धनगर समाजातील महिलांसाठी मार्जिन मनी योजना

 

धनगर समाजातील महिलांसाठी

मार्जिन मनी योजना

          वाशिम, दि. 09 (जिमाका) : स्टैंड अप इंडिया योजनेत धनगर समाजातील महिलांकरित मार्जिन मनी योजना सुरु करण्यात आली आहे. यासाठी केंद्र शासनाने आर्थिक तरतूद केली आहे. ही रक्कम सिडबीकडे वर्ग करण्यात आली आहे. सिडबीने या रक्कमेचे सुरक्षा हमी कवच तयार केले आहे. लाभार्थ्यांना जे कर्ज दिले जाईल त्याला सिडबी हमी देईल. या योजनेंतर्गत राज्यातील धनगर समाजातील महिलांनी १० टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास स्टैंड अप इंडिया योजनेअंतर्गत ७५ टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित फ्रॉन्ट एन्ड सबसिडी १५ टक्के राज्य शासनामार्फत देण्यात येणार आहे.

             या योजनेच्या मार्गदर्शक सूचना ६ सप्टेंबर २०१९ च्या शासन निर्णयानुसार शासनस्तरावरून निश्चित करण्यात आलेल्या आहे. हा शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर निरिक्षणासाठी उपलब्ध आहे.

              या योजनेकरिता इच्छुक लाभार्थ्यांनी सहायक आयुक्त, समाज कल्याण, वाशिम यांचेकडे शासन निर्णयातील नमुद करण्यात आलेल्या सर्व अटी व शतींची पूर्तता करून प्रस्ताव सादर करावा. असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुकत मारोती वाठ यांनी केले आहे.

*******


Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर