ग्राहकांना बँक खात्यातील रक्कम मिळणार घरपोच !

·        भारतीय डाक विभागामार्फत सुविधा

·        बँकेत होणारी गर्दी टाळण्यासाठी होणार मदत 

वाशिम, दि. १८ (जिमाका) : कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या काळात सुरक्षिततेच्या दृष्टीने नागरिकांनी घरातच राहणे आवश्यक आहे. त्यामुळे या काळात वाशिम जिल्ह्यातील नागरिकांना आपल्या राष्ट्रीयकृत बँक खात्यातील १० हजार रुपयेपर्यंत रक्कम घरबसल्या काढण्याची सुविधा डाक विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेवून बँकेत होणारी गर्दी टाळावी, असे आवाहन डाक विभागामार्फत करण्यात आले आहे. 

संचारबंदी काळात डाक विभागामार्फत जनतेला बचत बँक सुविधा, टपाल वाटप, रजिस्टर बुकिंग, स्पीड पोस्ट बुकिंग या सुविधांसोबतच राष्ट्रीयकृत बँक खात्यातून १० हजार रुपयेपर्यंत रक्कम काढून पोस्टमनमार्फत अदा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणाऱ्या नागरिकांना आपल्या खात्यातून घरबसल्या रक्कम काढावयाची असल्यास त्यांनी आपल्या नजीकच्या पोस्ट कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून सकाळी ९.३० ते दुपारी २ वाजेपर्यंत आपले नाव, पत्ता व मोबाईल क्रमांक व आवश्यक असलेल्या रक्कमेची माहिती नोंदवावी. त्यानंतर पोस्टमन संबंधित व्यक्तीच्या घरी जावून बँक खात्यातून रक्कम काढून अदा करण्याची कार्यवाही करेल, असे डाक विभागामार्फत कळविण्यात आले आहे. 

वाशिम जिल्ह्यातील पोस्टाच्या अनसिंग- हरिदास भांडे (भ्रमणध्वनी क्र. ९४२०७०६०९५), आसेगाव – संतोष धोंगडे (भ्रमणध्वनी क्र. ९७६७३९३९३२), कामरगाव – जी. एम. थोरात (भ्रमणध्वनी क्र. ९४०३१९५३६८), कारंजा – एजाज अहमद (भ्रमणध्वनी क्र. ८७९३५३४१५३), मालेगाव- विलास मुंढे (भ्रमणध्वनी क्र. ९९२२७६९६१८), मंगरूळपीर- गंगाधर भुसारी (भ्रमणध्वनी क्र. ७५८८९६३०३४), मानोरा- रवी कोटरवार (भ्रमणध्वनी क्र. ९९२३७३५५१७), रिसोड- अंकुश सराफ (भ्रमणध्वनी क्र. ९३०७९०११४४), रिठद – राजेश कापसे (भ्रमणध्वनी क्र. ९८६०६२२१५१), शेलूबाजार- एस. ए. नाकाडे (भ्रमणध्वनी क्र. ९४०३०१९९४१), शिरपूर –  दिनेश सरनाईक (भ्रमणध्वनी क्र. ९८२२२९०४२१), वाशिम- आर. के. अलोणे (भ्रमणध्वनी क्र. ९८५०२९७४५९) यापैकी आपल्या नजीकच्या उप कार्यालयाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सकाळी ९.३० ते दुपारी २ वाजेपर्यंत नागरिकांना आपली मागणी नोंदविता येईल. तसेच यामध्ये काही अडचण आल्यास इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे शाखाधिकारी पंकज देशमुख (भ्रमणध्वनी क्र. ८६६८९८५८८०) किंवा अकोला डाक विभागाचे प्रवर अधीक्षक यांच्या कार्यालयातील ०७२४-२४१५०३९ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन डाक विभागाने केले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश