Posts

Showing posts from January, 2022

*कोविडचे डोज न घेतलेला रुग्ण ऑक्सिजनवर* पात्र व्यक्तींनी लस घेण्याचे आवाहन

Image
*कोविडचे डोज न घेतलेला रुग्ण ऑक्सिजनवर*  पात्र व्यक्तींनी लस घेण्याचे आवाहन वाशिम दि.३०( जिमाका) वाशिम येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील जिल्हा कोविड रुग्णालयात एकूण तीन रुग्ण भरती आहे. एका रुग्णाने कोविड लसीच्या दोन्ही मात्र घेतल्या आहे. दुसऱ्या रुग्णाने कोविडची एक मात्र घेतली आहे. तिसऱ्या रुग्णाने तर कोविड लसीची एकही मात्रा घेतली नसल्यामुळे, त्याला भरती करते वेळी त्याचे ऑक्सिजनचे प्रमाण ६० टक्के होते. हा रुग्ण अत्यवस्थ परिस्थितीत भरती झाला होता.या रुग्णाला सतत ऑक्सिजनची गरज पडत आहे. कोविड लस न घेतल्यामुळे रुग्णाची झालेली ही अवस्था बघता १५ वर्षावरील सर्व पात्र व्यक्तीने लसीकरण करावे.          सध्या वाढत्या कोरोना व नव्या ओमीक्रोन विषाणूंचा संसर्ग लक्षात घेता जिल्ह्यात पात्र व्यक्तींचे १०० टक्के लसीकरण करण्यावर भर देण्यात आला आहे. कोविड लसीकरण संपूर्ण सुरक्षित आहे. लसीकरणामुळे कोविड संसर्ग झाला तरी कोरोना आजार होण्याचे प्रमाण कमी आहे.             जागतिक महामारी ठरलेल्या कोरोना संसर्गामुळे पहिल्या आणि दुसर्‍या लाटेत अनेकांना आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावण्याची वेळ आली.वैद्यक

*मिहानमध्ये तारांकित हॉटेलची उभारणी होणार**‘इंडिया सफारी’ला एमएडीसीकडून ६.७९ एकर भूखंडाचे वितरण*

Image
*मिहानमध्ये तारांकित हॉटेलची उभारणी होणार* *‘इंडिया सफारी’ला एमएडीसीकडून ६.७९ एकर भूखंडाचे वितरण*         नागपूर, दि. ३० : महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) मिहान अधिसूचित क्षेत्राच्या विशेष आर्थिक क्षेत्राबाहेर (एसईझेड) तारांकित हॉटेल उभारण्यासाठी नागपूरच्या इंडिया सफारी ॲन्ड कॅम्पस प्रा. लि. या कंपनीला ६.७९ एकर भूखंडाचे वाटप केले आहे. या उपक्रमामुळे नागपूर परिसरात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होणे अपेक्षित असून विदर्भातील रोजगार निर्मितीलाही मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे.         मिहान अधिसूचित क्षेत्राच्या विशेष आर्थिक क्षेत्राबाहेरील सेक्टर 22 मध्ये 27 हजार 490 चौ.मि. (6.79 एकर) क्षेत्रफळाच्या या भूखंडासाठी एमएडीसीने निविदा प्रक्रिया राबविली होती. त्यास अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला. कंपनी सेक्रेटरी विभागाकडून कायदेशीर सल्ला घेतल्यानंतर प्रथम क्रमांकाच्या निविदाधारक इंडिया सफारी ॲन्ड कॅम्पस प्रा. लि. यांना हे वितरण मंजूर करण्यात आले. एमएडीसीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी या वितरणास मंजूरी दिली आहे. याबाबचे स्वीकृती पत्रही या कंपनीला पाठविण्यात आले आहे

*बहुउद्देशीय कृषी संकुलाचे बांधकाम ऑगस्टपूर्वी पूर्ण करा* पालकमंत्री शंभूराज देसाई बांधकाम इमारतीची केली पाहणी

Image
*बहुउद्देशीय कृषी संकुलाचे बांधकाम ऑगस्टपूर्वी पूर्ण करा*               पालकमंत्री  शंभूराज देसाई  बांधकाम इमारतीची केली पाहणी  वाशिम दि.३० (जिमाका) जिल्ह्याचे मागासलेपण दूर होऊन जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचे दरडोई उत्पन्न वाढले पाहिजे.त्यांच्यापर्यंत शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञान पोहोचले पाहिजे.उत्पादित शेतमालावर प्रक्रिया करून विक्री व्यवस्था तसेच कृषीविषयक प्रशिक्षण देण्यासाठी बांधण्यात येत असलेल्या कृषी संकुलासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.राज्यातील हे पहिले बहुउद्देशिय कृषी संकुल असून स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देऊन हे संकुल वाशिम येथे उभारण्यात येत आहे.या बहुउद्देशीय कृषी संकुलाचे ऑगस्ट २०२२ पूर्वी बांधकाम पूर्ण करण्यात यावे.असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व कंत्राटदार यांना दिले.               २६ जानेवारी रोजी काटा रोडवरील सुंदर वाटिका भागात उभारण्यात येत असलेल्या बहुउद्देशीय कृषी संकुलाच्या बांधकामाला भेट देऊन पालकमंत्री श्री. देसाई यांनी पाहणी केली.यावेळी त्यांच्यासोबत जि.प.अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे,आमदार ऍड. किरण

*पालकमंत्री देसाई यांच्या हस्ते पोलिस विभागाच्या घडीपुस्तिकांचे प्रकाशन

Image
*पालकमंत्री देसाई यांच्या हस्ते पोलिस विभागाच्या घडीपुस्तिकांचे प्रकाशन* वाशिम दि.२८(जिमाका) पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक कार्यालयाने तयार केलेल्या विविध घडीपुस्तिकांचे प्रकाशन २६ जानेवारी रोजी पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात करण्यात आले. यावेळी जि.प.अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे,आमदार ,ऍड.किरणराव सरनाईक, आमदार अमित झनक,जि. प.अर्थ व बांधकाम समिती सभापती सुरेश मापारी, जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत व पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांची प्रमुख उपस्थिती होती.       पोलीस अधीक्षक कार्यालयातील सायबर सेल विभागाने तयार केलेल्या  घडीपुस्तिकेमध्ये सायबर सुरक्षेची गरज, सायबर बुलिंग,मार्फिंग, सायबर  ग्रुमिंग, बँकविषयक फसवणूक, सायबर गुन्हे रोखण्यासाठी नागरिकांची कर्तव्य व रिपोर्टिंग पोर्टल याबाबतची माहिती देण्यात आली आहे.      निर्भया पथक या घडीपुस्तिकेमध्ये निर्भया पथकाचे उद्दिष्ट,जिल्ह्यातील निर्भया पथकांची संख्या, आतापर्यंत निर्भया पथकाने केलेली कार्यवाही तसेच विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलाविषयक कायदयाबाबतचे मार

जलसंधारणाच्या कामांची दुरुस्ती करुनपाण्याची उपलब्धता वाढविणार- पालकमंत्री शंभूराज देसाई * सुपखेला येथे जलसंधारण कामाचे भुमीपूजन

Image
जलसंधारणाच्या कामांची दुरुस्ती करुन पाण्याची उपलब्धता वाढविणार -         पालकमंत्री शंभूराज देसाई             * सुपखेला येथे जलसंधारण कामाचे भुमीपूजन   वाशिम, दि. 27 (जिमाका) :  जिल्ह्यात जलसंधारणाची कामे करायची असल्यास भूसंपादनासाठी मोठ्या प्रमाणात निधी लागतो. त्यामुळे नव्याने जलसंधारणाची कामे करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. जिल्ह्यातील जलसंधारणाची जुनी कामे आहेत ज्यामध्ये पाण्याची साठवणूक होत नाही त्याची दुरुस्ती करुन पाण्याची उपलब्धता वाढवून जास्तीत जास्त शेती सिंचनाखाली आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले. 26 जानेवारी रोजी वाशिम तालुक्यात सुपखेला ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या पाझर तलावाचे साठवण तलावात रुपांतर करण्याच्या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री श्री.देसाई यांनी केले. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, जि.प.अर्थ व बांधकाम समिती सभापती सुरेश मापारी,जि.प.सदस्य श्रीमती पट्टेबहादूर,पंचायत समिती सदस्य विद्या खडसे, सुपखेला सरपंच विनोद पट्टेबहादूर व जिल्हा जलसंधारण अधिकारी (ल. पा.) श्री. मापारी यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री. देसाई

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येचांगल्या सुविधा निर्माण करा- पालकमंत्री शंभूराज देसाई

Image
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चांगल्या सुविधा निर्माण करा -         पालकमंत्री शंभूराज देसाई   वाशिम, दि. 27 (जिमाका) : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ग्रामीण भागातून शेतकरी बांधव तसेच नागरीक मोठ्या प्रमाणात कामानिमित्त येत असतात. शेतकरी, हमाल, मापारी व नागरीकांची  कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गैरसोय होणार याची काळजी घेऊन चांगल्या सुविधा निर्माण कराव्यात. असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिम येथे 26 जानेवारी रोजी  स्व.बाळासाहेब ठाकरे व्यापारी संकुल आणि स्व.खा.पुंडलीकराव गवळी व्यापारी संकुलाचे लोकार्पण पालकमंत्री श्री.देसाई यांनी केले. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जि.प. अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, आमदार अमित झनक, जि.प.अर्थ व बांधकाम समिती सभापती सुरेश मापारी, व मुख्य प्रशासक रेखा मापारी यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री. देसाई पुढे म्हणाले, स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी वाशिम जिल्हा निर्माण करीत असतांना सांगितले होते तालुका हे नांव बाजुला करा आणि जिल्हा लिहा. ही किमया फक्त स्व. बाळासाहेब ठाकरे करु शकले. त्यांनी एखादी गोष्ट मना

पालकमंत्री देसाई यांच्या हस्ते‘परिवर्तन ’ घडीपुस्तिकेचे प्रकाशन

Image
पालकमंत्री देसाई यांच्या हस्ते ‘परिवर्तन ’ घडीपुस्तिकेचे प्रकाशन वाशिम, दि. 27 (जिमाका) : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने समाज कल्याण विभागाच्या महत्वपूर्ण निवडक योजनांवर तयार केलेल्या ‘परिर्वतन’ घडीपुस्तिकेचे प्रकाशन 26 जानेवारी रोजी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हधिकारी कार्यालयातील वाकाटाक सभागृहात केले. यावेळी जि.प.अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, आमदार ॲड. किरणराव सरनाईक, आमदार अमित झनक, जि.प.अर्थ व बांधकाम समिती सभापती सुरेश मापारी, जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत व पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांची प्रमुख अपस्थिती होती. अनुसूचित उपयोजना सन 2021-22 या वर्षात जिल्हा माहिती कार्यालयाने ‘परिवर्तन’ ही घडीपुस्तिका तयार केली आहे. जास्तीत जास्त लाभार्थ्यांना त्यांच्यासाठी असलेल्या विविध योजनांची माहिती त्यांना व्हावी व त्यामाध्यमातून त्यांनी योजनांचा लाभ घ्यावा. या उद्देशाने ही घडीपुस्तिका तयार केली आहे. या घडीपुस्तिकेमध्ये निवडक महत्वपूर्ण योजनांची माहिती दिली आहे. यामध्ये मार्जिन मनी योजना, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण

‘ दुरदृष्टी ’ घडीपुस्तिकेचे पालकमंत्र्याच्या हस्ते प्रकाशन

Image
‘ दुरदृष्टी ’ घडीपुस्तिकेचे पालकमंत्र्याच्या हस्ते प्रकाशन वाशिम, दि. 27 (जिमाका) : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने सर्वसाधरण घटकांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती लाभार्थ्यांना व्हावी. यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाने जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2021-22 या वर्षात तयार केलेल्या ‘दुरदृष्टी’ या घडीपुस्तिकेचे प्रकाशन पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते 26 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटाक सभागृहात करण्यात आले. यावेळी जि.प.अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, आ.ॲड.किरणराव सरनाईक, आ.अमित झनक, जि.प.अर्थ व बांधकाम समिती सभापती सुरेश मापारी, जिल्हाधिकारी तथा जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत व पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांची प्रमुख अपस्थिती होती. ‘दुरदृष्टी’ या सर्वसाधारण योजनेवरील घडीपुस्तिकेत कृषि यांत्रिकीकरण, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, दुधाळ जनावरांचे गट वाटप, मच्छीमार सहकारी संस्थांना अर्थसहाय्य, जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजना, माझी कन्या भाग्यश्री, जननी शिशू सुरक्षा योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना

*सामान्य माणसात पोलिसांबाबत विश्वास आणि गुंडांना दहशत बसेल असे प्रभावी काम व्हावे* पालकमंत्री शंभूराज देसाई

Image
*सामान्य माणसात पोलिसांबाबत विश्वास आणि गुंडांना दहशत बसेल असे प्रभावी काम व्हावे*                    पालकमंत्री शंभूराज देसाई  * डायल 112 नियंत्रण कक्षाला भेट  * वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केलेल्या   अधिकारी - कर्मचाऱ्यांचा सत्कार  वाशिम दि.२६( जिमाका) वाशिम जिल्हा लहान असला तरी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम पोलिसांना करायचे आहे. पोलीस अधीक्षक बच्चन सिंह हे कल्पकतेतून काम करीत असून विविध उपक्रम ते जिल्ह्यात राबवित आहे.भविष्यात देखील आणखी चांगल्या प्रकारचे उपक्रम वाशिम पोलीस दलाच्या माध्यमातून राबविण्यात यावे. सामान्य माणसाला पोलिसांबाबत विश्वास निर्माण करून आणि गुंडांना दहशत बसेल असे प्रभावी काम वाशिम पोलीस दलाने करावे. असे प्रतिपादन पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.            आज २६ जानेवारी रोजी पालकमंत्री श्री. देसाई यांनी पोलिस अधीक्षक कार्यालय भेट दिली.यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे,आमदार ऍड.किरणराव सरनाईक, आमदार अमित झनक,जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत,जि.प.अर्थ व बांधकाम समिती सभ

*पालकमंत्री देसाई यांच्या हस्ते अभ्यासिकेचे लोकार्पण

Image
*पालकमंत्री देसाई यांच्या हस्ते अभ्यासिकेचे लोकार्पण* वाशिम दि.२६ (जिमाका) वाशिम शहरातील मुला-मुलींना राज्य लोकसेवा आयोग व इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करता यावी यासाठी वाशिम नगर परिषदेने जिल्हा वार्षिक योजनेच्या नाविन्यपूर्ण योजनेतून जुन्या आययुडीपी कॉलनीतील शिव विद्या मंदिरात तयार केलेल्या सुसज्ज अभ्यासिकेचे लोकार्पण पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज २६ जानेवारी रोजी केले. यावेळी आमदार अमित झनक, जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम समिती सभापती सुरेश मापारी, नगरपरिषदेचे प्रशासक प्रकाश राऊत व मुख्याधिकारी दीपक मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. सुसज्ज असलेल्या या अभ्यासिकेची मुलामुलींना बसण्याची क्षमता १२५ इतकी आहे.वातानुकूलित बैठक व्यवस्था १४, सर्वसाधारण बैठक व्यवस्था ११८, एक ग्रंथालय,एक सर्वसामान्य वाचक कक्ष आणि एक वर्ग खोली आहे. ही अभ्यासिका तयार करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या नाविन्यपूर्ण योजनेतून ७६ लक्ष २४ हजार रुपये आणि नगर परिषद निधीतून ५३ लक्ष ८४ हजार रुपये असे एकूण १ कोटी ३० लक्ष ८ हजार ४८७ रुपये खर्च करण्यात आले. सुसज्ज अशा या अभ्यासिकेमुळे वाशिम शहरात स्पर्धा परीक्षेची तयारी क

*मुदतीत निधी खर्च करून गुणवत्तापूर्ण कामे करा* पालकमंत्री शंभूराज देसाई जिल्हा

Image
*मुदतीत निधी खर्च करून गुणवत्तापूर्ण कामे करा*              पालकमंत्री शंभूराज देसाई  जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा  वाशिम दि.२६ (जिमाका) जिल्ह्याच्या ग्रामीण आणि शहरी भागाच्या विकासासाठी नियोजन समितीकडून जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात येतो. सर्व संबंधित यंत्रणांनी या निधीतून कामे करताना कोणतीही अडचण येणार नाही याची दक्षता घ्यावी. जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतील कामे विहित मुदतीत निधी खर्च करून गुणवत्तापूर्ण करावी.असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.              आज २६ जानेवारी रोजी वाकाटक सभागृहात जिल्हा नियोजन समितीच्या जिल्हा वार्षिक योजना सन  २०२१-२२ चा आढावा आयोजित सभेत घेताना पालकमंत्री श्री देसाई बोलत होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे,आमदार एड. किरणराव सरनाईक, आमदार अमित झनक,जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, जि.प अर्थ व बांधकाम समिती सभापती सुरेश मापारी, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिता आंबरे यांची प्रमुख उपस्थिती होती.               श्री देसाई पुढे म्हणाले, मुदतीत का

*मागासलेपण दूर करून जिल्ह्याला विकासाच्या प्रवाहात आणणार* पालकमंत्री शंभूराज देसाई

Image
*मागासलेपण दूर करून जिल्ह्याला विकासाच्या प्रवाहात आणणार*             पालकमंत्री शंभूराज देसाई  भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७२ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा वाशिम दि २६ (जिमाका) जिल्ह्याचे मागासलेपण ओळखून जिल्ह्याचा समावेश आकांक्षित जिल्हा म्हणून करण्यात आला आहे. विकास प्रणालीच्या संदर्भात जी मानके आहेत त्याच्या काही बाबी आपण पूर्ण करू शकलो नाही.मागील दोन वर्षापासून जिल्ह्यात अनेक योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. आकांक्षीत जिल्हा म्हणून असलेला ठपका पुसून काढून जिल्ह्याचे मागासलेपण दूर करून जिल्ह्याला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.          भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७२ व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्‍य शासकीय ध्‍वजारोहण पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते आज २६ जानेवारी रोजी पोलिस कवायत मैदान येथे करण्यात आले. सर्वप्रथम पोलीस दलाच्या पथकाने राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. ध्वजारोहणानंतर उपस्थितांना संबोधित करताना श्री. देसाई बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, आमदार ऍड. किरणराव सरनाईक, आमदार अमित झन

*जिल्हाधिकारी कार्यालय येथे राष्ट्रध्वजारोहण

Image
* जिल्हाधिकारी कार्यालय येथे राष्ट्रध्वजारोहण * वाशिम दि.२६(जिमाका) भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७२ व्या वर्धापन दिनानिमित्त आज २६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पोलीस पथकाने राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हाधिकारी सुहासिनी गोणेवार, नितीन चव्हाण, जिल्हा पुरवठा अधिकारी तेजश्री कोरे, राष्ट्रीय सूचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार, अधीक्षक राहुल वानखडे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर तसेच विविध कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन मोहन शिरसाठ यांनी केले.

तहसिल कार्यालय रिसोड येथे राष्ट्रीय मतदार दिवस साजरा

Image
तहसिल कार्यालय रिसोड येथे  राष्ट्रीय मतदार दिवस साजरा वाशिम, दि.25(जिमाका) नागरिकांमध्ये मतदानाविषयी व नवमतदार यांची नोंदणी करणे याबाबत जास्तीत जास्त लोकांना आपला मतदानाचा अधिकार बजावता यावा याबाबत जागृती होण्यासाठी दरवर्षी 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात येतो.आज 25 जानेवारी रोजी तहसिल कार्यालय रिसोड येथे 12 वा राष्ट्रीय मतदार दिवस कोरोनाच्या नियमांचे पालन करुन उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला." सर्वसमावेशक सुलभ आणि सहभागपुर्ण निवडणुका " अशी यावर्षीच्या मतदार दिनाची मध्यवर्ती संकल्पना होती, त्याअनुषंगाने रिसोड येथील स्व.पुष्यादेवी पाटील कला व विज्ञान महाविदयालय व उत्तमचंद बगडीया महाविदयालयात निबंध स्पर्धा,चित्रकला स्पर्धा, व्हिडीओ तयार करणे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आज या स्पर्धेतील विजेत्यांना तहसिलदार अजित शेलार यांच्या हस्ते प्रमाणपत्र देवुन गौरविण्यात आले. कार्यक्रमाला तहसिल कार्यालयातील सर्व कर्मचारी / अधिकारी यांनी मतदार दिनानिमित्त कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करु अशी शपथ घेतली.अध्यक्षस्थानी तहसिलदार अजित शेलार होते. प्र

*प्लास्टिक राष्ट्रध्वजाच्या विक्री व वापरास मनाई

Image
*प्लास्टिक राष्ट्रध्वजाच्या विक्री व वापरास मनाई* वाशिम दि.२५(जिमाका)२६ जानेवारी या राष्ट्रीय सणाच्या दिवशी लहान आकारातील कागदी किंवा प्लास्टिक राष्ट्रध्वजाची मोठ्या प्रमाणात विक्री करण्यात येते. शालेय विद्यार्थी व लहान मुले यांच्यासह अनेक व्यक्ती राष्ट्रभक्ती आणि उत्साहामुळे राष्ट्रध्वज विकत घेतात.  त्याच दिवशी सायंकाळी किंवा दुसऱ्या दिवशी इतरत्र हे ध्वज टाकले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अपमान होतो. काही वेळा तसेच विशेष कला व क्रीडा स्पर्धेच्या प्रसंगी वैयक्तिकरित्या वापरण्यात येणारे राष्ट्रध्वज इतरत्र टाकले जातात. तर रस्त्यात विखुरलेले राष्ट्रध्वज प्लास्टिकचे असतील तर प्लास्टिक बरेच दिवस नष्ट होत नाही. त्यामुळे बरेच दिवस त्याच ठिकाणी पडून असतात. राष्ट्रहिताच्या दृष्टीने ही गंभीर बाब आहे. राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही त्यासाठी प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाची विक्री व वापर कोणीही करू नये. असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.       राष्ट्रध्वजाचा आदर करणे हे देशातील प्रत्येक नागरिकाचे आद्य कर्तव्य आहे.राष्ट्रध्वजाचा अवमान करणे व त्याची विटंबना करणे हा दंडनीय अपराध आहे.

*27 फेब्रुवारीला पल्स पोलिओ लसीकरण मोहिम*लसीकरण मोहिमेची तयारी पुर्ण १ लाख २१ हजार २६८ बालकांना पाजणार पोलिओ डोस

Image
*27 फेब्रुवारीला पल्स पोलिओ लसीकरण मोहिम* लसीकरण मोहिमेची तयारी पुर्ण  १ लाख २१ हजार २६८ बालकांना  पाजणार पोलिओ डोस वाशिम दि.२५(जिमाका) राज्यात पल्स पोलिओ लसीकरण मोहिम १९९५ पासून राबविण्यात येत आहे.  सन २०२२ या वर्षात २७ फेब्रुवारी २०२२  रोजी ही मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ० ते ५ वर्ष वयोगटातील अपेक्षित लाभार्थी बालकांची संख्या ग्रामीण भागात ८६,०६४ आणि नागरी भागात ३५,२०४ अशी एकूण १ लाख २१ हजार २६८ आहे.त्यासाठी ग्रामीण भागात ८३१ आणि नागरी भागात १३० असे एकूण ९६१ पल्स पोलिओ लसीकरण बूथ राहणार आहे. बुथवर काम करण्यासाठी ग्रामीण भागात २१५९ आणि नागरी भागात ३८२ असे एकूण २५४१ मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले आहे.ही मोहीम प्रभावीपणे ग्रामीण भागात राबविण्यासाठी १६८ व शहरी भागासाठी २६ असे एकूण १९४ पर्यवेक्षक नियुक्त केले आहे.              २७ फेब्रुवारीला सकाळी ८ वाजतापासून या मोहिमेला सुरुवात होईल. सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५ वर्षाखालील सर्व बालकांना लस पाजण्याचे काम करण्यात येईल.  वीटभट्टया,गिट्टी खदान व एकदा मजुरांच्या वस्त्यांमधील लाभार्थी संरक्षित करण्यासाठी ग्रामीण भागात २४ आणि नागरी भागात

आज राष्ट्रीय मतदार दिवस मतदार घेणार प्रतिज्ञा

Image
आज राष्ट्रीय मतदार दिवस मतदार घेणार प्रतिज्ञा            वाशिम ,   दि.   24  (जिमाका) : 25 जानेवारी 1950 रोजी भारत निवडणूक आयोगाची स्थापना झाली. आयोगाचा हा स्थापना दिवस 2011 पासून दरवर्षी देशात राष्ट्रीय मतदार दिवस म्हणुन साजरा करण्यात येतो.हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश हा मतदारांना ,विशेषत: नवमतदारांना मतदार यादीत नाव नोंदणीसाठी प्रोत्साहन देणे व सुलभरित्या त्यांची नांव नोंदणी करुन घेणे हा आहे. 25 जानेवारी 2022 रोजी साजरा करण्यात येणाऱ्या 12 व्या राष्ट्रीय मतदार दिवसासाठी सर्वसमावेशक,सुलभ आणि सहभागपूर्ण निवडणुका हा विषय आयोगाकडून देण्यात आला आहे.         कोवि‍ड आचारसंहीतेचे पालन करुन हा दिवस साजरा करण्यात येणार आहे. तसेच ऑनलाईन पध्दतीने देखील साजरा करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम स्थानिक स्वराज्य संस्था ,शैक्षणिक संस्था,नागरी सामाजिक गट, राष्ट्रीय सेवा योजना,राष्ट्रीय छात्र सेना, स्काऊट व गाईड,नेहरु युवा केंद्राच्या युवकांचा तसेच सेवाभावी संस्थेंचा यामध्ये सहाभाग राहणार आहे.            राष्ट्रीय मतदार दिवसाचे औचित्य साधून मतदारांसाठी असलेली प्रतिज्ञा पुढीलप्रमाणे आहे. आ

*आव्हान निधी मिळण्यासाठी जिल्ह्याने प्रयत्न करावे* अर्थमंत्री अजित पवार सन २०२२-२३ वर्षांसाठी १५ कोटींचा वाढीव निधी मंजूर

Image
*आव्हान निधी मिळण्यासाठी जिल्ह्याने प्रयत्न करावे*                     अर्थमंत्री अजित पवार   सन २०२२-२३ वर्षांसाठी १५ कोटींचा वाढीव निधी मंजूर वाशिम दि २४ (जिमाका) जिल्ह्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी यंत्रणांना निधी उपलब्ध करून देण्यात येतो.यंत्रणांनी उत्कृष्टपणे कामे करताना हा निधी विहित कालावधीत खर्च करावा.सर्वच यंत्रणांनी आयपास प्रणालीचा १०० टक्के वापर करून जिल्ह्याला आणखी ५० कोटी रुपयांचा आव्हान निधी मिळण्यासाठी प्रयत्न करावे.असे उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री अजित पवार यांनी सांगितले.             आज २४ जानेवारी रोजी जिल्‍हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२२-२३ चा वाशिम जिल्ह्याचा आढावा राज्यस्तरीय बैठकीतून श्री. पवार यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून घेतला. यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासमवेत पालकमंत्री शंभूराज देसाई व मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालय येथून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे,जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिता आंबरे, जिल्हा आरो

*नंदूरबारच्या अनोख्या संकल्पनेची नीती आयोगाकडुन विशेष दखल* *आकांक्षित जिल्हे देशासाठी गतीवर्धक- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी**विकासाच्या दऱ्या सांधण्यासाठी सांघिक प्रयत्न आवश्यक- मुख्यमंत्री*

Image
जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय) *सेंट्रल किचनने पुरवला  आश्रमशाळेतील ११ हजार विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार* *नंदूरबारच्या अनोख्या संकल्पनेची नीती आयोगाकडुन विशेष दखल*   *आकांक्षित जिल्हे देशासाठी गतीवर्धक- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी* *विकासाच्या दऱ्या सांधण्यासाठी सांघिक  प्रयत्न आवश्यक- मुख्यमंत्री* मुंबई दिनांक २२ : नंदूरबार जिल्ह्यात आदिवासी विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या ३० आश्रमशाळा तसेच एकलव्य शाळांमधील ११ हजार विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या सेंट्रल किचनमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यात सुधारणा झाल्याची विशेष दखल आज नीती आयोगाने केलेल्या सादरीकरणात घेण्यात आली व या उपक्रमाचा उत्तम संकल्पना (बेस्ट प्रॅक्टीस ) म्हणून गौरव देखील केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज उत्तम कामगिरी करणाऱ्या देशातील काही आकांक्षित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला. बैठकीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.   आकांक्षित जिल्हे हे विकासाच्या मार्गावर मार्गस्थ होतांना देशासाठी गतिरोधक नाही तर गतीवर्धक म्हणून काम करत असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

२४ जानेवारीला राष्ट्रीय बालिका दिन सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घ्यावा डाक विभागाचे आवाहन

Image
२४ जानेवारीला राष्ट्रीय बालिका दिन          सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घ्यावा         डाक विभागाचे आवाहन वाशिम दि.२२(जिमाका) सुकन्या समृद्धी योजनेचा सातवा वर्धापन दिन भारतीय डाक विभाग येत्या २४ जानेवारीला साजरा करीत आहे.पोस्ट विभाग मुलींचे भविष्य उज्वल व सक्षम करण्याची संधी देत आहे. सुकन्या समृद्धी योजना ही भारत सरकारची एक छोटी ठेव योजना आहे. जी केवळ मुलींसाठी आहे. "बेटी बचाव बेटी पढाओ" चा तो एक भाग म्हणून सुरू करण्यात आली आहे.             मुलीच्या उच्च शिक्षणासाठी व तिच्या विवाहासाठी तसेच महिला सक्षमीकरण करणे या उद्देशाने भारत सरकारने ही योजना सुरू केली आहे.  मुलीच्या उज्वल भविष्यासाठी राष्ट्रीय बालिका दिनाचे औचित्य साधून १० वर्षाखालील मुलींचे उज्वल भविष्य साधण्यासाठी सुकन्या खाते काढल्यापासून १५ वर्षे दरमहा रक्कम  भरल्यास २१ व्या वर्षी ७.६ टक्के प्रमाणे रक्कम मिळणार आहे. दरमहा बचत १ हजार रुपये केल्यास एका वर्षात १२ हजार रुपये रक्कम जमा होईल.१५ वर्षात ही रक्कम १ लाख ८० हजार रुपये जमा होईल.मुलीच्या २१ व्या वर्षात ३ लाख ३० हजार ३७३ रुपये जमा होईल. २१ व्या वर्षात चालू व्याजावर

कृषी पंपाच्या वीज देयकाची थकबाकी भरण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करा- ऊर्जामंत्री डॉ. राऊत

Image
  कृषी पंपाच्या वीज देयकाची थकबाकी भरण्यासाठी शेतकऱ्यांना   प्रोत्साहित करा- ऊर्जामंत्री डॉ. राऊत   वाशिम ,   दि.   19   (जिमाका) : कृषी पंपाच्या वीज देयकाची थकबाकी भरण्यासाठी वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना   प्रोत्साहित   करण्यासाठी शेतकरी मेळावे घेण्यात यावे. तसेच ग्रामपंचायत पातळीवर बैठका घेऊन कृषी धोरण- 2020 ची माहिती शेतकऱ्यांना देण्यात यावी. असे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले. यासोबतच वीज जोडण्यासाठी पैसे भरूनही आजवर कृषी पंप जोडणी न मिळालेल्या शेतकऱ्यांना प्राधान्याने वीज जोडणी देण्याचे निर्देशही यावेळी डॉ. राऊत यांनी अधिकाऱ्यांना दिले.                जिल्हयातील रिसोड-मालेगाव विधानसभा मतदार सं घाचे आ. अमित झनक यांच्या पुढाकाराने वाशीम जिल्ह्यातील वीज विषयक समस्यांचा आढावा ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून घेतला. यावेळी ते बोलत होते. डॉ. राऊत पुढे म्हणाले, कृषी पंपाच्या थकबाकीसोबतच नवीन वीज जोडणीसाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना लवकर वीज जोडणी कशी मिळेल यासाठी अधिकारी वर्गाने प्रयत्न करावे. यासाठी जिल्हा पातळीवर

समाज कल्याण विभागाच्या योजनांवरील डिजीटल चित्ररथाचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते शुभारंभ

Image
  समाज कल्याण विभागाच्या योजनांवरील डिजीटल चित्ररथाचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते शुभारंभ           वाशिम ,   दि.   18 (जिमाका) : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध महत्वपूर्ण योजनांची माहिती संबंधित घटकातील लाभार्थ्यांना व्हावी यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाने अनुसूचित जाती उपयोजना सन 2021-22 अंतर्गत तयार केलेल्या डिजीटल चित्ररथाचा शुभारंभ जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी 17 जानेवारी रोजी प्रशासकीय इमारत परिसरात चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून केला. यावेळी समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त मारोती वाठ आणि जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती.             डिजीटल चित्ररथाच्या माध्यमातून समाज कल्याण विभागाच्या महत्वपूर्ण योजनांवर तयार केलेला ‘दिशा परिवर्तनाची’ हा माहितीपट आणि आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना व अनुसूचित जातीच्या बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व उपसाधनांचा पुरवठा या योजनांवर आधारित ऑडिओ-व्हिडी

कन्या समृध्दी योजना लाभ घेण्याचे आवाहन

  कन्या समृध्दी योजना लाभ घेण्याचे आवाहन           वाशिम ,   दि.   18 (जिमाका) : भारतीय डाक विभागाच्यावतीने मुलींचे भविष्य उज्जवल करण्याची संधी देते. पोस्ट विभागामध्ये लहान बचत योजनांची विस्तृत श्रेणी केली आहे. कन्या समृध्दी योजना ही भारत सरकारची एक छोटी ठेव योजना आहे. जी केवळ मुलींसाठी आहे आणि ती बेटी बचाओ बेटी पढाओचा एक भाग म्हणून सुरु करण्यात आली आहे. मुलीच्या शिक्षणाचा आणि लग्नाचा खर्च भागविण्यासाठी ही योजना आहे. 10 वर्षाखालील मुलींसाठी किमान 250 रुपयेसह खाते उघडले जाऊ शकते. 17 ते 31 जानेवारी 2022 पर्यंत वाशिम जिल्हयाअंतर्गत येणाऱ्या पोस्ट कार्यालयामध्ये सुकन्या समृध्दी योजनेचे खाते उघडण्याची विशेष मोहिम राबविली जात आहे. त्यामुळे सार्वजनिक सदस्य लाभार्थी ओळखून आणि जवळच्या पोस्ट कार्यालयामध्ये एसएसवाय खाते उघडून 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींसाठी 250 रुपये योगदान देऊ शकतात. तसेच एसएसवाय खाते उघडल्यानंतर आपण आयपीपीबी खात्यामार्फत आपले पुढील भरणा ऑनलाईन पध्दतीने भरु शकता. फक्त 250 योगदान दया आणि मुलींच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी दिवा लावा.              तरी जिल्हयातील सर्व नागरी

*नगर पंचायत मानोरा आणि ग्रामपंचायत पोटनिवडणूक* *मतदान व मतमोजणीच्या दिवशी प्रतिबंधात्मक आदेश*

Image
*नगर पंचायत मानोरा आणि ग्रामपंचायत पोटनिवडणूक*   *मतदान व मतमोजणीच्या दिवशी प्रतिबंधात्मक आदेश* वाशिम, दि. १५ (जिमाका) नगर पंचायत मानोरा व जिल्ह्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणुक- २०२१ चा कार्यक्रम जाहीर झाला आहे. जिल्हयातील नगर पंचायत, मानोरा व जिल्ह्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने १८ जानेवारी रोजी मतदान व १९ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे.               नगर पंचायत,मानोरा व ग्रामपंचायत पोटनिवडणुक दरम्यान मतदान व मतमोजणीच्या दिवशी लोक राजकीय कारणावरुन विनाकारण भांडण तंटे करतात व त्याचे रुपांतर मोठया भांडणात होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता असते. या सर्व बाबींना प्रतिबंध घालण्यासाठी व निवडणुक प्रक्रियेदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे उद्देशाने निवडणुकीची संपुर्ण प्रक्रिया शांततेत व निर्भय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोणातुन या निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्याकरीता संबंधित निवडणुक क्षेत्रात १७ जानेवारी रोजी सकाळी ६ ते मतदानाच्या दिवशी १८ जानेवारी रोजीचे सायंकाळी ६ वाजेपर्यंत तसेच मतमोजणीचे दिवशी १९ जानेवारी रोजी स

वाशिम येथे बेकरीवर कारवाई चार बाल कामगारांची सुटका

  वाशिम येथे बेकरीवर कारवाई चार बाल कामगारांची सुटका           वाशिम, दि. 14 (जिमाका) : बाल कामगार व किशोरवयीन कामगार प्रतिबंध व नियमन अधिनियमातर्गत जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांचे नियंत्रणाखालील गठित कृतीदलाने आज 14 जानेवारी रोजी वाशिम शहरातील एका आस्थापनेमध्ये काम करणाऱ्या चार बालकामगारांची सुटका केली. बालकामगार या अनिष्ठ प्रथेचे उच्चाटन करण्यासाठी   वाशिम येथे एका आस्थापनेवर धाड टाकली असता तपासणी दरम्यान केकतउमरा रोडवरील, सिंघम बेकरी निमजगाच्या आस्थापनेत एकूण चार बालकामगार काम करीत असल्याचे आढळून आले. कृती दलाने या बालकामगारांची सुटका करुन संबंधित आस्थापनाधारक रमेश मौर्या यांचेविरुध्द वाशिम शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला.               बालकामगार व किशोरवयीन कामगार प्रतिबंध व नियमन अधिनियम अंतर्गत कोणत्याही आस्थापनेत बालकामगारांचा सहभाग असल्यास त्याबाबत कोणताही नागरीक, पोलीस अधिकारी किंवा सरकारी कामगार अधिकारी तक्रार नोंदवु शकतो. या कायद्याचे उल्लंघन केल्यास काम करुन घेणाऱ्याविरुध्द कलम 14 नुसार दंडात्मक कारवाई करण्यात येते. तरी बालकामगार या अनिष्ठ प्रथेचे समुळ उच्चा

मार्जिन मनी योजनेसाठी अर्ज मागविले

  मार्जिन मनी योजनेसाठी अर्ज मागविले           वाशिम, दि. 14 (जिमाका) :   केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकातील लाभार्थ्यांकरीता मार्जिन मनी योजना सुरु करण्यात आली आहे. यासाठी केंद्र शासनाने 10 हजार कोटींची तरतूद केली आहे. सदर रक्कम लघु औद्योगिक विकास, बँक ऑफ इंडियाकडे वर्ग करण्यात आली आहे. या बँकेने या रक्कमेची सुरक्षा हमी कवच तयार केले असून लाभार्थ्यांना जे कर्ज दिले जाईल त्याला ही बँक हमी देईल. या योजनेअंतर्गत राज्यातील अनुसूचित जातीच्या सवलती घेण्यास पात्र असलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील नवउद्योजक यांनी 10 टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत 75 टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित 25 टक्के सबसीडी राज्य शासनामार्फत देण्यात येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय   www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर निरिक्षणासाठी उपलब्ध आहे.                या योजनेकरीता इच्छुक लाभार्थ्यांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, वाशिम यांचेकडे शासन निर्णयात नमुद करण्यात आलेल्या सर्व अटी व शर्तीची पुर्तता करुन प्रस्त

*राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार*२०२१ साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

Image
*राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार* २०२१ साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन वाशिम, दि.14 (जिमाका) माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता,उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा,उत्कृष्ट छायाचित्रकार,समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी, 2021 ते 31 डिसेंबर, 2021 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दिनांक 31 जानेवारी 2022 असा आहे. उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2021 चे माहितीपत्रक/अर्जाचे नमुने शासनाच्या www.maharashtra.gov.in आणि महासंचालनालयाच्या dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच राज्यातील विविध भागातील स्पर्धकांना संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांना, तसेच दिल्ली येथील पत्रकारांनी आपल्या प्रवेशिका थेट किंवा महाराष्ट्र परिचय केंद्रामार्फत मुख्यालयात  माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते चित्ररथाचा शुभारंभ

Image
                     जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते चित्ररथाचा शुभारंभ           वाशिम ,   दि.   13 (जिमाका) : जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या हस्ते परिवर्तन चित्ररथ आणि समता चित्ररथाचा शुभारंभ आज 13 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात हिरवी झेंडी दा खवून करण्यात आला. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी सुनिता आंबरे, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त मारोती वाठ, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, मानव विकास मिशनचे जिल्हा नियोजन अधिकारी श्री. सोनखासकर, जिल्हा माहिला व बाल विकास अधिकारी अलोक अग्रहरी, वाशिम नगरपालीकेचे मुख्याधिकारी दिपक मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.                   जिल्हा माहिती कार्यालयाने कोरोनाविषयक जनजागृती आणि विविध योजनांची माहिती संबंधित घटकातील लाभार्थ्यांना व्हावी. यासाठी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2021-22 यावर आधारीत परिवर्तन चित्ररथ आणि अनुसूचित जाती उपयोजना सन 2021-22 यावर आधारीत समता चित्ररथ तयार केला आहे. हे चित्ररथ जिल्हयातील शहरी आणि ग्रामीण भागात जाणार असल्यामुळे नागरीकांना तसेच लाभार्थ्यांना या चित्ररथाच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती म