कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जिल्हयातील 1 ली ते 8 वीचे वर्ग 31 जानेवारीपर्यंत बंद राहणार

 

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे

जिल्हयातील 1 ली ते 8 वीचे वर्ग 31 जानेवारीपर्यंत बंद राहणार

वाशिम, दि. 08 (जिमाका) : जिल्हयात कोरोना संसर्गाचा वेग झपाटयाने वाढत आहे. कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हयातील ग्रामीण आणि शहरी भागातील इयत्ता 1 ली ते 8 वी पर्यंतचे सर्व शासकीय, निमशासकीय व खाजगी शाळेतील वर्ग बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले आहे. ऑनलाईन पध्दतीने हे वर्ग सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. इयत्ता 9 वी ते 12 वी पर्यंतचे वर्ग कोविड-19 च्या अनुषंगाने आवश्यक असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करुन शाळेमध्ये प्रत्यक्ष अध्ययन सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोविड- 19 च्या परिस्थितीचा आढावा घेऊन 31 जानेवारी 2022 नंतर सुधारीत आदेश निर्गमित करण्यात येतील. राज्यात अनेक ठिकाणी कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा विचार करुन अकृषी विद्यापिठे व त्यांच्याशी संलग्नीत महाविद्यालये, अभिमत विद्यापिठे तसेच शैक्षणिक संस्थेतील वर्ग बंद करण्याचे आदेश यापूर्वी शासनाने दिले आहे. तंत्रनिकेतनमधील विद्यार्थी हे 15 ते 18 वयोगटातील असल्याने या वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण सुरु असल्याने संबंधित प्राचार्यानी लसीकरण करावयाच्या विद्यार्थ्यांची यादी स्थानिक प्राधिकरणाला उपलब्ध करुन दयावी व विशेष मोहिमेतून विद्यार्थ्यांचे लसीकरण पुर्ण करण्यात यावे. ज्या शिक्षकीय/ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे लसीकरण झालेले नाही. त्यांचा तपशिल जिल्हाधिकारी कार्यालयाला उपलब्ध करुन देऊन स्थानिक प्राधिकरणाशी संपर्क साधून विशेष मोहिमेतून लसीकरण पुर्ण करावे. महाविद्यालयीन शिक्षकीय/ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची उपस्थिती 50 टक्के करण्यात येऊन चक्राकार पध्दतीने त्यांच्या कार्यालयीन उपस्थितीबाबत व वर्क फ्रॉम होमचे नियोजन  करण्यात यावे. वेळोवेळी निर्गमि‍त करण्यात आलेले आदेश व मार्गदर्शक सुचना व त्यानुसार लागु असणारे प्रतिबंधात्मक आदेश व उपाययोजना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या विरुध्द नियमानूसार कारवाई करण्यात येईल.

*******

 


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे