शिष्यवृत्ती व योजनांचे प्रलंबित अर्ज महाडीबीटी पोर्टलवर 7 मार्चपर्यंत भरावे



शिष्यवृत्ती व योजनांचे प्रलंबित अर्ज

महाडीबीटी पोर्टलवर 7 मार्चपर्यंत भरावे

          वाशिम, दि. 04 (जिमाका) : अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राबविण्यात येणाऱ्या मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती/शिक्षण फी,परीक्षा फी योजना व इतर ऑनलाईन झालेल्या योजनांचे शैक्षणिक वर्ष 2021-22 मधील अर्ज स्विकारण्यासाठी 14 डिसेंबर 2021 पासून नवीन प्रवेशित व नूतनीकरणाचे विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्यासाठी महाडिबीटी पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे.  

              सन 2021-22 मधील अनुसूचित जाती या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती व इतर योजनांचे अर्ज https://mahadbtmahait.gov.in या महाडीबीटी पोर्टलवर भरुन घ्यावे. महाविद्यालयात प्रवेशीत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सन 2021-22 सत्रातील महाडिबीटी प्रणालीवर शिष्यवृत्ती व इतर योजनांचे नुतनीकरणाचे अर्ज भरण्याची तसेच नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याची अंतिम मुदत 07 मार्च 2022 असल्याबाबत महाविद्यालय स्तरावरून कळविण्यात यावे. महाविद्यालयाने सन 2021-22 करीता अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती व इतर योजनांचे अर्ज महाडीबीटी प्रणालीवर जास्त प्रमाणात नोंदणीकृत होतील याकडे लक्ष द्यावे. तरी जिल्हयातील सर्व प्राचार्य यांनी आपल्या महाविद्यालयातील सर्व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना वरील योजनांचे अर्ज दिलेल्या तारखेपर्यंत भरण्यासाठी आपल्या स्तरावरून करण्यासाठी अवगत करावे.     

               जिल्हयातील सर्व महाविद्यालयातील प्राचार्यांनी आपल्यास्तरावरुन अनुसूचित जाती प्रवर्गातील सर्व संबंधित पात्र विद्यार्थ्यांना महाडीबीटी पोर्टलवर अर्ज भरण्यास अवगत करावे. तसेच महाडीबीटी पोर्टल https:/dbtworkflow.mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या कालावधीनुसार संबंधित महाविद्यालयांनी मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती शिक्षण फी परीक्षा फी (फ्रीशिप) योजना व इतर ऑनलाइन झालेल्या योजनांच्या सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज शासन निर्णयानुसार पडताळणी करून पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, वाशिम यांच्याकडे तात्काळ ऑनलाईन पाठवावे. पात्र विद्यार्थी वरील योजनांपासून वंचित राहिल्यास आणि अशा विद्यार्थ्यांकडून शासन अनुज्ञेय शुल्क वसूल केल्यास संबंधित महाविद्यालय शासन निर्णयानुसार कारवाईस पात्र राहील. याची नोंद घ्यावी. असे समाज कल्याणचे सहायक आयुक्त, एम. जी. वाठ यांनी कळविले आहे.

*******

Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर