पालकमंत्री देसाई यांच्या हस्ते‘परिवर्तन ’ घडीपुस्तिकेचे प्रकाशन

पालकमंत्री देसाई यांच्या हस्ते

‘परिवर्तन ’ घडीपुस्तिकेचे प्रकाशन

वाशिम, दि. 27 (जिमाका) : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने समाज कल्याण विभागाच्या महत्वपूर्ण निवडक योजनांवर तयार केलेल्या ‘परिर्वतन’ घडीपुस्तिकेचे प्रकाशन 26 जानेवारी रोजी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हधिकारी कार्यालयातील वाकाटाक सभागृहात केले. यावेळी जि.प.अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, आमदार ॲड. किरणराव सरनाईक, आमदार अमित झनक, जि.प.अर्थ व बांधकाम समिती सभापती सुरेश मापारी, जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत व पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांची प्रमुख अपस्थिती होती.

अनुसूचित उपयोजना सन 2021-22 या वर्षात जिल्हा माहिती कार्यालयाने ‘परिवर्तन’ ही घडीपुस्तिका तयार केली आहे. जास्तीत जास्त लाभार्थ्यांना त्यांच्यासाठी असलेल्या विविध योजनांची माहिती त्यांना व्हावी व त्यामाध्यमातून त्यांनी योजनांचा लाभ घ्यावा. या उद्देशाने ही घडीपुस्तिका तयार केली आहे. या घडीपुस्तिकेमध्ये निवडक महत्वपूर्ण योजनांची माहिती दिली आहे. यामध्ये मार्जिन मनी योजना, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, कन्यादान योजना, अनुसूचित जाती/ जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा, मुलामुलींसाठी शासकीय वसतीगृह, दुभत्या जनावरांचे गट वाटप, अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व उपसाधनांचा पुरवठा करणे, अनुसूचित जाती व नवबौध्द मुलामुलींसाठी निवासी शाळा, अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना आदी योजनांचा समावेश या घडीपुस्तिकेत करण्यात आला आहे. योजनेची थोडक्यात माहिती, प्रमुख अटी व लाभाचे स्वरुप आणि कोणत्या कार्यालयाशी लाभार्थ्यांने संपर्क साधावा. हे घडीपुस्तिकेत नमुद केले आहे.

घडीपुस्तिकेच्या प्रकाशन प्रसंगी जिल्हा नियोजन अधिकारी सुनीता आंबरे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त मारोती वाठ, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धर्मपाल खेळकर, जिल्हा आरोग्य डॉ. अविनाश आहेर, शिक्षणाधिकारी रमेश तांगडे, वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता श्री. वैद्य, कार्यकारी अभियंता रत्नदीप तायडे, यांच्यासह विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे