वाशिम जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर

 


·         १५ जानेवारी रोजी मतदान, १८ जानेवारीला मतमोजणी

·         २३ ते ३० डिसेंबर पासून नामनिर्देशनपत्रे स्वीकारणार

वाशिम, दि. १२ (जिमाका) : एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने घोषित केला आहे. त्यानुसार १५ डिसेंबर २०२० रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध केली जाणार असून २३ ते ३० डिसेंबर या कालावधीत (सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून) नामनिर्देशनपत्रे सादर करता येणार आहेत.

३१ डिसेंबर रोजी सकाळी ११ वा. पासून नामनिर्देशनपत्रांची छाननी सुरु होईल. ४ जानेवारी २०२१ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेता येईल. ४ जानेवारी रोजी दुपारी ३ वा. नंतर निवडणूक चिन्ह नेमून देण्याची तसेची अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. आवश्यकता असल्यास १५ जानेवारी  २०२१ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होईल. तसेच १८ जानेवारी रोजी मतमोजणी होणार असून २१ जानेवारी पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल.

राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या कार्यक्रमानुसार वाशिम तालुक्यातील २४, रिसोड तालुक्यातील ३४, मालेगाव तालुक्यातील ३०, मंगरूळपीर तालुक्यातील २५, कारंजा तालुक्यातील २८ आणि मानोरा तालुक्यातील २२ अशा एकूण १६३ ग्रामपंचायतींची निवडणुका होणार आहेत, असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

नामनिर्देशनाची प्रक्रिया संगणक प्रणालीद्वारे

निवडणुका असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यापासून निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू राहणार आहे. या क्षेत्रातील मतदारांवर विपरीत प्रभाव टाकणारी कोणतीही कृती, घोषणा मंत्री, खासदार, आमदार व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकाऱ्यांना आचारसंहितेच्या कालावधीत कुठेही करता येणार नाही. या निवडणुकांसाठी नामनिर्देशानाची प्रक्रिया संगणक प्रणालीद्वारेच राबविण्यात यावी. राज्य निवडणूक आयोगाच्या ५ फेब्रुवारी २०२० रोजीचे पत्र व त्यासोबतच्या सहपत्रान्वये दिलेल्या निर्देशानुसार संगणक प्रणालीतून नामनिर्देशनाची प्रक्रिया पार पाडावी, असे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमात नमूद करण्यात आले आहे.

सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेल्या ग्रामपंचायती –

वाशिम तालुका (२४) :- कळंबा महाली, पंचाळा, तामसी, सावंगा जहांगीर, तांदळी बु., वाळकी जहांगीर, वारा जहांगीर, अनसिंग, ब्रह्मा, किनखेडा, पिंपळगाव, तोरणाळा, वारला, अडोळी, टो, काटा, पाडी टकमोर, तोंडगाव, भोयता, उकळीपेन, कोंडाळा झामरे, पार्डी आसरा, सावरगाव जिरे, काजळंबा.

रिसोड तालुका (३४) : लोणी बु., करंजी, खडकी सदार, हराळ, केशवनगर, रिठद, चिचांबापेन, गोभणी, कंकरवाडी, केनवड, मसला पेन, व्याड, वाकद, वनोजा, आगरवाडी, चिंचाबाभर, देऊळगाव बंडा, नावली, नेतन्सा, पळसखेड, सवड, येवती, नंधाना, मांगुळ झनक, कवठा खु., चिखली, गोवर्धन, शेलू खडसे, करडा, बिबखेडा, मोठेगाव, गोधळा, एकलासपूर, मोप.

मालेगाव तालुका (३०) : जोडगव्हाण, करंजी, डोंगरकिन्ही, गांगलवाडी, खैरखेडा, मुंगळा, राजुरा, उमरवाडी, वाकळवाडी, चिवरा, किन्हीराजा, काळाकामठा, कळंबेश्वर, कोलदरा, मारसूळ, मेडशी, उमरदरी, वरदरी बु., वारंगी, शिरपूर, बोराळा जहांगीर, डही, ढोरखेडा, एकंबा, जऊळका, खिर्डा, पांगरी कुटे, शिरसाळा, वसारी, तिवळी.

मंगरूळपीर तालुका (२५) : निंबी, पार्डी ताड, चांधई, ईचा, कोठारी, मानोली, पेडगाव, तऱ्हाळा, हिसई, खडी, चांभई, कवठळ, मोहरी, शेलू खुर्द, वनोजा, भूर, नांदखेडा, कंझारा, येडशी, चोरद, लावणा, फाळेगाव, सार्सी बो., सायखेडा, चिंचखेडा.

कारंजा तालुका (२८) : सोहोळ, कोली, कामरगाव, शेलू बु., उंबर्डा बाजार, खेर्डा बु., कार्ली, मुरंबी, भांबदेवी, गायवळ, शेवती, बेंबळा, माळेगाव, हिंगणवाडी, भडशिवणी, सिरसोली, राहटी, मेहा, लाडेगाव, पिंप्री मोडक, येवता, धामणी खडी, पिंपळगाव खु. सोमठाणा, रामनगर, शिवनगर, दुधोरा, मोहगव्हाण.

मानोरा तालुका (२२) : गादेगाव, अजनी, गव्हा, कोंडोली, तळप बु., पारवा, असोला बु. सेवादासनगर, हिवरा बु., हळदा, कुपटा, वरोली, धामणी, विठोली, कारखेडा, वाईगौळ, गोंडेगाव, आमकिन्ही, रतनवाडी, शेंदूरजना, इंझोरी, मोहगव्हाण.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे