राज्य सरकारची दोन वर्षपूर्ती किन्ही (रोकडे) व शिवनगर येथे कलापथकाने दिली जनकल्याणकारी योजनांची माहिती
- Get link
- X
- Other Apps
राज्य सरकारची दोन वर्षपूर्ती
किन्ही (रोकडे) व शिवनगर येथे कलापथकाने दिली
जनकल्याणकारी योजनांची माहिती
वाशिम, दि. 11 (जिमाका) : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारला नुकतीच दोन वर्ष पुर्ण झाली. सरकारने घेतलेले महत्वाचे निर्णय, राबविलेल्या विविध योजना आणि उपक्रमांची माहिती तसेच जिल्हयात झालेली विकास कामे आदींची माहिती नागरीकांना व्हावी याकरीता माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि जिल्हा माहिती कार्यालय, वाशिमच्या वतीने आयोजित जनकल्याणकारी योजनांचा कलापथकाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे.
आज 11 मार्च रोजी कारंजा तालुक्यातील किन्ही (रोकडे) व शिवनगर येथे सुर्यलक्ष्मी बहुउद्देशिय संस्थेचे प्रमुख कलावंत लोककवी विलास भालेराव व सहकलावंतांनी कलापथक कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थित ग्रामस्थांना योजनांची माहिती मनोरंजनातून दिली.
किन्ही (रोकडे) येथील कार्यक्रमाला यावेळी कारंजा पंचायत समितीच्या सभापती सविता रोकडे, जिल्हा परिषद सदस्य आशिष दहातोंडे, ग्रामपंचायतचे प्रशासन संजय पवार, ग्रामपंचायतचे सचिव डि.एस. गावंडे, प्रतिष्ठीत नागरीक अशोकराव रोकडे प्रामुख्याने उपस्थित होते.
शिवनगर येथील कलापथकाच्या कार्यक्रमाला सरपंच सौ. पदमा बहाळे, उपसरपंच शालिनी ठोंबरे, ग्रामसेवक नरेंद्र ठाकरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
कलापथकाने आपल्या सादरीकरणातून शिवभोजन योजना, स्व. बाळासाहेब बहुउद्देशिय कृषी संकूल, बालसंगोपन योजना, मिशन वात्सल्य, महात्मा फुले कर्जमुक्ती योजना, महाआवास योजना, जलजीवन मिशन योजना, समृध्दी महामार्ग यासह विविध योजनांची माहिती उपस्थित ग्रामस्थांना दिली. या कार्यक्रमाला गावातील नागरीक तसेच शालेय विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment