मार्जिन मनी योजनेसाठी अर्ज मागविले

 

मार्जिन मनी योजनेसाठी अर्ज मागविले

          वाशिम, दि. 14 (जिमाका) :  केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकातील लाभार्थ्यांकरीता मार्जिन मनी योजना सुरु करण्यात आली आहे. यासाठी केंद्र शासनाने 10 हजार कोटींची तरतूद केली आहे. सदर रक्कम लघु औद्योगिक विकास, बँक ऑफ इंडियाकडे वर्ग करण्यात आली आहे. या बँकेने या रक्कमेची सुरक्षा हमी कवच तयार केले असून लाभार्थ्यांना जे कर्ज दिले जाईल त्याला ही बँक हमी देईल. या योजनेअंतर्गत राज्यातील अनुसूचित जातीच्या सवलती घेण्यास पात्र असलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील नवउद्योजक यांनी 10 टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत 75 टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित 25 टक्के सबसीडी राज्य शासनामार्फत देण्यात येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय  www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर निरिक्षणासाठी उपलब्ध आहे.

               या योजनेकरीता इच्छुक लाभार्थ्यांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, वाशिम यांचेकडे शासन निर्णयात नमुद करण्यात आलेल्या सर्व अटी व शर्तीची पुर्तता करुन प्रस्ताव सादर करावा. असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त मारोती वाठ यांनी केले आहे. 

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे