राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेअंतर्गत विविध स्पर्धेचे आयोजन

 

राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेअंतर्गत विविध स्पर्धेचे आयोजन

   वाशिम, दि. 24 (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाने २५ जानेवारी २०२२ ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धाअंतर्गत प्रश्न मंजुषा स्पर्धा, व्हिडीओ तयार करण्याची स्पर्धा, पोस्टरची डिझाईन करण्याची स्पर्धा, गाण्याची स्पर्धा, घोषवाक्य तयार करण्याची स्पर्धा अशा पाच प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या आहे.या स्पर्धेबाबतची सविस्तर माहिती https://ecisveep.nic.in/contest/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

या स्पर्धेमध्ये अधिकाधिक स्पर्धकांनी भाग घ्यावा याकरिता पुढीलप्रमाणे प्रचार व प्रसिध्दी करण्यात यावी.या स्पर्धेचे सोबत जोडलेले पोस्टर, गाईडलाईन्स, व्डिीओ याची स्थानिक वृत्तपत्र, समाजमाध्यम, विविध व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुपवर तसेच जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या वेबसाईटवर प्रचार व प्रसिध्दी करावी. स्पर्धेची माहिती मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, NSS,NYK, NCC,PIB, Media House व इतर संबंधित व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुपवर स्पर्धेच्या कालावधीत नियमितपणे पाठविण्यात यावी.

समाज माध्यमांवर माहिती अपलोड करतेवेळी हॅशटॅग #PowerOfOneVote याचा वापर करण्यात यावा.विद्यालयातील आयकॉन यांचा व्हिडीओ/ऑडीओ संदेश तयार करुन तो सोशल मिडीयावर प्रसारीत करुन नागरिकांना स्पर्धेमध्ये सहभागी होण्याकरिता आवाहन करावे. जिल्ह्यातील महाविद्यालय व शाळेतील विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी मुख्याध्यापक/प्राचार्य/शैक्षणिक संस्थाचालक यांनी प्रोत्साहीत करावे. असे आवाहन प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी, चंद्रकांत उप्पलवार यांनी केले आहे.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे