जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी १५ जानेवारीपर्यंत प्रस्ताव सादर करावेत

 


वाशिम, दि. ३० (जिमाका) : जिल्हा क्रीडा पुरस्काराच्या २४ जानेवारी २०२० रोजीच्या सुधारित शासन निर्णयानुसार राज्य शासनाच्या क्रीडा व युवक संचालनालय अंतर्गत वाशिम जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने सन २०२०-२१ या वर्षाकरिता जिल्हा क्रीडा पुरस्कार २६ जानेवारी २०२१ रोजी वितरीत करण्यात येणार आहे. या पुरस्कारामध्ये वाशिम जिल्ह्यातील गुणवंत खेळाडू (१ पुरुष, १ महील व १ दिव्यांग), १ गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार असे एकूण चार पुरस्कार देण्यात येणार आहेत.

गुणवंत खेळाडू, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक यांच्या कार्याचे व योगदानाचे मूल्यमापन होवून त्यांचा गौरव व्हावा, हा या क्रीडा पुरस्कारांचा उद्देश आहे. स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सदर पुरस्कारासाठी शासन निर्णयातील पात्रतेच्या निकषानुसार व पुरस्कार वर्ष १ जुलै ते ३० जून असे राहील. या कालावधीतील क्रीडा विषयक कामगिरीचा आढावा घेण्यात येईल.

शासन निर्णयातील परिशिष्ट अ-६.१ अन्वये जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी खेळाचा समावेश असून इच्छुकांनी विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातून प्राप्त करून घ्यावेत व १५ जानेवारी २०२१ पर्यंत प्रस्ताव बंद लिफाफ्यात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सादर करावेत. उशिरा प्राप्त होणारे प्रस्ताव कार्यालयात स्वीकारले जाणार नाहीत. अधिक माहिती व अर्जाच्या नमुन्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रकांत उप्पलवार यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे