वाशिम जिल्ह्यातील खासगी कोविड रुग्णालयांना १५१ रेमडेसिवीर इंजेक्शनचे वितरण

वाशिम, दि. २० (जिमाका) :  जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांना आज, २० मे रोजी जिल्हा प्रशासनामार्फत १५१ रेमडेसिवीर इंजेक्शन वितरीत करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली आहे.

 वाशिम येथील कोविड हॉस्पिटल येथे ६, लाईफ लाईन हॉस्पिटल येथे १२, बिबेकर हॉस्पिटल येथे ५, देवळे हॉस्पिटल येथे १६, वाशिम क्रिटीकल केअर येथे ८, पल्स हॉस्पिटल येथे १५, बाहेती हॉस्पिटल येथे ७, रेनॉल्ड मेमोरियल हॉस्पिटल येथे ८, घुगे हॉस्पिटल येथे ४, मुसळे हॉस्पिटल येथे ५, काकडे हॉस्पिटल येथे ६, नवजीवन हॉस्पिटल येथे १४, नाथ हॉस्पिटल येथे १२, कानडे हॉस्पिटल येथे १७, गाभणे हॉस्पिटल येथे ३, जैन भवन (डॉ. ठाकरे) कोविड हॉस्पिटल येथे ३, धन्वंतरी कोविड हॉस्पिटल येथे ४, सिटी हॉस्पिटल येथे १, बालाजी हॉस्पिटल येथे १, रिसोड येथील सिटी केअर हॉस्पिटल येथे ४ असे एकूण १५१ रेमडेसिवीर इंजेक्शन प्रशासनामार्फत वितरीत करण्यात आले आहेत.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश