*नगर पंचायत मानोरा आणि ग्रामपंचायत पोटनिवडणूक* *मतदान व मतमोजणीच्या दिवशी प्रतिबंधात्मक आदेश*

*नगर पंचायत मानोरा आणि ग्रामपंचायत पोटनिवडणूक*

  *मतदान व मतमोजणीच्या दिवशी प्रतिबंधात्मक आदेश*

वाशिम, दि. १५ (जिमाका) नगर पंचायत मानोरा व जिल्ह्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणुक- २०२१ चा कार्यक्रम जाहीर झाला आहे. जिल्हयातील नगर पंचायत, मानोरा व जिल्ह्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने १८ जानेवारी रोजी मतदान व १९ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. 
             नगर पंचायत,मानोरा व ग्रामपंचायत पोटनिवडणुक दरम्यान मतदान व मतमोजणीच्या दिवशी लोक राजकीय कारणावरुन विनाकारण भांडण तंटे करतात व त्याचे रुपांतर मोठया भांडणात होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता असते. या सर्व बाबींना प्रतिबंध घालण्यासाठी व निवडणुक प्रक्रियेदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे उद्देशाने निवडणुकीची संपुर्ण प्रक्रिया शांततेत व निर्भय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोणातुन या निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्याकरीता संबंधित निवडणुक क्षेत्रात १७ जानेवारी रोजी सकाळी ६ ते मतदानाच्या दिवशी १८ जानेवारी रोजीचे सायंकाळी ६ वाजेपर्यंत तसेच मतमोजणीचे दिवशी १९ जानेवारी रोजी सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ लागु करण्यात आल्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले आहे.
*******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे