मतदान केंद्र, मतमोजणी केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

 


ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२०

वाशिम, दि. ३१ (जिमाका) : राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान होत आहे. तसेच १८ जानेवारी २०२१ रोजी मतमोजणी होणार आहे. या सर्व ग्रामपंचायत निवडणूक मतदान केंद्रांवर १४ जानेवारी २०२१ रोजीचे सकाळी ६ वाजेपासून ते १५ जानेवारी २०२१ रोजीचे सायंकाळी ६ वाजेपर्यंत, तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयाने निश्चित केलेल्या मतमोजणी केंद्रांवर १८ जानेवारी २०२१ रोजी मतमोजणी प्रक्रिया सुरु झाल्यापासून ते मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया संपेपर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

सार्वत्रिक निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायती

वाशिम तालुका (२४) :- कळंबा महाली, पंचाळा, तामसी, सावंगा जहांगीर, तांदळी बु., वाळकी जहांगीर, वारा जहांगीर, अनसिंग, ब्रह्मा, किनखेडा, पिंपळगाव, तोरणाळा, वारला, अडोळी, टो, काटा, पार्डी टकमोर, तोंडगाव, भोयता, उकळीपेन, कोंडाळा झामरे, पार्डी आसरा, सावरगाव जिरे, काजळंबा.

रिसोड तालुका (३४) : लोणी बु., करंजी, खडकी सदार, हराळ, केशवनगर, रिठद, चिचांबापेन, गोभणी, कंकरवाडी, केनवड, मसला पेन, व्याड, वाकद, वनोजा, आगरवाडी, चिंचाबाभर, देऊळगाव बंडा, नावली, नेतन्सा, पळसखेड, सवड, येवती, नंधाना, मांगुळ झनक, कवठा खु., चिखली, गोवर्धन, शेलू खडसे, करडा, बिबखेडा, मोठेगाव, गोंढाळा, एकलासपूर, मोप.

मालेगाव तालुका (३०) : जोडगव्हाण, करंजी, डोंगरकिन्ही, गांगलवाडी, खैरखेडा, मुंगळा, राजुरा, उमरवाडी, वाकळवाडी, चिवरा, किन्हीराजा, काळाकामठा, कळंबेश्वर, कोलदरा, मारसूळ, मेडशी, उमरदरी, वरदरी बु., वारंगी, शिरपूर, बोराळा जहांगीर, डही, ढोरखेडा, एकंबा, जऊळका, खिर्डा, पांगरी कुटे, शिरसाळा, वसारी, तिवळी.

मंगरूळपीर तालुका (२५) : निंबी, पार्डी ताड, चांधई, ईचा, कोठारी, मानोली, पेडगाव, तऱ्हाळा, हिसई, खडी, चांभई, कवठळ, मोहरी, शेलू खुर्द, वनोजा, भूर, नांदखेडा, कंझारा, येडशी, चोरद, लावणा, फाळेगाव, सार्सी बो., सायखेडा, चिंचखेडा.

कारंजा तालुका (२८) : सोहोळ, कोळी, कामरगाव, शेलू बु., उंबर्डा बाजार, खेर्डा बु., कार्ली, मुरंबी, भांमदेवी, गायवळ, शेवती, बेंबळा, माळेगाव, हिंगणवाडी, भडशिवणी, सिरसोली, राहटी, मेहा, लाडेगाव, पिंप्री मोडक, येवता, धामणी खडी, पिंपळगाव खु. सोमठाणा, रामनगर, शिवनगर, दुधोरा, मोहगव्हाण.

मानोरा तालुका (२२) : गादेगाव, अजनी, गव्हा, कोंडोली, तळप बु., पारवा, असोला बु. सेवादासनगर, हिवरा बु., हळदा, कुपटा, वरोली, धामणी, विठोली, कारखेडा, वाईगौळ, गोंडेगाव, आमकिन्ही, रतनवाडी, शेंदूरजना, इंझोरी, मोहगव्हाण.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे