लाभार्थ्यांनी योजनांचा लाभ घेवूनजीवनमान उंचावावे- के. व्ही घुगे हिवरा (लाहे) येथे कलापथक कार्यक्रम

लाभार्थ्यांनी योजनांचा लाभ घेवून

जीवनमान उंचावावे

-         के. व्ही घुगे

                              हिवरा (लाहे) येथे कलापथक कार्यक्रम

        वाशिम, दि. 09 (जिमाका) : मागासवर्गीय घटकांसाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सेस फंडाच्या योजना आहेत. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वैयक्तीक लाभाच्या अनेक योजना आहेत. लाभार्थ्यांनी ह्या योजनांचा लाभ घेवून आपले जीवनमान उंचावावे. असे आवाहन कारंजा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी के. व्ही घुगे यांनी केले.

           8 मार्च रोजी कारंजा तालुक्यातील हिवरा (लाहे) येथील बुध्द विहार परिसरात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने जिल्हा माहिती कार्यालय, वाशिमच्या वतीने समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती अनुसूचित जाती उपयोजना सन 2021-22 अंतर्गत सुर्यलक्ष्मी बहुउद्देशिय संस्थेच्या कलापथकाने उपस्थित ग्रामस्थांना दिली. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रम प्रमुख अतिथी म्हणून श्री. घुगे बोलत होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, प्रतिष्टित नागरीक रामराव अघमे, महिला मंडळाच्या अध्यक्षा अर्चना तायडे, ग्रामपंचायत सचिव मनोज मोहाळे, विनायक तायडे, छत्रपती मनवर यांची प्रमुख्याने उपस्थिती होती.

          श्री. घुगे पुढे म्हणाले, ग्रामीण भागातील नागरीकांना योजनांची माहिती कमी प्रमाणात असते. समाज कल्याणच्या विविध योजनांचा प्रचार-प्रसार व्हावा आणि लाभार्थ्यांनी भविष्यात विविध योजनांचा लाभ घ्यावा यासाठी कलापथक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गावातील गरजू गरीब मागासवर्गीय लाभार्थ्यांनी समाज कल्याण योजनांचा लाभ घ्यावा. असे त्यांनी सांगितले.

         श्री. खडसे म्हणाले, यावर्षी आपण भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने दोन वर्षाचा कार्यकाळ नुकताच पुर्ण केला आहे. नागरीकांसाठी तसेच विविध घटकांच्या लाभार्थ्यांसाठी राज्य शासनाच्या अनेक योजना आहेत. या योजनांमुळे त्यांची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती बदलण्यास हातभार लागणार असल्यामुळे त्यांनी विविध योजनांची माहिती घेवून लाभ घ्यावा असे आवाहन केले.

          यावेळी सुर्यलक्ष्मी शिक्षण,कला,क्रीडा व आरोग्य बहुउद्देशीय संस्था वाशिमचे अध्यक्ष विलास भालेराव आणि त्यांच्या सहकारी कलावतांनी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना, आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, कन्यादान योजना, अनुसूचित जाती व नवबौध्द मुलामुलींसाठी निवासीशाळा, परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती,बचतगटांना मिनी  ट्रॅक्टर, दुधत्या जनावरांचे गट वाटप व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेची माहिती उपस्थितांचे मनोरंजन करुन दिली. संचालन विनायक तायडे यांनी केले. आभार कलापथक प्रमुख विलास भालेराव यांनी मानले. कार्यक्रमाला हिवरा (लाहे) येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे