#मंगरुळपीर तालुक्यातील शेगी येथे लोकसेवा नाट्य मंडळाच्या कलावंतांनी योजना व उपक्रम तसेच जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विकासकामांची माहिती दिली
Get link
Facebook
X
Pinterest
Email
Other Apps
#दोन_वर्ष_जनसेवेची
#वाशिम
महाविकास आघाडी सरकारने राबविलेल्या दोन वर्षातील योजनांचा जागर लोककलेचा माध्यमातून करण्यात येत आहे. #मंगरुळपीर तालुक्यातील शेगी येथे लोकसेवा नाट्य मंडळाच्या कलावंतांनी योजना व उपक्रम तसेच जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विकासकामांची माहिती दिली
· वक्तृत्व स्पर्धा, परिसंवादात मांडले विचार · ‘स्वीप’ अंतर्गत उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद · सुमारे १८ हजार विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग वाशिम , दि. १२ : ‘ मतदान हा आपल्याला मिळालेला बहुमूल्य अधिकार आहे , आपलं मत वाया घालवू नका , कोणतेही कारण न देता २१ ऑक्टोंबरला मतदान करा... ’ ‘ मतदान करताना जाती-धर्माचा विचार न करता योग्य उमेदवार निवडा... ’ ‘ आपलं मत विकू नका , प्रत्येक मत लोकशाहीची ताकद आहे , ते वाया घालवू नका... ’ असे विचार व्यक्त करून शालेय विद्यार्थ्यांनी मतदान आणि लोकशाही प्रक्रियेचे महत्व पटवून दिले. निमित्त होते जिल्हा निवडणूक यंत्रणेमार्फत ‘ स्वीप ’ अंतर्गत आयोजित वक्तृत्व स्पर्धा आणि परिसंवादाचे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हृषीकेश मोडक , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा ‘ स्वीप ’ चे नोडल अधिकारी दीपक कुमार मीना यांच्या मार्गदर्शनात शुक्रवारी जिल्ह्यातील शाळांमध्ये वक्तृत्व स्पर्धा आणि परिसंवाद आयोज...
· जिल्हा न्यायालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा वाशिम , दि . ०५ : मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांनी विपुल लेखन केले आहे. त्यांचे हे लेखन मराठी साहित्याला समृद्ध करण्यामध्ये अतिशय महत्वपूर्ण योगदान देणारे असल्याचे प्रतिपादन प्रा. लता जावळे यांनी केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि वाशिम जिल्हा विधीज्ञ मंडळ यांच्यावतीने ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’निमित्ताने ५ जानेवारी रोजी आयोजित ‘ मराठी साहित्यामध्ये महिला साहित्यिकांचे योगदान ’ या विषयावर त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी वरिष्ठ स्तर सह दिवाणी न्यायाधीश पी. एच. नेरकर होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. शाम शेवलकर, ॲड. गणेशप्रसाद अवस्थी यांची उपस्थिती होती. प्रा. जावळे म्हणाल्या, सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी शिक्षणाची कवाडे खुली करून दिल्यानंतर अनेक महिलांनी साहित्य निर्मितीत योगदान देण्यास सुरुवात केली. अगोदर केवळ बोली स्वरुपात असलेली लोकगीते, गाणी शब्द रुपात आली. साहित्याच्या माध्यमातून महिलांवर होणारा अन्याय, त्यांच...
· ४ कोटी वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन · अभंग, भारूडातून वृक्षारोपणाविषयी जनजागृती वाशिम , दि . २९ : राज्य शासनामार्फत ४ कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत दि. १ ते ७ जुलै २०१७ या कालावधीत वृक्षारोपण करण्यात येणार आहे. सर्वसामान्य नागरिकांमध्ये वृक्ष लागवड व संवर्धनाविषयी जनजगृती करून त्यांना वृक्षलागवड मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यासाठी आज जिल्हा प्रशासनाच्यावतीने वृक्ष दिंडी काढण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून वृक्ष दिंडीला सुरुवात करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती विश्वनाथ सानप, अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, रोहयोचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कापडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी बाळासा...
Comments
Post a Comment