*कोविडचे डोज न घेतलेला रुग्ण ऑक्सिजनवर* पात्र व्यक्तींनी लस घेण्याचे आवाहन

*कोविडचे डोज न घेतलेला रुग्ण ऑक्सिजनवर* 

पात्र व्यक्तींनी लस घेण्याचे आवाहन

वाशिम दि.३०( जिमाका) वाशिम येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील जिल्हा कोविड रुग्णालयात एकूण तीन रुग्ण भरती आहे. एका रुग्णाने कोविड लसीच्या दोन्ही मात्र घेतल्या आहे. दुसऱ्या रुग्णाने कोविडची एक मात्र घेतली आहे. तिसऱ्या रुग्णाने तर कोविड लसीची एकही मात्रा घेतली नसल्यामुळे, त्याला भरती करते वेळी त्याचे ऑक्सिजनचे प्रमाण ६० टक्के होते. हा रुग्ण अत्यवस्थ परिस्थितीत भरती झाला होता.या रुग्णाला सतत ऑक्सिजनची गरज पडत आहे. कोविड लस न घेतल्यामुळे रुग्णाची झालेली ही अवस्था बघता १५ वर्षावरील सर्व पात्र व्यक्तीने लसीकरण करावे.
         सध्या वाढत्या कोरोना व नव्या ओमीक्रोन विषाणूंचा संसर्ग लक्षात घेता जिल्ह्यात पात्र व्यक्तींचे १०० टक्के लसीकरण करण्यावर भर देण्यात आला आहे. कोविड लसीकरण संपूर्ण सुरक्षित आहे. लसीकरणामुळे कोविड संसर्ग झाला तरी कोरोना आजार होण्याचे प्रमाण कमी आहे.
            जागतिक महामारी ठरलेल्या कोरोना संसर्गामुळे पहिल्या आणि दुसर्‍या लाटेत अनेकांना आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावण्याची वेळ आली.वैद्यकीय क्षेत्रातील संशोधकांनी दिवस-रात्र मेहनत करून कोरोनाचा संसर्ग रोखणारी लस विकसित केली. 
         देशात १६ जानेवारी २०२१ पासून कोविड लसीकरणाला सुरुवात झाली. पात्र व्यक्तींचे लसीकरण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने पात्र व्यक्तींचे लसीकरण झाले आहे.यामध्ये विशिष्ट कालावधीत घेतलेल्या दोन लसीचा समावेश आहे.मात्र काही व्यक्तींनी लसीबाबत गैरसमज करून घेतले.तर काहीनी अफवांमुळे लस घेतली नाही. 
         जिल्हा सामान्य रुग्णालयातील जिल्हा कोविड रुग्णालय येथे कोरोनावर उपचार घेत असलेल्या ज्या एका रुग्णाने कोविड लसीची एकही मात्रा घेतलेली नाही. त्यामुळे तो रुग्ण  आज ऑक्सिजनवर आहे. ही वेळ भविष्यात कोणावर येऊ नये. यासाठी प्रत्येक पात्र व्यक्तीने कोविड लसीच्या  दोन्ही मात्रा निर्धारित वेळेत घ्याव्यात. असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धर्मपाल खेळकर यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे