*जिल्हाधिकारी कार्यालय येथे राष्ट्रध्वजारोहण

*जिल्हाधिकारी कार्यालय येथे राष्ट्रध्वजारोहण*
वाशिम दि.२६(जिमाका) भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७२ व्या वर्धापन दिनानिमित्त आज २६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पोलीस पथकाने राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हाधिकारी सुहासिनी गोणेवार, नितीन चव्हाण, जिल्हा पुरवठा अधिकारी तेजश्री कोरे, राष्ट्रीय सूचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार, अधीक्षक राहुल वानखडे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर तसेच विविध कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन मोहन शिरसाठ यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर