Posts

Showing posts from May, 2021

‘कोविडने काय शिकवले आणि काय करावे’ या विषयवार रविवारी मोफत वेबीनारचे आयोजन

  वाशिम ,   दि. २८ (जिमाका) :   जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी ‘कोविडने काय शिकवले आणि काय करावे’ या विषयावर रविवार, ३० मे रोजी सकाळी ११ ते १२ वा. दरम्यान मोफत ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. मनोचिकित्सक डॉ. शीतल देशमुख या सत्रामध्ये मार्गदर्शन करणार आहेत. तरी इच्छुक युवक, युवतींनी ‘झूम’ अॅपद्वारे या वेबीनारमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज यांनी केले आहे. वेबीनारमध्ये सहभागी होवू इच्छिणाऱ्या युवक-युवतींनी ‘झूम’ अॅपद्वारे https://us04web.zoom.us/j/7706739074?pwd=bxRmOWowUk1tRCtRNXcrZ1IPaHQzQT09 या लिंकद्वारे किंवा मिटिंग आयडी : ७७० ६७३ ९०७४ आणि पासकोड : एचपी@१२३ वापरून सत्रात सहभागी होता येईल. यामध्ये काही अडचणी असल्यास ०७२५२-२३१४९४, ९७६४७९४०३७, ९६६५५२५६५१, ८१०८८६८४०३ या क्रमांकावर संपर्क साधून लिंक प्राप्त करून घ्यावी. आपल्याकडे झूम ॲप यापूर्वी इन्स्टॉल केलेले नसेल तर इंस्टॉल करुन घ्यावे. आपण झूम ॲपमधून कनेक्ट झाल

कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांची माहिती ३१ मे पर्यंत संकलित करा - जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.

Image
  ·         जिल्हास्तरीय कृती दलाची आढावा बैठक वाशिम ,   दि. २७ (जिमाका) : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे पालकांचा मृत्यू झाल्याने अनाथ झालेल्या १८ वर्षाच्या आतील बालकांची माहिती ३१ मे पर्यंत संकलित करावी. जेणेकरून अशा बालकांची काळजी घेण्यासाठी घेण्यासोबतच त्यांचे न्याय हक्क मिळवून देणे, योग्य प्रकारे संगोपन करण्याची कार्यवाही करणे शक्य होईल, असे जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस. यांनी सांगितले. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर गठीत जिल्हा कृती दलाच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आज, २७ मे रोजी झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक वसंत परदेशी , सहायक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम , जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड , जिल्हा नगर पालीका प्रशासन अधिकारी दिपक मोरे , जिल्हा बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष डॉ. जयश्री गुट्टे , जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे , उप मुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) संजय जोल्हे , उप मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोंद्रे , प्रभारी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी भगवान ढोले , समितीचे सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सु

आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छुकांसाठी मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम

  ·        ऑनलाईन नाव नोंदणी करण्याचे आवाहन वाशिम ,   दि. २७ (जिमाका) : आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छूक असलेल्या युवक-युवतींना हेल्थकेअर , मेडीकल , नर्सिंग व डोमेस्टीक हेल्थकेअर वर्कर क्षेत्रामध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत ‘ मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम ’ राबविण्यात येणार असून हे प्रशिक्षण घेण्यासाठी इच्छुक युवक , युवतींनी ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदणी करावी , असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास , रोजगार व उद्योजक मार्गदर्शन  केंद्राच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज यांनी केले आहे. ]कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कौशल्य विकास प्रशिक्षणाशी निगडीत पॅरामेडीकल क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी हेल्थ केअर सेक्टर स्किल कौन्सिलमधील विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. ‘ मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम ’ वैद्यकीय क्षेत्राशी संलग्नित प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र मिळून ते खाजगी अथवा सरकारी इस्पितळात काम करण्यासाठी पात्र होऊ शकतात. तरी इच्छुकांनी ८

वाशिम जिल्ह्यात आणखी ३४७ कोरोना बाधित; ३१२ जणांना डिस्चार्ज

# कोरोना _ अलर्ट ( दि. २७ मे २०२१, सायं. ५ वा.)   वाशिम जिल्ह्यात आणखी ३४७ कोरोना बाधित; ३१२ जणांना डिस्चार्ज   वाशिम : बालाजी मार्केट जवळ- १, सिव्हील लाईन्स- २, गव्हाणकर नगर- १, आययुडीपी कॉलनी- १, लोनसुने चौक- १, नालंदा नगर- १, पुसद नाका- १, सुंदरवाटिका- १, शहरातील इतर ठिकाणचे- २, अडोळी- १, अनसिंग- ३, देवठाणा- १, धुमका- १, एकांबा- १८, घोटा- १, जांभरुण जहांगीर- १, काजळंबा- १, किनखेडा- १, खंडाळा- १, कोकलगाव- १, पंचाळा- १, पार्डी आसरा- ८, पिंपळगाव- ८, सावंगा जहांगीर- १, शेलू बु.- १, शेलगाव- १, तांदळी बु.- १, तोंडगाव- ३, उकळीपेन- १, उमरा कापसे- १, वारा जहांगीर- १, वारला- १.   मालेगाव : शहरातील- ११, बोर्डी- १, ब्राह्मणवाडा- ३, डही- १, डव्हा- १, इराळा- १, जऊळका- १, खडकी- १, खैरखेडा- १, किन्हीराजा- १, मारसूळ- १, पांगरी नवघरे- २, पिंपळशेंडा- १, पिंपळा- १, रेगाव- १, शिरपूर- ७, वाघी- १.   रिसोड : बसस्थानक मागील परिसर- १, शाहू नगर- १, शहरातील इतर ठिकाणचे- ५, आगरवाडी- १, भरजहांगीर- १, चिचांबाभर- १, चिखली- १, डोणगाव- १, गोवर्धन- १, कळमगव्हाण- ४, करंजी- १, केनवड- १, खडकी सदार- १, किनखे

केशरी शिधापत्रिकाधारकांनाही जून महिन्यात सवलतीच्या दरात धान्य

  ·         वाशिम जिल्ह्यात २७,७३६ शिधापत्रिकेतील लाभार्थी पात्र वाशिम ,   दि. २६ (जिमाका) : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना व शेतकरी योजनेत समाविष्ट नसलेल्या जिल्ह्यातील एपीएल (केशरी) शिधापत्रिकेतील लाभार्थ्यांना ८ रुपये प्रतिकिलो दराने प्रतिव्यक्ती १ किलो गहू आणि १२ रुपये प्रतिकिलो दराने प्रतिव्यक्ती १ किलो तांदूळ दिला जाणार आहे. जून महिन्यात या अन्नधान्याचे वितरण केले जाणार असून जिल्ह्यातील २७ हजार ७३६ शिधापत्रिकेमध्ये समाविष्ट लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील विंचनकर यांनी दिली आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला प्रतिबंध घालण्यासाठी जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या काळात सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत तसेच एपीएल (केशरी) शेतकरी योजनेत सहभागी नसलेल्या एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना जून महिन्यात सवलतीच्या दरात अन्नधान्य वितरणास मंजुरी देण्यात आली आहे. रास्तभाव दुकानदारांनी प्रथम मागणी करणाऱ्यास प्रथम (फर्स्ट कम फर्स्ट सर्वड) या तत्वानुसार धान्य वितरण करावे. तसेच शिधापत्रिकाधारकांना

दिलासादायक : जिल्ह्याच्या ‘पॉझिटिव्हीटी रेट’मध्ये घट

Image
  ·          गेल्या पाच दिवसांत एक अंकी ‘ पॉझिटिव्हीटी रेट ’ ·          प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीची फलनिष्पत्ती वाशिम ,   दि. २६ (जिमाका) :     जिल्हा प्रशासनाने हाती घेतलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे गेल्या काही दिवसांत कोरोना विषाणू संसर्गाचे प्रमाण आटोक्यात येत असल्याचे दिसून येत आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाचे सामुहिक प्रयत्न व त्याला नागरिकांचे सहकार्य मिळाल्याने जिल्ह्याचा ‘ पॉझिटिव्हीटी रेट ’ घटला असून गेल्या पाच दिवसांपासून हे प्रमाण एक अंकी संख्येत आहे. ‘ पॉझिटिव्हीटी रेट ’ मध्ये झालेली घट जिल्ह्यासाठी काही प्रमाणात दिलासादायक आहे. मात्र, तरीही कोरोना विषाणू संसर्ग पुन्हा वाढू नये, यासाठी नागरिकांनी कोरोना सुरक्षा नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. कोरोना विषाणू संसार्गात वाढ झाल्याने जिल्ह्यात विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या. यामध्ये कोरोना चाचण्यांची संख्या वाढविणे, कोरोना बाधिताच्या संपर्कातील जास्तीत जास्त व्यक्तींचा शोध घेवून त्यांची कोरोना चाचणी करणे यासह कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम गतिमान करण्यात

ट्रॅक्टर, ट्रॅक्टरचलित अवजारांच्या उपलब्धतेमुळे महिला बचतगटांच्या उत्पन्न वाढीस चालना मिळेल - पालकमंत्री शंभूराज देसाई

Image
  ·         लोकसंचालित साधन केंद्रांना ट्रॅक्टर , ट्रॅक्टरचलित अवजारांचे वितरण ·         महिला आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने ऑनलाईन समारंभ ·         महिलांना शासकीय योजनांचा एकत्रित लाभ देण्यासाठी प्रयत्न   वाशिम ,   दि. २६ (जिमाका) :   महिला बचतगटांच्या माध्यामतून गाव-खेड्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे आवश्यक आहे. याकरिता महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत प्रयत्न केले जात आहेत. मानव विकास कार्यक्रम अंतर्गत लोकसंचालित साधन केंद्रांना ट्रॅक्टर , ट्रॅक्टरचलित अवजारे उपलब्ध करून दिल्यामुळे महिला बचतगटांच्या आर्थिक उत्पन्न वाढीस चालना मिळेल , असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. आज , २६ मे रोजी मानव विकास कार्यक्रम अंतर्गत जिल्ह्यातील महिला आर्थिक विकास महामंडळाच्या ६ लोकसंचालित साधन केंद्रांना ट्रॅक्टर , ट्रॅक्टरचलित अवजारांचे ऑनलाईन वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.   खासदार भावना गवळी , महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष ज्योती ठाकरे , मानव विकास कार्यक्रमचे जिल्हा नियोजन अधिकारी श्री. सोनखासकर , महिला आर्थिक महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश

वाशिम जिल्ह्यात आणखी ३१४ कोरोना बाधित; ४१० जणांना डिस्चार्ज

वाशिम जिल्ह्यात आणखी ३१४ कोरोना बाधित; ४१० जणांना डिस्चार्ज   वाशिम : अल्लाडा प्लॉट- २, बाळू चौक- १, सामान्य रुग्णालय- १, सिव्हील लाईन्स- ३, इन्नानी पार्क- १, आययुडीपी कॉलनी- १, काळे फाईल- १, लाखाळा- २, सिंधी कॅम्प- १, योजना कॉलनी- १, शहरातील इतर ठिकाणचे- ३, अडोळी-१, अनसिंग- ६, बिटोडा भोयर- १, चिखली- १, फाळेगाव- १, घोटा- १, कळंबा महाली- ३, केकतउमरा- १, कोंडाळा झामरे- २, शेलगाव- १, सोनखास- १, एकांबा- ३.   मालेगाव : शहरातील- ९, अमानवाडी- १, भामटवाडी- १, भौरद- २२, डही- १, घाटा- १, गुंज- २, किन्ही घोडमोड- १, मसला खुर्द- २, मेडशी- १, पांगरी धनकुटे- १, पिंपळगाव- १, शिरपूर- ८, सुदी- १, सुकांडा- १, वाघी- १, भेरा- १, जऊळका- १.   रिसोड : सिटी केअर हॉस्पिटल परिसर- १, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय परिसर- १, शहरातील इतर ठिकाणचे- ७, आगरवाडी- २, आंचळ- १, भापूर- २, चिंचाबापेन- ४, चिखली- १, गोवर्धन- १, कळमगव्हाण- १, मांडवा- २, मांगवाडी- १, मोप- १, नेतान्सा- १, पेनबोरी- १, रिठद- ४, वनोजा- २, मोहजा- १, येवती- १, येवता- १.   मंगरूळपीर : अशोक नगर- १, बाबरे ले-आऊट- १, जांब रोड परिसर- २, लक्ष्मी

लक्षणे नसलेल्या कोरोना रुग्णांचे गावपातळीवरच संस्थात्मक विलगीकरणावर करा - जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.

Image
    ·        कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी उपाययोजना ·        गावामध्येच विलगीकरण कक्ष सुरु करण्याचे नियोजन   वाशिम , दि. २४ (जिमाका) : कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी बाधित रुग्णांचे संस्थात्मक विलगीकरण करणे आवश्यक आहे. याकरिता गावामध्येच विलगीकरण कक्षाची स्थापना करून लक्षणे नसलेल्या कोरोना बाधितांना त्याठिकाणी संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात यावे. या विलगीकरण कक्षामध्ये सर्व मुलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले. दुरदृश्य प्रणालीद्वारे आज, २४ मे रोजी आयोजित तालुकास्तरीय अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.   जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हाधिकारी (महसूल) सुनील विंचनकर, उपजिल्हाधिकारी संदीप महाजन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त माया केदार, शिक्षणाधिकारी अंबादास मानकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.   जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. म्हणाले, जिल्ह्यात सध्या कोरोना बाधितांच्या संख्य

‘म्युकरमायकोसीस’कडे दुर्लक्ष नको, वेळीच उपचार घ्या - जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड

Image
  वाशिम , दि. २२ (जिमाका) : आज आपण कोविड-१९ या आजाराशी लढत असतांना आणखी एका आजाराने काही रुग्णांना ग्रासले जात आहे. कोरोनातून बऱ्या झालेल्या काही रुग्णांमध्ये म्युकरमायकोसीस (ब्लॅक फंगस) आजाराचा संसर्ग दिसून येत आहे. नागरिकांनी या आजाराकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार घेण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी केले आहे.       म्युकरमायकोसीस हा एक प्रकारचा बुरशीजन्य संसर्गित आजार आहे. हा तुलनेने दुर्मिळ पण गंभीर आजार आहे. झिगॉमायकोसिस म्हणून या आजारास ओळखले जाते. एखादा आजार जडल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली तर हे संक्रमण बहुतेक वेळा दिसून येते. रोगप्रतिकारशक्ती कमी झालेल्या रुग्णांमध्ये याचा संसर्ग जास्त प्रमाणात होतो. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये बाधित झालेल्यांवर उपचारा दरम्यान रेमडेसिवर , स्टेरॉईड व अँटीबायोटिक्सच्या वापराच्या दुष्परिणामामुळे त्याचप्रमाणे उच्च रक्तदाब , अनियंत्रित मधुमेह , अवयव प्रत्यारोपण केलेल्या व्यक्तींमध्ये हा आजार दिसून येत आहे. म्युकरमायकोसीस हा आजार म्यूकोर्मिटाईड मोल्ड्सच्या संपर्कातून उद्भवतो. हे मोल्ड्स झाडाची पाने , कंपोस्टचे ढी

प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

  वाशिम , दि. २१ (जिमाका) : जिल्ह्यात प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना सन २०२०-२१  ते २०२४-२५ या पाच वर्षांसाठी राबविण्यात येणार आहे. शाश्वत आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत व रोजगार निर्मितीच्या संधी निर्माण करणे, कृषि क्षेत्राच्या सकल मूल्यात वाढ करणे आणि निर्यातीतील योगदान वाढविणे हा प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा उद्देश आहे. केंद्र शासनामार्फत मत्स्य व्यवसाय हा पूरक व अग्रक्रमित व्यवसाय करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. याद्वारे भूजलाशयीन क्षेत्रातील सामाजिक व आर्थिकदृष्ट्या कमकुवत पारंपारिक मच्छिमारांचे, मत्स्य व्यावसायिकांचे उत्पन्न दुपटीने वाढविण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या योजनेची अधिक माहिती http://dof.gov.in/pmmsy या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत विविध घटक योजनांसाठी सन २०२१-२२ करिता इच्छुक लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु आहे. वाशिम जिल्ह्यातील इच्छुक लाभार्थ्यांनी योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्यासाठी सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय (तांत्रिक), पद्मश्याम इमारत, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर, सिव्हील लाईन्स, वाशिम येथे कार

वाशिम जिल्ह्यातील खासगी कोविड रुग्णालयांना १५१ रेमडेसिवीर इंजेक्शनचे वितरण

Image
वाशिम ,   दि. २१ (जिमाका) :     जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांना आज ,   २१ मे रोजी जिल्हा प्रशासनामार्फत १५१ रेमडेसिवीर इंजेक्शन वितरीत करण्यात आले आहेत ,   अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली आहे. वाशिम येथील कोविड हॉस्पिटल येथे ७ ,   लाईफ लाईन हॉस्पिटल येथे १३ ,   बिबेकर हॉस्पिटल येथे ५ ,   देवळे हॉस्पिटल येथे १६ ,   वाशिम क्रिटीकल केअर येथे ६ ,   पल्स हॉस्पिटल येथे १६ ,   बाहेती हॉस्पिटल येथे ८ ,   रेनॉल्ड मेमोरियल हॉस्पिटल येथे ८ ,   घुगे हॉस्पिटल येथे ४ ,   मुसळे हॉस्पिटल येथे ५ ,   काकडे हॉस्पिटल येथे ७ ,   नवजीवन हॉस्पिटल येथे १४ ,   नाथ हॉस्पिटल येथे ११ ,   कानडे हॉस्पिटल येथे ७ ,   गाभणे हॉस्पिटल येथे ३ ,   जैन भवन (डॉ. ठाकरे) कोविड हॉस्पिटल येथे ३ ,   धन्वंतरी कोविड हॉस्पिटल येथे २ ,   सिटी हॉस्पिटल येथे १ ,   बालाजी हॉस्पिटल येथे १ ,   रिसोड येथील सिटी केअर हॉस्पिटल येथे ५ असे एकूण १५१ रेमडेसिवीर इंजेक्शन प्रशासनामार्फत वितरीत करण्यात आले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन

Image
  वाशिम ,   दि. २१ (जिमाका) : दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त आज, २१ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रम अधिकारी, कर्मचारी यांनी दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसानिमित्त शपथ घेतली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. श्री. तोटावार यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसानिमित्त शपथ दिली.