माविम कार्यालय येथे जागतिक महिला दिन साजरा
माविम कार्यालय येथे जागतिक महिला दिन साजरा
वाशिम दि. ०८(जिमाका) महिला आर्थिक विकास महामंडळ अर्थात माविम जिल्हा कार्यालय वाशीम येथे आज ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या दिवसाचे औचित्य साधून कार्यालयातील महिला कर्मचारी श्रीमती कल्पना लेहकपुरे तसेच लोकसंचालित साधन केंद्रातील कार्यरत महिला कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपुरे,सहायक जिल्हा समन्वय अधिकारी समीर देशमुख, लेखाधिकारी गौरव नंदावर सल्लागार राहुल मोकळे, आनंद काळे, संतोष मुखमाले, प्रमोद गोरे, प्रदीप देवकर तसेच कार्यालयातील इतर कर्मचारी उपस्थित होते.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिला कर्मचार्यांनी यावेळी केक कापून हा दिवस उत्साहाने साजरा केला.जिल्ह्यातील बचतगटांचे कार्य करणाऱ्या श्रीमती संगीता शेळके आणि सीमा पाचपिल्ले यांचा देखील पुष्पगुच्छ देऊन श्री नागपूरे यांनी सन्मान केला.
Comments
Post a Comment