कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांनी सानुग्रह सहाय्यासाठी दोन दिवसात ऑनलाईन अर्ज करावे
कोरोनामुळे
मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांनी
सानुग्रह सहाय्यासाठी दोन दिवसात ऑनलाईन अर्ज
करावे
वाशिम, दि. 06 (जिमाका) : कोविड-19 विषाणूच्या संसर्गामुळे मृत पावलेल्या
व्यक्तींच्या जवळच्या कायदेशीर वारसास 50 हजार रुपये सानुग्रह सहाय्य देण्याचा
निर्णय शासनाने घेतला आहे. त्याअनुषंगाने जिल्हयात एकुण 823 अर्ज प्राप्त झाले.
आहे. यातील नियमात बसणारे 257 प्रकरणे सानुग्रह सहाय्यासाठी मंजूर करण्यात आलेली
आहेत. जिल्हयात कोविडमुळे मृत्यु पावलेल्या नागरिकांची संख्या 640 एवढी असल्याचे
आयसीएमआर पोर्टलवरुन दिसून येते. अजूनही 380 जवळच्या नातेवाईकांनी ऑनलाईन अर्ज
दाखल केलेले नाही. सानुग्रह अनुदान मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज दाखल केले नसल्यामुळे
कोविड-19 संसर्गाने मृत पावलेल्या व्यक्तींच्या जवळच्या नातेवाईकास 50 हजार रुपये
इतके सानुग्रह सहाय्य देण्यासाठी अडचणी निर्माण झालेल्या आहे. जिल्हा प्रशासन
कोविड-19 या आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या जवळच्या नातेवाईकांना याव्दारे
आवाहन करण्यात येते की, त्यांनी येत्या दोन दिवसात आवश्यक कागदपत्रासह ऑनलाईन अर्ज
दाखल करावे.
मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या
नातेवाईकाने सानुग्रह अनुदान मिळण्यासाठी अर्ज https://mahacovid19relief.in या
संकेतस्थळावर करावा. संकेतस्थळावर अर्ज सादर करतांना अर्जदारांचा स्वत:चा तपशील, अर्जदाराचे
बँक पासबुक/क्रॉस चेक, मृत पावलेल्या व्यक्तींचा तपशील, मृत पावलेल्या व्यक्तींचे
मृत्यु प्रमाणपत्र व एखाद्या नातेवाईकाचे नाव सानुग्रह सहाय्य जमा करण्यासाठी इतर
कुटुंबीयांचे स्वंयघोषणापत्र आदी कागदपत्रे सोबत जोडावी लागतील.
सानुग्रह अनुदान मिळण्यासाठी पुन्हा पुन्हा अर्ज करु नये. पुन्हा अर्ज
केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. चुकीची माहिती देवू नये. चूकीची अथवा
दिशाभूल करणारी माहिती देवून फसवणूक केल्यास अशा अर्जादारांविरुध्द फौजदारी कारवाई
करण्यात येईल. रुग्णाचा ज्या जिल्हयात मृत्यु झालेला आहे, अशा जिल्हयामध्ये ऑनलाईन
प्रणालीद्वारे अर्ज करावे. उदा. वाशिम जिल्हयाचा रहिवाशी असलेल्या नागरिकाचा
मृत्यु अकोला जिल्हयातील हॉस्पिटलमध्ये झाला असल्यास, मृत व्यक्तीच्या जवळच्या
नातेवाईकाने असा अर्ज पोर्टलवर अकोला जिल्हा निवडून करावा. त्याचप्रमाणे इतर जिल्हयाचा
रहिवाशी असलेला रुग्ण वाशिम जिल्हयात मृत्यु पावला असेल अशा मृत व्यक्तीच्या
जवळच्या नातेवाईकाने वाशिम जिल्हा निवडून अर्ज करावा.
ज्या अर्जदारांकडून तातडीने अर्ज सादर करावयाचे आहेत अशा अर्जदारांची नावे https://washim.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहेत.
ज्या अर्जदारांचे नाव https://washim.gov.in पोर्टलवर प्रसिध्द केलेले नसेल परंतू अशा
अर्जदाराची जवळची व्यक्ती कोरोना संसर्गामुळे वाशिम जिल्हयात मृत्यू पावली असल्यास
अशा अर्जदाराने तो व्यक्ती ज्या रुग्णालयात मृत्यु पावला अशा रुग्णालयाकडून
एमसीसीडी प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे आणि हे प्रमाणपत्र संकेतस्थळावर अपलोड
करावेत. असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी केले आहे.
*******
Comments
Post a Comment