जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते चित्ररथाचा शुभारंभ
वाशिम, दि. 13
(जिमाका) : जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या
हस्ते परिवर्तन चित्ररथ आणि समता चित्ररथाचा शुभारंभ आज 13 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी
कार्यालय परिसरात हिरवी झेंडी दा
खवून करण्यात आला. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी
सुनिता आंबरे, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त मारोती वाठ, जिल्हा माहिती अधिकारी
विवेक खडसे, मानव विकास मिशनचे जिल्हा नियोजन अधिकारी श्री. सोनखासकर, जिल्हा
माहिला व बाल विकास अधिकारी अलोक अग्रहरी, वाशिम नगरपालीकेचे मुख्याधिकारी दिपक
मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हा माहिती कार्यालयाने
कोरोनाविषयक जनजागृती आणि विविध योजनांची माहिती संबंधित घटकातील लाभार्थ्यांना
व्हावी. यासाठी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2021-22 यावर आधारीत
परिवर्तन चित्ररथ आणि अनुसूचित जाती उपयोजना सन 2021-22 यावर आधारीत समता चित्ररथ
तयार केला आहे. हे चित्ररथ जिल्हयातील शहरी आणि ग्रामीण भागात जाणार असल्यामुळे
नागरीकांना तसेच लाभार्थ्यांना या चित्ररथाच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती
मिळण्यास मदत होणार आहे.
कोरोनाचा व नव्या ओमिक्रॉन
विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता पात्र व्यक्तींनी लस घ्यावी. नागरीकांनी या
संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी काळजी घेण्याच्यादृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना
कराव्यात. 15 ते 18 वर्षाच्या युवा वर्गानी कोविड लस घ्यावी याला प्रोत्साहन
देण्यासाठी आणि माझी कन्या भाग्यश्री, मुख्यमंत्री रोजगार निर्मित्ती कार्यक्रम
आणि महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनांची माहिती परिवर्तन चित्ररथाच्या
माध्यमातून नागरीकांना व लाभार्थ्यांना मिळणार आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य
विभागाच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, अनुसूचित जाती व
नवबौध्द घटकातील मुलां-मुलींसाठी निवासी शाळा, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण
व स्वाभिमान योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, दुभत्या
जनावरांचे गट वाटप, आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य, कन्यादान योजना
व अनुसूचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा आदी योजनांची माहिती संबंधित
घटकातील लाभार्थ्यांना अनुसूचित जाती उपयोजा सन 2021-22 मधून तयार केलेल्या समता
चित्ररथाच्या माध्यमातून मिळण्यास मदत होणार आहे. या चित्ररथामध्ये विविध योजनांचे
ऑडिओ जिंगल्ससुध्दा ऐकण्यास मिळणार आहे. तसेच चित्ररथासोबत असलेले पॉम्प्लेट्स
देखील लाभार्थ्यांना वितरीत करण्यात येणार आहे. ज्या गावात हा चित्ररथ जाणार आहे
त्या गावाच्या ग्रामपंचायतीला विविध योजनांचे भित्तीपत्रके, पॉम्प्लेट्स व
सन्मार्ग ही समाज कल्याण विभागाच्या योजनांवर आधारीत माहिती पुस्तिकासुध्दा भेट
देण्यात येणार आहे.
*******
Comments
Post a Comment