दिव्यांग प्रमाणपत्र व वैश्वीक ओळखपत्र मोहिम 200 दिव्यांग व्यक्तींचा सहभाग
- Get link
- X
- Other Apps
दिव्यांग प्रमाणपत्र व वैश्वीक ओळखपत्र मोहिम
200 दिव्यांग व्यक्तींचा सहभाग
वाशिम, दि. 11 (जिमाका) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या 2 डिसेंबर 2021 च्या शासन निर्णयान्वये दिव्यांग व्यक्तींना संगणकीय प्रणालीव्दारे ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र व वैश्वीक ओळखपत्र देण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विशेष मोहिम राबविण्याबाबत मार्गदर्शक सुचना देण्यात आल्या आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली समाज कल्याण विभाग व दिव्यांग शाळा यांच्या विद्यमाने 9 मार्च 2022 रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग प्रमाणपत्र व वैश्वीक ओळखपत्र उपलब्ध करुन देण्याकरीता शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरामध्ये 200 पेक्षा जास्त दिव्यांग व्यक्तींनी सहभाग नोंदविला. असे जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment