Posts

Showing posts from 2020

‘लॉकडाऊन’च्या मार्गदर्शक सूचनांना ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

Image
  वाशिम ,   दि. ०१ (जिमाका) : जिल्ह्यात १ ऑक्टोंबर २०२० पासून लॉकडाऊनच्या सुधारित मार्गदर्शक सूचना लागू करण्यात आल्या आहेत. राज्य शासनाच्या २९ डिसेंबर २०२० च्या आदेशानुसार सदर मार्गदर्शक सूचना आता ३१ जानेवारी २०२१ पर्यंत लागू राहणार आहेत. याबाबतचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी ३१ डिसेंबर २०२० रोजी निर्गमित केले आहेत.   या आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ ते ६० ,  भारतीय दंड संहीता १८६० चे कलम १८८ अन्वये कारवाई करण्यात येईल , जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी निर्गमित केलेल्या आदेशात म्हटले आहे.

कृषि विभागाच्या विविध योजनांसाठी महा-डीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यास ११ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

Image
  वाशिम ,   दि. ०१ (जिमाका) : कृषि विभागाने महा-डीबीटी पोर्टलवर ‘शेतकरी योजना’ या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीकरिता सर्व योजनांचा लाभ ‘ एकाच अर्जाद्वारे’ देण्याच्या दृष्टिने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केलेली आहे. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबींच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले असून शेतकऱ्यांनी शेती निगडीत विविध बाबींकरिता अर्ज करावयाचा असून अर्ज सादर करण्यासाठी ११ जानेवारी २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे कृषि विभागाने कळविले आहे. महा-डीबीटी पोर्टलचे https://mahadbtmahait.gov.in/ हे संकेतस्थळ असून या संकेतस्थळावरील ‘ शेतकरी योजना’ हा पर्याय निवडावा. शेतकरी स्वतःच्या मोबाईल , संगणक, लॅपटॅाप, टॅबलेट , सामुदायिक सेवा केंद्र (सीएससी ), ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र इ. माध्यमातून ‘महा-डीबीटी’च्या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतील. ‘ वैयक्तिक लाभार्थी’ म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना त्यांचा आधार क्रमांक सदर संकेतस्थळावर प्रमाणित करून घ्यावा लागेल. ज्या वापरकर्त्याकडे आधार क्रमांक नसेल त्या

मतदान केंद्र, मतमोजणी केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

Image
  ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२० वाशिम ,   दि. ३१ (जिमाका) : राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान होत आहे. तसेच १८ जानेवारी २०२१ रोजी मतमोजणी होणार आहे. या सर्व ग्रामपंचायत निवडणूक मतदान केंद्रांवर १४ जानेवारी २०२१ रोजीचे सकाळी ६ वाजेपासून ते १५ जानेवारी २०२१ रोजीचे सायंकाळी ६ वाजेपर्यंत, तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयाने निश्चित केलेल्या मतमोजणी केंद्रांवर १८ जानेवारी २०२१ रोजी मतमोजणी प्रक्रिया सुरु झाल्यापासून ते मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया संपेपर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने कळविले आहे. सार्वत्रिक निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायती वाशिम तालुका (२४) : - कळंबा महाली, पंचाळा, तामसी, सावंगा जहांगीर, तांदळी बु., वाळकी जहांगीर, वारा जहांगीर, अनसिंग, ब्रह्मा, किनखेडा, पिंपळगाव, तोरणाळा, वारला, अडोळी, टो, काटा, पार्डी टकमोर, तोंडगाव, भोयता, उकळीपेन,

जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी १५ जानेवारीपर्यंत प्रस्ताव सादर करावेत

Image
  वाशिम ,   दि. ३० (जिमाका) : जिल्हा क्रीडा पुरस्काराच्या २४ जानेवारी २०२० रोजीच्या सुधारित शासन निर्णयानुसार राज्य शासनाच्या क्रीडा व युवक संचालनालय अंतर्गत वाशिम जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने सन २०२०-२१ या वर्षाकरिता जिल्हा क्रीडा पुरस्कार २६ जानेवारी २०२१ रोजी वितरीत करण्यात येणार आहे. या पुरस्कारामध्ये वाशिम जिल्ह्यातील गुणवंत खेळाडू (१ पुरुष, १ महील व १ दिव्यांग), १ गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार असे एकूण चार पुरस्कार देण्यात येणार आहेत. गुणवंत खेळाडू, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक यांच्या कार्याचे व योगदानाचे मूल्यमापन होवून त्यांचा गौरव व्हावा, हा या क्रीडा पुरस्कारांचा उद्देश आहे. स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सदर पुरस्कारासाठी शासन निर्णयातील पात्रतेच्या निकषानुसार व पुरस्कार वर्ष १ जुलै ते ३० जून असे राहील. या कालावधीतील क्रीडा विषयक कामगिरीचा आढावा घेण्यात येईल. शासन निर्णयातील परिशिष्ट अ-६.१ अन्वये जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी खेळाचा समावेश असून इच्छुकांनी विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातून प्राप्त करून

मोटार वाहन निरीक्षक यांच्या तालुकानिहाय मासिक शिबीराच्या तारखा जाहीर

Image
  वाशिम ,   दि. ३० (जिमाका) :   जिल्ह्यातील मोटार वाहन चालक ,   मालक यांच्या सोयीसाठी   उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक यांच्या उपस्थितीत वाहन कर वसुली ,   मोटार वाहन नोंदणी ,   तपासणी ,   वाहन चालक अनुज्ञप्ती कामकाजासाठी मासिक शिबीर आयोजत करण्यात येते. त्यानुसार जानेवारी ते जून २०२१ या कालावधीत होणाऱ्या मासिक शिबिरांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. कारंजा येथे ५ व २१ जानेवारी, ३ व २३ फेब्रुवारी, ३ व २३ मार्च, ६ व २२ एप्रिल, ४ व २० मे आणि ४ व २२ जून रोजी मासिक शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच रिसोड येथे ८ जानेवारी, ९ फेब्रुवारी, ९ मार्च, ९ एप्रिल, ७ मे व ८ जून रोजी, मानोरा येथे १३ जानेवारी, १२ फेब्रुवारी, १५ मार्च, १५ एप्रिल, ११ मे व १४ जून रोजी, मंगरूळपीर येथे १८ जानेवारी, १६ फेब्रुवारी, १८ मार्च, १९ एप्रिल, १७ मे व १८ जून रोजी मासिक शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. मासिक शिबिराच्या दिवशी सुट्टी जाहीर झाल्यास शिबीर दुसऱ्या कार्यालयीन दिवशी घेण्यात येईल. अर्ज स्वीकारण्याचा कालावधी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत राहील, असे उप प्रादेशिक परिवहन अधिक

मुंगळा येथील अल्पवयीन मुलीचा विवाह रोखला

  वाशिम ,   दि. ३१ :   महिला व बाल विकास विभागाच्या सतर्कतेमुळे ३० डिसेंबर २०२० रोजी मालेगाव तालुक्यातील मुंगळा येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह रोखण्यात आला. या बालविवाहाबाबतची माहिती वाशिम चाईल्ड लाईनकडून प्राप्त झाली होती. त्यानुसार जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय , पोलीस प्रशासनाने संयुक्तरित्या समुपदेशनाने सदर बालविवाह रोखला. बालविवाहाबाबतची माहिती वाशिम चाईल्ड लाईनकडून मिळाल्यानंतर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुभाष राठोड यांनी जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या संरक्षण अधिकारी कु. लक्ष्मी एस. काळे, कायदा तथा परीविक्षा अधिकारी जिनसाजी चौधरी, सामाजिक कार्यकर्ता रमेश वाघ, अनंता इंगळे, क्षेत्रीय कार्यकर्ता एकनाथ राठोड, तसेच चाईल्ड लाईनचे समन्वयक महेश राऊत, शुभांगी नागलकर, मालेगाव तालुका संरक्षण अधिकारी महादेव जऊळकर यांच्याशी संपर्क करून बालविवाह रोखण्याचे आदेश दिले. सदर पथकाने मालेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल समाधान मोघाड, मंगेश गोपनारायण, मुंगळा गावचे पोलीस पाटील श्री. पाटील, आशा सेविका सुरेखा केळे तसेच ग्रामसेवक किसन चौधरी, ग्रामपंचायत लिपिक संजय नखाते यांच

वाशिम जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर

Image
  ·          १५ जानेवारी रोजी मतदान, १८ जानेवारीला मतमोजणी ·          २३ ते ३० डिसेंबर पासून नामनिर्देशनपत्रे स्वीकारणार वाशिम ,   दि. १२ (जिमाका) : एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने घोषित केला आहे. त्यानुसार १५ डिसेंबर २०२० रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध केली जाणार असून २३ ते ३० डिसेंबर या कालावधीत (सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून) नामनिर्देशनपत्रे सादर करता येणार आहेत. ३१ डिसेंबर रोजी सकाळी ११ वा. पासून नामनिर्देशनपत्रांची छाननी सुरु होईल. ४ जानेवारी २०२१ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेता येईल. ४ जानेवारी रोजी दुपारी ३ वा. नंतर निवडणूक चिन्ह नेमून देण्याची तसेची अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. आवश्यकता असल्यास १५ जानेवारी   २०२१ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होईल. तसेच १८ जानेवारी रोजी मतमोजणी होणार असून २१ जानेवारी पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात

जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी घेतला जिल्हा वार्षिक योजना निधी खर्च नियोजनाचा आढावा

Image
·         प्रशासकीय मान्यतेचे सर्व प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना वाशिम ,   दि. १० (जिमाका) : जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधरण) २०२०-२१ मधील निधी खर्च नियोजनाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या अध्यक्षतेखाली आज, १० डिसेंबर रोजी नियोजन भवन येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. राज्य शासनाने ८ डिसेंबर २०२० रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार सर्व अंमलबजावणी यंत्रणांनी प्रशासकीय मान्यता आणि निधी मागणीसाठी परिपूर्ण प्रस्ताव १५ डिसेंबर २०२० पर्यंत जिल्हा नियोजन कार्यालयाकडे सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, उप वनसंरक्षक सुमंत सोळंके, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिता आंबरे, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त माया केदार यांच्यासह विविध अंमलबजावणी यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. म्हणाले, नियोजन विभागाच्या ८ डिसेंबर रोजीच्या निर्णयानुसार जिल्हा वार्षिक योजनेतून करावयाच्या निधी वितरणावरील बंधने शिथिल करण्यात आली आहेत. त्यानुसार सर्व प्रशासकीय यंत्रणां

राज्यस्तरीय ऑनलाईन महारोजगार मेळाव्यात ७० हजार रिक्तपदांची उपलब्धी

Image
  ·         १२ व १३ डिसेंबर रोजी मेळाव्याचे आयोजन ·         नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी सुवर्णसंधी वाशिम , दि. ०९ : १२ व १३ डिसेंबर २०२० रोजी राज्यस्तरीय ऑनलाईन महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात वाशिम जिल्ह्यासह राज्यातील विविध कंपन्यांमधील सुमारे ६५ ते ७० हजार रिक्त जागा भरण्याचे नियोजित आहे. त्या अनुषंगाने रोजगार इच्छुक उमेदवारांना www.rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रतेनुसार आजपासूनच सहभागी होता येणार आहे. महारोजगार मेळाव्यात वाशिम जिल्ह्यासह राज्यातील इतर जिल्ह्यातील इयत्ता चौथी उत्तीर्ण ते सर्वशाखीय डिप्लोमा, आय.टी.आय. तसेच पदवी आणि पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता असणाऱ्या रोजगार इच्छुक स्त्री, पुरुष उमेदवारांना त्यांच्याकडील एम्प्लॉयमेंट कार्डच्या युझरनेम व पासवर्डमधून मेळाव्यात सहभागी होता येईल. उमेदवारांना पसंतीक्रमानुसार व उद्योजकांच्या सोयीनुसार मुलाखतीचे ठिकाण, दिनांक व वेळ उद्योजकांकडून एस.एम.एस., दूरध्वनी, ई-मेल किंवा सोयीच्या माध्यमाद्वारे कळविण्यात येईल. त्यानुसार ऑनलाईन किंवा ऑफलाईन मुलखाती

‘रोहयो’च्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करा - नंदकुमार

Image
  ·         रोजगार हमी योजनेच्या कामांचा आढावा वाशिम , दि. ०८ : जिल्ह्याचा विकास होण्यासाठी कृषि क्षेत्राचा विकास होवून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणे आवश्यक आहे. त्यामुळे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना मृद व जलसंधारण, रोजगार हमी योजना विभागाचे प्रधान सचिव तथा वाशिम जिल्ह्याचे पालक सचिव नंदकुमार यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे आज, ८ डिसेंबर रोजी झालेल्या रोजगार हमी योजना आढावा बैठकीत ते   बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, सहाय्यक जिल्हाधिकारी वैभव वाघमारे, अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयातील रोहयो उपायुक्त धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (रोहयो) शैलेश हिंगे यांच्यासह विविध अंमलबजावणी यंत्रणांचे जिल्हा व तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते. श्री. नंदकुमार म्हणाले, रोजगार हमी योजनेसाठी निधीची पुरेशी उपलब्धता आहे. मात्र, स्थानिक परिस्थिती लक्षात घेवून योग्य कामांची निवड, काम पूर्ण करण्याचे सूक्ष्म नियोजन, कामाची गु

दिवाळी आनंदात पण साधेपणाने साजरी करा, आरोग्याची काळजी घ्या !

Image
    ·         वाशिम जिल्हा प्रशासनाचे आवाहन   वाशिम ,   दि. १३ (जिमाका) : वर्षभरात साजऱ्या होणाऱ्या विविध सणापैकी दिवाळी हा एक महत्त्वाचा आणि आनंदाचा सण. हा सण साजरा करण्यासाठी बाहेरगावी असलेली मंडळी आपल्या गावी परत येऊन कुटुंबासोबत एकत्रितपणे हा सण साजरा करतात. यावर्षी मागील काही महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग सुरुच आहे. कोरोना संसर्गाच्या काळात यंदाची दिवाळी प्रत्येकाने आनंदात पण साधेपणाने साजरी करतांना कोरोनाचा संसर्ग होणार नाही, याची काळजी घ्यावी व प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते आणि जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी जिल्हावासीयांना केले आहे.   यंदाच्या दिवाळीत खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत जातांना प्रत्येकाने दक्षता घ्यावी. सामाजिक अंतर ठेवावे. कोरोनाचा संसर्ग होणार नाही यासाठी प्रत्येकाने तोंडावर मास्क लावावे. कोणत्याही वस्तूला हात लावल्यानंतर हाताला सॅनीटायझर लावावे किंवा हात साबणाने स्वच्छ धुवावे. कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी कोरोना पूर्णपणे

कृषि अवजार बँक स्थापन करण्यासाठी मिळणार अनुदान

Image
  ·         १५ नोव्हेंबर पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन वाशिम ,   दि. ०२ (जिमाका) : आकांक्षित जिल्हा असलेल्या वाशिम जिल्ह्यात सन २०२०-२१ मध्ये कृषि यांत्रिकीकरण उपअभियान अंतर्गत कृषि कल्याण अभियान-३ अंतर्गत कृषि अवजारे बँक स्थापन करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. कृषि यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील दोन गावांमध्ये कृषि अवजार बँकेच्या माध्यमातून भाडे तत्वावर कृषि यांत्रिकीकरण सेवा सुविधा उपलब्ध होणार आहे. कृषि अवजार बँकेसाठी ८० टक्के किंवा जास्तीत जास्त ८ लाख अनुदान दिले जाणार आहे. तरी जिल्ह्यातील इच्छुक व पात्र शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकऱ्यांचे स्वयंसहाय्यता गट, शेतकरी उत्पादक गट तसेच कृषि विज्ञान केंद्र यांनी १५ नोव्हेंबर २०२० पर्यंत सर्व कागदपत्रांसह विहित नमुन्यातील अर्ज संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयात सादर करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे. राज्यातील चार आकांक्षित जिल्ह्यांमध्ये केंद्र शासनाद्वारे यापूर्वी कृषि कल्याण अभियान भाग-१ व भाग-२ मध्ये निवडलेल्या गावांमध्येच कृषि अवजारे बँक सुविधेचा ल
  खरीप पिकांची सुधारित हंगामी पैसेवारी जाहीर   वाशिम ,   दि. ०२ : सन २०२०-२१ मधील जिल्ह्यातील प्रमुख खरीप पिकांची सुधारित हंगामी पैसेवारी २९ ऑक्टोबर रोजी जाहीर झाली असून जिल्ह्यातील प्रमुख पिकांची एकूण सरासरी पैसेवारी ५५ पैसे इतकी आढळून आली असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.   वाशिम तालुक्यातील १३१ गावांची सुधारित हंगामी पैसेवारी सरासरी ६४ पैसे , मालेगाव तालुक्यातील १२२ गावांची सुधारित हंगामी पैसेवारी सरासरी ४७ पैसे , रिसोड तालुक्यातील १०० गावांची सुधारित हंगामी पैसेवारी सरासरी   ४४ पैसे , मंगरूळपीर तालुक्यातील १३७ गावांची सुधारित हंगामी पैसेवारी सरासरी ६५ पैसे , कारंजा तालुक्यातील १६७ गावांची सुधारित हंगामी पैसेवारी सरासरी ५४ पैसे व मानोरा तालुक्यातील १३६ गावांची सुधारित हंगामी पैसेवारी सरासरी ५६ पैसे इतकी निश्चित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकूण ७९३ गावांपैकी ५७१ गावांची सुधारित हंगामी पैसेवारी ५० पैसेपेक्षा जास्त आहे, तर २२२ गावांची सुधारित हंगामी पैसेवारी ५० पैसे पेक्षा कमी आढळून आली आहे. *****
Image
  वाशिम , दि. ०२ : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत इतर मागास प्रवर्गातील (ओबीसी) लाभार्थ्यांसाठी ४ कर्ज योजना राबविल्या जातात. जिल्ह्यातील इच्छुक व पात्र लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत २० टक्के बीज भांडवल योजना राबवली जाते. यामध्ये ५ लक्ष रुपये पर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते, त्यामध्ये बँकेचा सहभाग ७५ टक्के, महामंडळाचा सहभाग २० टक्के व लाभार्थ्याचा सहभाग ५ टक्के असतो. या कर्जाचा परतफेडीचा कालावधी ५ वर्षे आहे. महामंडळाच्या थेट कर्ज योजनेअंतर्गत १ लक्ष रुपये पर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते, परतफेडीचा कालावधी ४ वर्षे असतो. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेसाठी १० लक्ष रुपये इतकी कर्ज मर्यादा आहे, तर गट कर्ज व्याज परतावा योजनेंतर्गत ५० लक्ष रुपये पर्यंत कर्ज मर्यादा आहे. या दोन्ही योजनांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा १८ त

कोरोना संसार्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम प्रभावीपणे राबवा - पालकमंत्री शंभूराज देसाई

Image
·         जिल्हास्तरावर मोहिमेचा शुभारंभ वाशिम , दि. १६ : कोरोना विषाणू संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी जिल्ह्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम सर्व लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या समन्वयाने राबविण्यात येणार आहे. या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जनजागृती करण्याच्या सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेच्या जिल्हास्तरीय शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, आमदार राजेंद्र पाटणी, जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीचे सभापती चक्रधर गोटे, जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, सरपंच संघटनेचे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत पाकधने यांची प्रमुख उपस्थिती होती. पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी काय खबरदारी घ्यावी, याबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये जनज

१५ जुलैपासून मंगरूळपीर, रिसोडमध्ये संपूर्ण लॉकडाऊन; तर इतर चार शहरांमध्ये ८ ते २ वाजेपर्यंतच दुकाने सुरु राहणार

Image
वाशिम , दि. १३ (जिमाका) : कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी मंगरूळपीर रिसोड या शहरांमध्ये तसेच लगतच्या काही गावांमध्ये १५ जुलैपासून सात दिवस कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कालावधीत सर्व दुकाने , आस्थापना , खासगी कार्यालये , पेट्रोलपंप , बँक बंद राहणार आहेत. सकाळी ७ ते १० वा. पर्यंत केवळ दुध व भाजीपाला विक्री सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. वाशिम , मालेगाव , कारंजा लाड आणि मानोरा या शहरांमध्ये सुद्धा लॉकडाऊनची सुधारित नियमावली लागू येणार आहे. या चारही शहरांमधील यापूर्वी परवानगी दिलेली सर्व दुकाने , आस्थापना सुरु ठेवण्याचा कालावधी १५ जुलैपासून सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिली. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर सर्व आस्थापना , दुकाने व सार्वजनिक ठिकाणी लोकांनी सोशल डिस्टसिंगच्या नियमांचे पालन करणे , मास्क , सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले. मात्र , या नियमांचे पालन होत नसल्याचे दिसून आले असून त्यामुळे कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे मंग