Posts

Showing posts from March, 2022

जिल्हा जलसंधारण कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतली जल शपथ

Image
जिल्हा जलसंधारण कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतली जल शपथ              वाशिम, दि. 29 (जिमाका) : जलशक्ती अभियान सन 2022 ची सुरुवात करण्यात आली आहे. यानिमित्ताने जिल्हा जलसंधारण अधिकारी कार्यालय येथे आज 29 मार्च रोजी आयोजित कार्यक्रमात उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जल शपथ घेतली. यावेळी जिल्हा जलसंधारण अधिकारी सुभाष आकोसकर, वाशिमचे उपविभागीय जलसंधारण अधिकारी श्री. सपकाळ, मंगरुळपीरचे उपविभागीय जलसंधारण अधिकारी श्री. वाघमारे, जलसंधारण अधिकारी श्री. गिरी, तांत्रिक अधिकारी मयुर हुमने तसेच कार्यालयातील इतर अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.                 या जल शपथेमधून पाण्याचा विवेकपर्ण वापर करुन पाणी वाचविण्यात येईल. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा संचय करुन जलशक्ती अभियानामध्ये मनापासून सहभागी होईल. पाणी ही अनमोल संपत्ती आहे असे माणून प्रत्येक जण पाण्याचा वापर करेल. प्रत्येक कुटूंबिय, मित्र आणि शेजाऱ्यांना देखील पाण्याचा विवेकी वापर करण्यासाठी आणि पाणी वाया न घालण्यासाठी प्रेरित करण्याचे काम करण्यात येईल. हा आपला ग्रह असून आपणच त्याला वाचवू शकतो आणि आपले भविष्य सुरक्षित करु शकतो.

माहिती कार्यालयात घेतली जल शपथ

Image
माहिती कार्यालयात घेतली जल शपथ              वाशिम, दि. 29 (जिमाका) :  पाण्याचा वापर प्रत्येक व्यक्तीने काटकसरीने करावा. तसेच प्रत्येक व्यक्ती जल साक्षर होऊन जलशक्ती अभियानात सहभागी व्हावे. यासाठी या अभियानांतर्गत आज जिल्हा माहिती कार्यालयात जल शपथ घेण्यात आली. जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी जल शपथचे वाचन केले. यावेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अलोक अग्रहरी, जिल्हा बाल संरक्षक अधिकारी भगवान ढोले, संरक्षण अधिकारी लक्ष्मण काळे, सामा जिक कार्यकर्ता अनंदा इंगळे, अजय यादव, राजू जाधव, विजय राठोड, गजानन डहाके व अनिल कुरकुटे यांनी सुध्दा जल शपथ घेतली. *******

जल शक्ती अभियानाच्या रथाचा शुभारंभ

Image
जल शक्ती अभियानाच्या रथाचा शुभारंभ              वाशिम, दि. 29 (जिमाका) :  वाढते नागरीकरण आणि हवामान बदलामुळे पाणी साठयावरचा ताण दिवसेंदिवस वाढत असून भूजल पातळी दिवसेंदिवस खोलवर जात आहे. यासाठी प्रत्येक व्यक्ती हा जलसाक्षर होणे काळाजी गरज आहे. पाण्याचा विवेकी वापर केला तरच पाणी आपल्याला वाचवेल याच उद्देशातून जलशक्ती अभियान 2022 राबविण्यात येत आहे.                  आज 29 मार्च रोजी जिल्हा जलसंधारण अधिकारी कार्यालयाने तयार केलेल्या जल शक्ती अभियान चित्ररथाचा शुभारंभ निवासी उपजिल्हाधिकारी शैलेष हिंगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात हिरवी झेंडी दाखवून केला. यावेळी जिल्हा जलसंधारण अधिकारी सुभाष आकोसकर, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आलोक अग्रहरी, बाल कल्याण समिती सदस्य अरुणा ताजने, ॲड. प्रकाश जोशी, परिवीक्षा अधिकारी गणेश ठाकरे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी भगवान ढोले, लेखापाल प्रांजली चिपडे, जलसंधारण कार्यालयाचे श्री. हुमने व अनिल कुरकुटे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.                  या रथाच्या माध्यमातून शहरी भागात वृक्ष लागवड, सार्वजनिक इमारती व खा

तृतीय पंथीयांसाठी मतदार नोंदणीसाठी 2 एप्रिलपर्यंत विशेष शिबीर

Image
तृतीय पंथीयांसाठी मतदार नोंदणीसाठी 2 एप्रिलपर्यंत विशेष शिबीर              वाशिम, दि. 29 (जिमाका) :  31 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय तृतीयपंथी ओळख दिन म्हणुन साजरा करण्यात येतो. या निमीत्ताने जिल्ह्यात 27 मार्च ते 2 एप्रिल या कालावधीत तृतीय पंथीयांच्या मतदार नोंदणीचा विशेष सप्ताह साजरा करण्याचा निर्णय मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालयाने घेतला आहे. त्यानुसार जिल्हयात 2 एप्रिलपर्यंत तृतीय पंथीयांच्या मतदार नोंदणीचा विशेष सप्ताह शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे.                जिल्हयातील तृतीय पंथीयांसाठी कार्य करणाऱ्या सामाजिक संस्था व व्यक्ती यांनी विशेष सप्ताहात सहभागी होण्याकरीता जिल्हयातील नोंदणी न केलेल्या तृतीय पंथीयांनी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी अथवा बीएलओ यांच्याकडे नांव नोंदणी करण्याकरीता आपण आपल्यास्तरावरुन उपविभाग/तहसिलस्तरावर तृतीय पं थीयांच्या मतदार नोंदणीचा विशेष सप्ताहानिमित्त 31 मार्च 2022 रोजी शिबीराचे आयोजन करावे. असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी, संदीप महाजन यांनी कळविले आहे.                                                               

मृत मासेमाराच्या वारसदारास जिल्हाधिकारी यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण

Image
मृत मासेमाराच्या वारसदारास जिल्हाधिकारी यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण              वाशिम, दि. 29 (जिमाका) :  मासेमार संकट निवारण निधी या योजनेअंतर्गत मासेमारी करतांना मच्छिमारांचा अपघाती मृत्यु झाल्यास अथवा बेपत्ता झाल्यास या योजनेअंतर्गत मच्छिमारांच्या वारसदारास अर्थसहाय्य देण्याची योजना आहे. मासेमार संकट निवारण निधी या योजनेअंतर्गत आज २९ मार्च रोजी जिल्हाधिकारी षण्मुगराज एस. यांच्या हस्ते मानोरा तालुक्यातील धामणी येथील श्रीमती बेबी गजानन खोडके या मृत मच्छिमाराच्या कायदेशिर वारसदारास एक लक्ष रुपयाचा धनादेश वितरीत करण्यात आला. यावेळी मत्स्यव्यवसायचे सहाय्यक आयुक्त एम. व्ही. जयस्वाल, मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी ए. व्हि. जाधव, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी श्रीमती ए. आर. जैन, व स्नेहा प्रबत यांची उपस्थिती होती. *******

कारागृहातील बंदयांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण

Image
कारागृहातील बंदयांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण            वाशिम, दि. 29 (जिमाका) :  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र वाशिम यांच्यावतीने वाशिम कारागृहातील बंदयांना आयोजित कौशल्य विकासाच्या प्रशिक्षण वर्गाचा समारोप आज 29 मार्च रोजी जिल्हा कारागृह येथे झाला.                कारागृहातील बंदयांना आयोजित कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देवून त्यांना कुशलयुक्त बनवावे हा विचार स्थानिक प्रशासनाच्या मनात आला व त्यादृष्टीने प्रयत्न करून जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र वाशिम यांच्यावतीने जिल्हा कारागृहातील ९५ बंदयांना कॅटरिंग, बेकरी प्रोडक्ट, व बंदिस्त शेळीपालन या तीन क्षेत्रात कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणाचे खास वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा हे बंदी कारागृहातून मुक्त होतील तेंव्हा या प्रशिक्षणामुळे त्यांचे जीवनमान बदलण्यास मदत होईल. हे बंदी रोजगारक्षम होवून आपले जीवन स्वावलंबनाने व सन्मानाने जगतील. या उदात्त हेतूने या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.     

महाडीबीटी पोर्टल : शिष्यवृत्ती व योजनांच्या अर्जासाठी 31 मार्च मुदत

Image
महाडीबीटी पोर्टल : शिष्यवृत्ती व योजनांच्या अर्जासाठी 31 मार्च मुदत            वाशिम, दि. 29 (जिमाका) :  अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग या प्रवर्गासाठी राबविण्यात येणाऱ्या मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती/शिक्षण फी, परीक्षा फी योजना व इतर ऑनलाईन  योजनांचे शैक्षणिक वर्ष 2021-22 मधील अर्ज स्विकारण्यासाठी 14 डिसेंबर 2021 पासून नवीन प्रवेशित व नूतनीकरणाचे विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्यासाठी महाडिबीटी पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे.                सन 2021-22 मधील अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फि, परीक्षा फी तसेच व इयत्ता 11 वी व 12 वीच्या विद्यार्थ्यांकरीता राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती व इतर योजनांचे अर्ज  https://mahadbtmahait. gov.in  या महाडीबीटी पोर्टलच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2022 असल्याने महाविद्यालय स्तरावरुन विद्यार्थ्यांना व पालकांना कळवावे. महाविद्यालयांनी सन 2021-22 करी

रोजगार इच्छुक उमेदवारांकरीता४२५ रिक्तपदांवर रोजगाराची संधी30 व 31 मार्च रोजी ऑनलाईन रोजगार मेळावा

Image
रोजगार इच्छुक उमेदवारांकरीता ४२५ रिक्तपदांवर रोजगाराची संधी 30 व 31 मार्च रोजी ऑनलाईन रोजगार मेळावा             वाशिम, दि. 29 (जिमाका) : राज्यातील नामांकित नियोक्तांकडुन प्राप्त मनुष्यबळ मागणीनुसार जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केन्द्र, वाशिम या कार्यालयासह अमरावती विभागातील अकोला, बुलडाणा, अमरावती व यवतमाळ कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने पंडीत दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा ३० व ३१ मार्च २०१२ रोजी ऑनलाईन पध्दतीने आयोजित केला आहे. या ऑनलाईन विभागीय रोजगार मेळाव्यात वाशिम जिल्हयासह राज्यातील नामांकित कंपन्या/आस्थापनांमध्ये ४२५ रिक्त जागेवर रोजगार मिळविण्याची संधी विभागातील नोकरी इच्छुक उमेदवारांना याद्वारे प्राप्त होणार आहे. त्या अनुषंगाने अमरावती विभागाच्या सर्व जिल्हयातील रोजगार इच्छुक स्त्री-पुरुष उमेदवारांना www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रतेनुसार पसंतीक्रम देत सहभागी होता येणार आहे. रोजगार मेळाव्यात इयत्ता १० वी, १२ वी, आय.टी.आय. (सर्व शाखा)/ स्थापत्य-मेकॅनिक-ईलेक्ट्रॉनिक्स पदवीधर व पदविकाधारक/इतर सर्वशाख

जिल्हा कारागृहात कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर संपन्न

Image
  जिल्हा कारागृहात कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर संपन्न           वाशिम, दि. 25 (जिमाका) : २४ मार्च रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधीज्ञ संघ वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने व वाशिम जिल्हा कारागृह यांच्या सहकार्याने जिल्हा कारागृहामध्ये कैद्यांकरीता कायदेविषयक मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. संजय शिंदे होते. न्यायदंडाधिकारी एम.एस. पदवाड यांनी उपस्थित कैद्यांना विधी प्राधिकरणामार्फत मिळणाऱ्या मोफत विधी सहाय्याबाबत व कैद्यांचे अधिकार याबाबत, जिल्हा विधीज्ञ संघाचे कोषाध्यक्ष अॅड. समाधान सावळे यांनी कैद्यांचे मुलभुत अधिकार व कायदेविषयक सेवा याबाबत मार्गदर्शन केले.                 न्या. श्री. शिंदे हे कैद्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले,आपले पुढील जिवन सुंदर बनविण्यासाठी त्यांचा वेळ वाचन व शिक्षणावर खर्च करावा.संचालन वरिष्ठ तरुंगाधिकारी भि.ना.राऊत यांनी केले.आभार जिल्हा कारागृह अधीक्षक श्री. सोमनाथ पाडुळे यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्हा विधीज्ञ संघाचे सचिव अॅड. एन. टी. जुमडे, डॉ. घुगे,जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे

28 मार्च ते 11 एप्रिल प्रतिबंधात्मक आदेश

  28 मार्च ते 11 एप्रिल प्रतिबंधात्मक आदेश            वाशिम ,   दि.   25 (जिमाका) : जिल्हयात 4 एप्रिल रोजी मराठी नुतनवर्ष गुढीपाडवा व 10 एप्रिल रोजी हिंदु धर्मीयांचेवतीने रामनवमी हा महत्वाचा उत्सव जिल्हयात सर्वत्र साजरा करण्यात येणार आहे.तसेच रामनवमीच्या पर्वावर पोलीस स्टेशन मानोरा अंतर्गत श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे भव्य यात्रेचे आयोजन करण्यात येते. जिल्हा जातीयदृष्टया संवेदनशील असून नजिकच्या काळात शेजारच्या अकोला,अमरावती व यवतमाळ या जिल्हयात घडलेल्या जातीय घटनेच्या प्रतिक्रीया आगामी काळात जिल्हयात उमटून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.                राज्यात शासनाकडून ओमिक्रॉन/कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधक उपाययोजनेअंतर्गत प्रतिबंधात्मक निर्देश निर्गमित करण्यात आले आहे. सद्यस्थितीत राज्यात एस. टी. महामंडळ कर्मचारी यांचे महामंडळास राज्य शासनात समावेश करण्याच्या मागणीसाठी कामबंद आंदोलन सुरु आहे. राज्यात नोकरीमध्ये पदोन्नतीस मागासवर्गीयांना 33 टक्के आरक्षण कायम ठेवावे या मागणीसाठी विविध कर्मचारी संघटनांकडून विविध प्रकारच्या आंदोलनाचे आयोजन करण्

ऑटोरिक्षा व टॅक्सी/कुल कॅब क्यूआर कोडची अंमलबजावणी करण्याचे निर्देश

  ऑटोरिक्षा व टॅक्सी/कुल कॅब   क्यूआर कोडची अंमलबजावणी करण्याचे निर्देश             वाशिम, दि. 25 (जिमाका) : जिल्ह्यातील ऑटोरिक्षा व टॅक्सी/ कुल कॅब मालक/चालकांनी राज्य परिवहन प्राधिकरणाच्या ठरावानुसार निर्णयाची व महिला सुरक्षिततेसाठी नियमाची अंमलबजावणी करण्याचे सुचित केले आहे. त्याअनुषंगाने राज्य परिवहन प्राधिकरणाने मिटर टॅक्सी (काळी- पिवळी व कुल फॅब) व ऑटोरिक्षा या वाहनांमध्ये परवानाधारकाचा तपशिल,परवान्याचा तपशिल, वाहनाचा व वाहन चालकाचा तपशिल तसेच आपत्कालीन परिस्थितीसाठी पोलीस हेल्पलाईन क्रमांक व संबंधित प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे दूरध्वनी क्रमांक दर्शविणारे स्टिकर प्रवाशांना सहज दिसतील अशा पध्दतीने प्रदर्शित करण्याचे सुचित केले आहे.                 परवान्यावरील वाहनामध्ये परवान्याचा व वाहन चालकाचा तपशिल वरील नमुद केलेल्या बाबी प्रवाशांना सहज दिसेल अशा पध्दतीने प्रदर्शित करावा.सुचनेची अंमलबजावणी न करण्याऱ्या ऑटोरिक्षा व टॅक्सी/कुल कॅब मालक सदरच्या वाहनांवर वायुवेग पथकामार्फत कार्यवाही करण्यात येईल.याबाबत नोंद घेण्यात यावी. असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे यांन

कृषी विभाग : पारदर्शक व गतिमान लाभासाठी " एक शेतकरी एक अर्ज " उपक्रम यशस्वी

  कृषी विभाग : पारदर्शक व गतिमान लाभासाठी " एक शेतकरी एक अर्ज " उपक्रम   यशस्वी             वाशिम, दि. 25 (जिमाका) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कृषि विभागाचा कार्यभार सोपविल्यानंतर कृषि मंत्री दादाजी भुसे यांनी कृषि विभागामध्ये अनेक नविन उपक्रम व योजना सुरु केल्या आहेत. त्याचे दृश्य परिणाम   दिसू लागले आहेत.त्यापैकीच एक म्हणजे "एक शेतकरी - एक अर्ज "   पूर्वी शेतकऱ्यांना कृषि विभागाच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक वेळी नव्याने अर्ज करावा लागत होता. प्रत्येक अर्जासोबत सारखीच कागदपत्रे जोडावी लागत होती. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ व पैसाही खर्च व्हायचा.बऱ्याच वेळा मागणी केलेल्या घटकाचा लाभही मिळत नव्हता. तसेच लाभार्थी निवडतांना विविध स्तरावरच्या हस्तक्षेपामुळे योजना गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहचत नव्हत्या त्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी असायची. यावर उपाय शोधत असतांना कृषि विभागाने माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करुन महाडीबीटी प्रणाली विकसित करुन " एक शेतकरी- एक अर्ज " ही संकल्पना अंमलात आणली. या प्रणालीमुळे केवळ एकाच अर्जाद्वारे शेतकऱ्यांना कृषि वि

महाडीबीटी पोर्टल : शिष्यवृत्ती व योजनांच्या अर्जासाठी 31 मार्च मुदत

  महाडीबीटी पोर्टल : शिष्यवृत्ती व योजनांच्या अर्जासाठी 31 मार्च मुदत            वाशिम, दि. 25 (जिमाका) : अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग या प्रवर्गासाठी राबविण्यात येणाऱ्या मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती/शिक्षण फी, परीक्षा फी योजना व इतर ऑनलाईन   योजनांचे शैक्षणिक वर्ष 2021-22 मधील अर्ज स्विकारण्यासाठी 14 डिसेंबर 2021 पासून नवीन प्रवेशित व नूतनीकरणाचे विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्यासाठी महाडिबीटी पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे.                  सन 2021-22 मधील अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फि, परीक्षा फी व इयत्ता 11 वी व 12 वीच्या विद्यार्थ्यांकरीता राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती व इतर योजनांचे अर्ज   https://mahadbtmahait.gov.in   या महाडीबीटी पोर्टलच्या संकेतस्थळावर अर्ज भरण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2022 असल्याने महाविद्यालय स्तरावरुन विद्यार्थ्यांना व पालकांना कळवावे.महाविद्यालयांनी सन 2021-22 करीता अनुसूचित जाती, व

राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेअंतर्गत विविध स्पर्धेचे आयोजन

  राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेअंतर्गत विविध स्पर्धेचे आयोजन    वाशिम ,   दि.   24   (जिमाका)   : भारत निवडणूक आयोगाने २५ जानेवारी २०२२ ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धाअंतर्गत प्रश्न मंजुषा स्पर्धा, व्हिडीओ तयार करण्याची स्पर्धा, पोस्टरची डिझाईन करण्याची स्पर्धा, गाण्याची स्पर्धा, घोषवाक्य तयार करण्याची स्पर्धा अशा पाच प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या आहे.या स्पर्धेबाबतची सविस्तर माहिती https://ecisveep.nic.in/contest/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या स्पर्धेमध्ये अधिकाधिक स्पर्धकांनी भाग घ्यावा याकरिता पुढीलप्रमाणे प्रचार व प्रसिध्दी करण्यात यावी.या स्पर्धेचे सोबत जोडलेले पोस्टर, गाईडलाईन्स, व्डिीओ याची स्थानिक वृत्तपत्र, समाजमाध्यम, विविध व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुपवर तसेच जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या वेबसाईटवर प्रचार व प्रसिध्दी करावी. स्पर्धेची माहिती मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, NSS,NYK, NCC,PIB, Media House व इतर संबंधित व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुपवर स्पर्धेच्या कालावधीत नियमितपणे पाठविण्यात यावी. समाज माध्यमांवर माहिती अपलोड करतेवेळ

दुकानाचे नामफलक मराठीत असणे अनिवार्य

  दुकानाचे नामफलक मराठीत असणे अनिवार्य    वाशिम ,   दि.   24   (जिमाका)   :   प्रत्येक दुकानाचे नामफलक सुरुवातीला मराठीत नाव असणे अनिवार्य असेल अशा तरतुदीची महाराष्ट्र दुकाने व आस्थापना नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन अधिनियम, 2017 मध्ये सुधारणा करण्यात आली आहे.     उक्त अधिनियमाच्या कलम 7 अन्वये ज्या आस्थापनेत 10 पेक्षा कमी कामगार आहे. अशा सर्व आस्थापनांना कलम 36 क (1) कलम 6 अन्वये नोंदणी केलेल्या प्रत्येक आस्थापनेत 10 पेक्षा अधिक कामगार आहे अशा सर्व आस्थापनेचे नामफलक देवनागरी लिपीतील मराठी भाषेमध्ये असेल. परंतू अशा आस्थापनेच्या नियोक्त्याकडील देवनागरी लिपीतील मराठी भाषे व्यतिरिक्त इतर कोणत्याही भाषेतील व लिपीतील नामफलक देखील असू शकतील. परंतु आणखी असे की मराठी भाषेतील अक्षरलेखन नामफलकावर सुरुवातीलाच लिहिणे आवश्यक असेल आणि मराठी   भाषेतील अक्षराचा टंक (FONT) आकार, इतर कोणत्याही भाषेतील अक्षरांच्या टंक (FONT) आकारापेक्षा लहान असणार नाही. तसेच ज्या आस्थापनांमध्ये मद्य पुरविले जाते किंवा विकले जाते, अशी आस्थापना, नामफलकावर महान व्यक्तींची किंवा गड-किल्ल्यांची नावे लिहिणार नाही. असा बदल

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला जिल्हा दक्षता समितीचा आढावा

  जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला जिल्हा दक्षता समितीचा आढावा    वाशिम ,   दि.   24   (जिमाका)   :   सार्वजनिक वितरण प्रणालीशी संबंधित जिल्हा दक्षता समितीची सभा आज 24 मार्च रोजी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी समितीचे सदस्य अप्पर जिल्हाधिकारी शहाजी पवार, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, जिल्हा उपनिबंधक आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष यांचे प्रतिनिधी व सचिव तथा जिल्हा पुरवठा अधिकारी तेजश्री कोरे प्रामुख्याने उपस्थित होत्या.     यावेळी ग्रामस्तरावर असलेल्या दक्षता समित्यांच्या बैठकांचा आढावा घेण्यात आला. तालुकास्तरीय दक्षता समित्या स्थापन करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश श्री. षन्मुगराजन यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना दिले. जिल्ह्यात अंत्योदय योजनेचे 2 लक्ष 4 हजार 13 लाभार्थी, प्राधान्य कुटूंब योजनेत 7 लक्ष 51 हजार 392 लाभार्थी, एपीएल शेतकरी योजनेचे 23 हजार 315 कार्डधारक असून लाभार्थी संख्या 97 हजार 825 असे यांची माहिती श्रीमती कोरे यांनी यावेळी दिली. जिल्ह्यात नवीन शिधापत्रिकेसाठी 201, दुय्यम शिधापत्रिकेसाठी 110, नाव कमी कर

जिल्हयाच्या रस्ते विकासाला चालना देणार - अशोकराव चव्हाण, रेल्वे उड्डाण पुलाचे ई-लोकार्पण

Image
जिल्हयाच्या रस्ते विकासाला चालना देणार                                                               -अशोकराव चव्हाण रेल्वे उड्डाण पुलाचे ई-लोकार्पण           वाशिम, दि. 23 (जिमाका) : राज्यातील अविकसीत भागातील रस्त्यांची कामे पुर्ण करण्याचा आपला प्रयत्न आहे. वाशिम हा मागास जिल्हा आहे. जिल्हयाला विकासाच्या बाबतीत झुकते माप देऊन जिल्हयाच्या रस्ते विकासाला चालना देण्यात येईल. असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी केले.               आज 23 मार्च रोजी वाशिम-पुसद मार्गावरील रेल्वे उड्डाण पुलाचे ई-लोकार्पण श्री. चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री शंभुराज देसाई होते. खासदार भावना गवळी, आमदार ॲड. किरणराव सरनाईक व आमदार अमित झनक हे ऑनलाईन ई-लोकार्पण कार्यक्रमात सहभागी झाले. वाशिम येथील उड्डाण पुलाजवळ आयोजित कार्यक्रमाला बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव, जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम समिती सभापती सुरेश मापारी, जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., पोलीस अधिक्षक बच्चन सिंह, सहाय्यक पोलीस अधिक्षक श्रीमती स्वामी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते 23 मार्चला उड्डाण पुलाचे ई-लोकार्पण

Image
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते 23 मार्चला उड्डाण पुलाचे ई-लोकार्पण वाशिम दि.22 (जिमाका)  वाशिम - पुसद मार्गावर असलेल्या रेल्वे क्रॉसिंगवरील उड्डाणपुलाचे ई - लोकार्पण सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते 23 मार्च रोजी दुपारी 4 वाजता करण्यात येणार आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री शंभूराज देसाई हे असतील.यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, खासदार भावना गवळी, खासदार संजय धोत्रे, आमदार सर्वश्री डॉ. रणजीत पाटील,ऍड. किरणराव सरनाईक, वसंत खंडेलवाल,लखन मलिक, राजेंद्र पाटणी, अमित झनक, जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत व पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.           राज्यमार्ग केंद्रीय मार्ग निधीतून या उड्डाण पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. 18 कोटी 36 लाख रुपये या पुलाच्या बांधकामावर खर्च करण्यात आला आहे. सन 2021- 22 या वर्षामध्ये 1 कोटी 96 लक्ष रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. उर्वरित कामासाठी 2 कोटी 12 लक्ष रुपये निधी यासाठी लागणार आहे. प्रवाशांना व नागरिक

जिल्हा क्रीडा संकुलातील जलतरण तलाव नागरीकांच्या सेवेत

Image
  जिल्हा क्रीडा संकुलातील जलतरण तलाव नागरीकांच्या सेवेत             वाशिम, दि. 22 (जिमाका) : जिल्हा क्रीडा संकुलमध्ये असलेल्या जलतरण तलावाची सुविधा कोवीड- १९ च्या निर्बंधामुळे बंद ठेवण्यात आला होता. सध्या कोविड-१९ च्या निर्बंधामध्ये शिथीलता आल्याने जलतरण तलाव वाशिम जिल्हयातील आबालवृध्द नागरिक, खेळाडूंकरीता २१ मार्चपासून सायंकाळी ६ वाजतापासुन सुरु करण्यात आला आहे. या जलतरण तलावाची लांबी २५ मीटर असुन रुंदी २१ मीटर आहे. आकारमानावरुन हा सेमी ऑलंपीक साईजचा आहे. एका बाजुला खोली ४ फुट असुन सदरची खोली समपातळी ६ मीटर बाय २१ मीटर आहे. तसेच या जलतरण तलावामध्ये असलेल्या उताराची लांबी ११ मीटर आहे. दुसऱ्या बाजुची खोली ७ फुट असुन सदरची खोली समपातळी ही ८ मीटर बाय २१ मीटर आहे. या जलतरण तलावामध्ये लहान मुलांसाठी बेबीपुल आहे. त्याचा आकार ९ मीटर बाय 6 मीटर आहे. खोली २ फुट आहे. जलतरण तलावामध्ये ८ लेन बसविलेले आहेत. जलतरण तलावामध्ये सदस्यांकरीता नाव नोंदणी सुरु आहे.              जलतरण तलावाचे शुल्क निश्चित करण्यात आले असून ते पुढीलप्रमाणे आहे. 18 वर्षाखालील मुलां-मुलींसाठी मासिक शुल्क 500 रुपये, त्रै

पाण्याचा अपव्यय टाळणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे - न्या. संजय शिंदे

Image
  पाण्याचा अपव्यय टाळणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे                                                                                    - न्या. संजय शिंदे                वाशिम, दि. 22 (जिमाका) : भावी पिढीच्या सोईसाठी आज प्रत्येकाने पाण्याचा अपव्यय कसा टाळता येईल यासाठी क्षणोक्षणी चिंतन करणे आवश्यक आहे. पाण्याचा अपव्यय टाळणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न्या. संजय शिंदे यांनी केले.               आज जागतिक जल दिनाचे औचित्य साधुन जिल्हा न्यायालयातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन न्या. शिंदे बोलत होते. यावेळी न्या. आर. पी. कुलकर्णी, जिल्हा विधीज्ञ संघाच्या अध्यक्षा ॲड. छाया मवाळ, सचिव ॲड. एन.पी. जुमडे, जिल्हा विधीज्ञ संघाचे कोषाध्यक्ष ॲड. समाधान सावळे, सहसचिव ॲड. विनोद सानप व   ॲड. गणेश लव्हाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.              जल पुनर्भरण, जलसंवर्धन आणि प्रदुषणमुक्त पाणी व हवा मिळण्याचा अधिकार या विषयावर अॅड. गणेश लव्हाळे यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, भविष्यात पाण्यासाठी तिसरे महायुध्द होईल. त्यामुळे तो अन

राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धा 31 मार्चपर्यंत मुदतवाढ सहभाग नोंदविण्याचे आवाहन

  राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धा 31 मार्चपर्यंत मुदतवाढ सहभाग नोंदविण्याचे आवाहन              वाशिम, दि. 22 (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाने राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेमध्ये विशेष शैक्षणिक संस्थांना अधिक कार्यक्षमतेने 15 मार्च 2022 पर्यंत स्पर्धेत सहभागी होण्याबाबत कळविले होते. आता या स्पर्धेला 31 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेच्या अंतर्गत प्रश्न मंजूषा स्पर्धा, व्हिडीओ तयार करण्याची स्पर्धा, पोस्टरची डिझाईन तयार करण्याची स्पर्धा, गाण्याची स्पर्धा व घोषवाक्य तयार करण्याची स्पर्धा अशा पाच प्रकारच्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहे. या स्पर्धेत सर्व शासकीय/ निमशासकीय, अधिकारी/ कर्मचारी भाग घेऊ शकतात. सर्व शाळा/ महाविद्यालयीन विद्यार्थी व कर्मचारी यांना देखील स्पर्धेमध्ये सहभागी होता येईल. शाळा/ महाविद्यालयातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी नेमुन दिलेल्या यादी भागामधून प्रत्येकी दोन या प्रमाणे स्पर्धेमध्ये भाग घेणे आवश्यक केले आहे. सर्व शाळा/ महाविद्यालयीन यांनी राष्ट्रीय सेवा योजना को-ऑर्डिनेटर यांची बैठक घेऊन 31 मार्चपर्यंत स्पर्धेचे नियोज

श्रेष्ट योजना : विद्यार्थ्यांनी 14 एप्रिलपर्यंत नोंदणी करावी

  श्रेष्ट योजना : विद्यार्थ्यांनी 14 एप्रिलपर्यंत नोंदणी करावी           वाशिम, दि. 21 (जिमाका) : केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या अनुसूचित जातीच्या इयत्ता ९ वी आणि इयत्ता ११ वी च्या विद्यार्थ्यांचे श्रेष्ट या योजनेअंतर्गत सन २०२२-२३ या वर्षाकरीता नोंदणी सुरू करण्यात आली आहे. श्रेष्ट योजनेचा लाभ घेण्यासाठी इयत्ता ८ वी आणि १० वीचा विद्यार्थी हा अनुसूचित जातीचा असावा. विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न 2 लाख 50 हजारापेक्षा कमी असावे. या योजनेअंतर्गत शिक्षण व राहण्याच्या सोईकरिता CBSE affiliated नामांकित निवासी शाळेमध्ये प्रवेश देण्यात येईल. या परीक्षेकरिता शुल्क नसेल. या योजनेतुन इयत्ता 9 वी आणि इयत्ता 11 वी करिता 3000 विद्यार्थ्यांची संपूर्ण भारतामधून निवड करावयाची आहे. त्याअनुषंगाने अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनी https://shreshta.nta.nic.in या संकेतस्थळावर 14 एप्रिल 2022 पर्यंत नोंदणी करावी. विद्यार्थ्यांची परीक्षा 7 मे 2022 रोजी होणार आहे त्या परीक्षेचा निकाल 20 मे 2022 रोजी जाहिर करण्यात येईल.               या योजनेचा जास्तीत जास्त वि

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना 31 मार्चपर्यंत अर्ज मागविले

  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना 31 मार्चपर्यंत अर्ज मागविले            वाशिम, दि. 21 (जिमाका) : अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर आवश्यक रक्कम संबंधीत विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट वितरीत करण्यासाठी शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन 2016-17 पासुन सुरू केली आहे. सन 2017-18, 2018-19 व 2019-20 मधील पात्र विद्यार्थ्यांनी सन 2021-22 मध्ये अर्जाचे नुतनीकरणासाठी मागील सत्रा परिक्षांची गुणपत्रिका व महाविद्यालयाचे सन 2020-21 आणि 2021-22 या वषानुसार स्वतंत्रपणे भाडे करारनामा व अर्जामध्ये नमुद इतर आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.                पात्रतेसाठीसंबंधी निकष पुढीलप्रमाणे आहे. विद्यार्थी शासकीय वसतीगृहात प्रवेश घेण्यास पात्र असावा. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा. विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गाचा असावा. या योजनेसाठी निवड करताना सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज केलेल्या व वसतीगृहात प्रवेश अर्ज न मिळालेल्या व

उड्डाणपुलाचे लवकरच होणार उद्घाटन

Image
उड्डाणपुलाचे लवकरच होणार उद्घाटन वाशिम दि.20 (जिमाका) वाशिम येथील पुसद चौकातून वाशिम -पुसद  मार्गावर असलेल्या रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले आहे. उड्डाणपुलावरील काही किरकोळ कामे वेगाने सुरू आहेत.ही कामे पूर्ण होताच येत्या काही दिवसात लवकरच या उड्डाणपुलाचे उद्घाटन करण्यात येईल.अशी माहिती पालकमंत्री श्री. शंभूराज देसाई यांच्या कार्यालयातून देण्यात आली.त्यामुळे लवकरच या उड्डाणपूलावरून वाहतूक सुरू होणार असल्याने येणाऱ्या-जाणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहन चालकांना,प्रवाशांना व नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

जिल्ह्यातील ६३ गावात कलावंतांनी केला राज्य सरकारच्या दोन वर्षातील जनकल्याणकारी योजनांचा जागर

Image
जिल्ह्यातील ६३ गावात कलावंतांनी केला राज्य सरकारच्या दोन वर्षातील जनकल्याणकारी योजनांचा जागर वाशिम दि.१६ (जिमाका) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारला नुकतीच दोन वर्षे पूर्ण झाली. या सरकारने दोन वर्षाच्या काळात घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय, राबविलेल्या योजना व उपक्रमांची माहिती ९ ते १६ मार्च दरम्यान जिल्ह्यातील ६३ गावात तीन कलापथकातील कलावंतांनी लोककलांच्या माध्यमातून उपस्थित ग्रामस्थांना दिली.         या कार्यक्रमाला विविध गावात आयोजित कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य,सरपंच  उपसरपंच,पोलीस पाटील,अधिकारी, मुख्याध्यापक,ग्रामपंचायत सदस्य, शाळेतील विद्यार्थी,बचत गटांच्या महिला व ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.                कलावंतानी राज्य शासनाने दोन वर्षात घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय व योजनांची माहिती उपस्थितांना देऊन राज्य शासनाने वाशिम येथे राज्यातील पहिले स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे बहुउद्देशीय कृषी संकुल उभारण्याचा निर्णय घेऊन त्या संकुलाचे काम वेगाने पूर्ण होत असल्याचे सांगितले.सोबतच शिवभोजन योजना,महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त

जिल्हाधिकारी षण्मुगराजन यांनी केली जलसंधारणाच्या कामाची पाहणी

Image
जिल्हाधिकारी षण्मुगराजन यांनी केली जलसंधारणाच्या कामाची पाहणी            वाशिम, दि. 15 (जिमाका) :  जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी आज 15 मार्च रोजी वाशिम तालुक्यातील काटा आणि मंगरुळपीर तालुक्यातील तपोवन व घोगरी येथील जलसंधारणाच्या कामाची पाहणी केली. सदर कामे जून 2022 अखेर पुर्ण करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला दिले. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा जलसंधारण अधिकारी सुभाष आकोसकर व उपविभागीय जलसंधारण अधिकारी श्री. वाघमारे प्रामुख्याने उपस्थित होते.                महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ अंतर्गत वाशिम जिल्हयात जलसंधारणाची 171 कामे मंजूर आहे. यातील सन 2018-19 मधील 87 कामे आकांक्षीत जिल्हा म्हणून मंजूर केली आहे. त्यासाठी 85 कोटी रुपये निधी मंजूर झाला. त्यापैकी 13 कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे सुरु आहे. तसेच इतर कामे सुध्दा प्रगतीपथावर आहे.                वाशिम तालुक्यातील काटा येथे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून 11 लक्ष रुपये किमतीचे सिमेंट साठवण बंधाऱ्याचे बांधकाम पुर्ण झाले आहे. खोलीकरणाचे काम सुरु आहे. हे काम पुर्ण होताच पावसाळयात 4 सहस्त्र घनमिटर पाणीसाठा या बंधाऱ्यात होणार आह

राज्य सरकारची दोन वर्षपूर्ती कारखेडा व इंझोरी येथे लोककलावंतांनी दिली विविध योजनांची माहिती

Image
  राज्य सरकारची दोन वर्षपूर्ती कारखेडा   व इंझोरी येथे लोककलावंतांनी दिली विविध योजनांची माहिती            वाशिम, दि. 14 (जिमाका) : नुकतीच राज्यातील महाविकास आघाडी सरकारला दोन वर्ष पुर्ण झाली. या सरकारने विविध कल्याणकारी योजना राबवितांना काही महत्वाचे निर्णय घेतले. जिल्हयात या काळात विविध विकास कामे करण्यात आली. सरकारने घेतलेल्या निर्णयांची, उपक्रमांची व योजनांची माहिती नागरीकांना व्हावी याकरीता माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि जिल्हा माहिती कार्यालय, वाशिमच्या वतीने आयोजित लोककलावंतांच्या कलापथकाने मानोरा तालुक्यातील कारखेडा आणि इंझोरी या गावामध्ये ग्रामस्थांचे मनोरंजन करुन माहिती दिली.                13 आणि 14 मार्च रोजी मानोरा तालुक्यातील कारखेडा आणि इंझोरी या गावामध्ये सुर्यलक्ष्मी बहुउद्देशिय संस्थेचे प्रमुख कलावंत लोककवी विलास भालेराव व त्यांच्या सहकलावंतांनी कलापथकाच्या कार्यक्रमातून उपस्थित ग्रामस्थांना योजनांची माहिती दिली.                कारखेडा येथे आयोजित कार्यक्रमाला सरपंच सोनाली देशमुख, उपसरपंच अनिल काजळे, ग्रामपंचायत सदस्य देवानंद मुसळे, ग्रामसचिव गणेश तायडे