‘ दुरदृष्टी ’ घडीपुस्तिकेचे पालकमंत्र्याच्या हस्ते प्रकाशन

‘ दुरदृष्टी ’ घडीपुस्तिकेचे पालकमंत्र्याच्या हस्ते प्रकाशन

वाशिम, दि. 27 (जिमाका) : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने सर्वसाधरण घटकांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती लाभार्थ्यांना व्हावी. यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाने जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2021-22 या वर्षात तयार केलेल्या ‘दुरदृष्टी’ या घडीपुस्तिकेचे प्रकाशन पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते 26 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटाक सभागृहात करण्यात आले. यावेळी जि.प.अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, आ.ॲड.किरणराव सरनाईक, आ.अमित झनक, जि.प.अर्थ व बांधकाम समिती सभापती सुरेश मापारी, जिल्हाधिकारी तथा जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत व पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांची प्रमुख अपस्थिती होती.

‘दुरदृष्टी’ या सर्वसाधारण योजनेवरील घडीपुस्तिकेत कृषि यांत्रिकीकरण, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, दुधाळ जनावरांचे गट वाटप, मच्छीमार सहकारी संस्थांना अर्थसहाय्य, जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजना, माझी कन्या भाग्यश्री, जननी शिशू सुरक्षा योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, शुभमंगल सामुहिक विवाह योजना, एकात्मिक कुक्कुट विकास कार्यक्रम, मनोधैर्य योजना, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता अभियान आदी. योजनांची थोडक्यात माहिती देण्यात आली आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची माहिती देखील या घडीपुस्तिकेत देण्यात आली.

घडीपुस्तिकेच्या प्रकाशन प्रसंगी जिल्हा नियोजन अधिकारी सुनीता आंबरे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त मारोती वाठ, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धर्मपाल खेळकर, जिल्हा आरोग्य डॉ. अविनाश आहेर, शिक्षणाधिकारी रमेश तांगडे, वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता श्री. वैद्य, कार्यकारी अभियंता रत्नदीप तायडे, यांच्यासह विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे