाईन करता येणार पीक कर्जाची नोंदणी

Image
·         वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयाने तयारी केली वेबसाईट ·         पीक कर्जाविषयी नोंदणीसाठी राज्यातील पहिलाच उपक्रम ·         पीक कर्ज वाटपाच्या अनुषंगाने सनियंत्रण करणे होणार सोपे ·         शेतकरी व बँकेमध्ये समन्वय साधण्यासाठी प्रयत्न वाशिम , दि . ०८ : पीक कर्ज वाटपामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी तसेच पीक कर्ज वाटपाला गती देण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आपल्याला आवश्यक पीक कर्जासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याची सुविधा जिल्हाधिकारी कार्यालयाने उपलब्ध करून दिली आहे. ऑनलाईन स्वरुपात पीक कर्ज मागणी नोंदविल्यानंतर शेतकऱ्यांना टोकन क्रमांक व त्या कर्जासाठी कोणती कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे, याविषयी माहिती त्याच्या मोबाईलवर दिली जाणार आहे. तसेच त्यांच्या अर्जाविषयी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सनियंत्रण केले जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा उपनिबंधक रमेश कटके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मि

पीक कर्जविषयक तक्रारींचा तातडीने निपटारा करा - जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा

Image
·         खरीप पीक कर्ज वाटप आढावा बैठक वाशिम , दि . ०४ : खरीप पीक कर्ज वाटपाच्या अनुषंगाने तक्रारींसाठी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या हेल्पलाईन क्रमांक व ई-मेलवर शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. सदर तक्रारी संबंधित बँकांकडे पाठविल्या जात आहेत. या तक्रारींचा बँकांनी तातडीने निपटारा करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आज दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या खरीप पीक कर्ज वाटप आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा उपनिबंधक रमेश कटके, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय नगराळे, ‘नाबार्ड’चे जिल्हा विकास प्रबंधक विजय खंडरे यांच्यासह बँकांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. मिश्रा यांनी यावेळी जिल्ह्यातील बँकांनी आतापर्यंत वाटप केलेल्या पीक कर्जाची माहिती घेतली. तसेच यापूर्वी बँकांकडे पाठविण्यात आलेल्या तक्रारींवर बँकांनी केलेल्या कार्यवाहीचा आढावाही यावेळी घेण्यात आला. जिल्हाधिकारी श्री. मिश्रा म्हणाले, प्रत्येक पात्र शेतकऱ्याला तातडीने पीक कर्ज उपलब्ध करून देण्याची भूमिका प्रत्येक बँक अधिकाऱ्याने घ